मुंबई – भारतात यावर्षी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक कार दाखल होणार आहेत. यात बऱ्याच विदेशी कंपन्यांचाही समावेश आहे. भारतात विशेषत्वाने देशी कंपन्यांच्या कारची प्रतिक्षा होत आहे. कारण भारतातील उत्पादन असल्याने याच्या किंमती कमी असतील, असा विश्वास ग्राहकांना आहे.
Mahindra XUV300 Electric
Mahindra XUV300 चे इलेक्ट्रीक व्हर्जन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. ही गाडी एकदा फूल्ल चार्ज केली की 200 किलोमीटरपर्यंत टेंशन नाही. 380 व्होल्टची बॅटरी यामध्ये राहण्याची शक्यता आहे. याची टॉप स्पीड 160 किलोमीटर प्रती तास आहे, असे बोलले जात आहे. या गाडीची किंमत 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत राहील, असा अंदाज आहे.
Tata Altroz EV
Tata Altroz EV ला Auto Expo 2020 मध्ये ठेवण्यात आले होते. 60 मिनीटांत 80 टक्के चार्ज होणारी ही गाडी आहे. या गाडीच्या रेंजचा विचार केला तर टाटाची ही इलेक्ट्रीक कार 250 ते 300 किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करू शकते. स्वस्त दरात ही गाडी लॉन्च होईल, असे सांगितले जात आहे. यात ग्राहकांना हायटेक फिचर्सही बघायला मिळेल.
Mahindra eKUV100
Mahindra eKUV100 ला 2020 मध्ये झालेल्या आटो एक्स्पोमध्ये लॉन्च करण्यात आले होते. या गाडीत 15.9 किलोवॅटचे लिक्वीड कूल मोटर देण्यात आली आले आहे. 54पीएसचा पॉवर 120 एनएम टॉर्कसह जनरेट करण्याची क्षमता या मोटरची आहे. 80 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनीटे लागतात. फुल चार्जींगवर 147 किलोमीटरचे अंतर पार करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. 8 ते 9 लाख रुपये किंमत राहण्याची शक्यता आहे.