मुंबई – आगामी मायक्रो SUV – भारतात पहिल्यांदा कार खरेदी करणारे लोक हॅचबॅकलाच पसंती देतात. त्यातही त्यांच्याकडे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात. पण २०२१ मध्ये या सेगमेंटची गाडी खरेदी करणाऱ्यांकडे खूप पर्याय उपलब्ध राहतील, असे चित्र आहे. कारण भारतात अनेक वाहन कंपन्या मायक्रो एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. येत्या वर्षभरात मार्केटमध्ये येणाऱ्या निवडक गाड्यांची माहिती जाणून घेऊ या…
Tata Hornbill: या यादीतील पहिली कार टाटाची एचबीएक्स आहे. कंपनी या कारला मेच्या आसपास लॉन्च करणार आहे. भारतीय मार्केटमध्ये मारुती इग्नीस आणि महिंद्रा केयूव्ही१०० ला ही गाडी टक्कर देईल, असे बोलले जात आहे. हे अल्फा मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित कंपनीचे दुसरे उत्पादन असेल. हॉर्नबील मायक्रो एसयूव्हीमध्ये टाटाच्या इम्पॅक्ट २.० डिझाईन लँग्वेजचा प्रयोग केला जाईल. हे आपण यापूर्वीच नवी हॅरियर आणि अल्ट्रोजमध्ये बघितलेले आहे.








