नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये वाहन उद्योगासाठी एक मोठे आव्हान होते. असे असूनही यंदा देशातील वाहन उत्पादक त्यांच्या विक्रीला चालना देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वर्षाच्या सुरूवातीपासूनच नवनवीन वाहने लाँच करून नवीन कार मॉडेल्स बाजारात आणली जात आहेत.
कोरोनानंतर आता वाहन बाजार पूर्वपदावर असून नव्या गाड्यांची मागणी वाढत आहे. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अनेक नवीन गाड्या बाजारात दाखल करण्यात आल्या. यानंतर, आता या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये लक्झरी वाहने ग्राहकांच्या भेटीला येत आहेत.
भारतात दाखल होणाऱ्या काही कारवर एक नजर टाकू या…
जग्वार आय-पेस
जग्वार कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणत आहे. ही कार दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि कंपनीच्या बॅटरी तंत्रज्ञानासह येणार आहे. जग्वार आय-पेस एसयूव्ही ही १०० किमी ताशी वेगाने जाते, या कारची किंमती २ कोटींच्या पुढे अपेक्षित आहे.
बीएमडब्ल्यू – M340i
मुळात बीएमडब्ल्यू M340i परफॉर्मन्स व्हेरिएंट असून ती लवकरच भारतात लॉन्च होईल. या कारला ३ लिटर, सहा सिलेंडर, दोन-टर्बो पॉवरप्लांट मिळेल. जे ३८२ बीएचपीची उर्जा आणि ५०० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करेल. या कारची किंमत अंदाजे ७५ लाख अपेक्षित आहे.
