नवी दिल्ली – येत्या काही दिवसात २०२० वर्ष संपुष्टात येणार असून वाहन कंपन्या नवीन वर्षाकरिता नवीन उत्पादने बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यातच इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी भारतात वेगाने वाढत आहे, यामुळे दुचाकी उत्पादक कंपनी सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
भारतातील अनेक दुचाकी वाहन उत्पादक कंपन्या नवीन वर्षात आपले इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. यातील काही स्कूटर ऑटो एक्सपो २०२० मध्ये सादर केले गेले आहेत आणि आता ते लॉन्चसाठी तयार आहेत.
आता सन २०२१ मध्ये लाँच होणाऱ्या आगामी स्कूटरच्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह माहिती जाणून घेऊ या…
ओला इलेक्ट्रिक स्कूटरः
अॅपवर आधारित टॅक्सी उत्पादक कंपनीची ओला इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लवकरच दाखल होणार असून कंपनी जानेवारी २०२१ मध्ये तीचे अनावरण होऊ शकते, या इलेक्ट्रिक स्कूटरला 240 किमीचे अॅव्हरेज मिळू शकते. भारतातील वाढती इलेक्ट्रिक स्कूटर मागणी लक्षात घेऊन कंपनी लवकरात लवकर आपले स्कूटर बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या ई-स्कूटरची किंमत 1.50 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
वेस्पा इलेक्ट्रिक स्कूटर
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वेस्पा स्कूटरचे नवीन इलेक्ट्रिक मॉडेल फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतात लॉन्च केले जाऊ शकते. ही स्कूटर आधीच युरोपियन बाजारात येणार आहे. त्यानंतर भारतात येणार आहे. या स्कूटरमध्ये ३.३ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल आणि ब्लूटूथ, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी असू शकते. या स्कूटरची किंमत ९० हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते.
ओकिनावा स्कूटर
ही स्कूटर फेब्रुवारीपर्यंत भारतात लॉन्च केले जाऊ शकते. पॉवर आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत, ओकिनावा स्कूटरमध्ये 3 केडब्ल्यू ब्रश मोटर आहे, ज्यास पॉवर करण्यासाठी 4 केडब्ल्यू लिथियम आयन बॅटरी दिली जाते. ओकिनावा स्कूटर 100 किमी प्रति तासाच्या वेगाने धावू शकतो. ओकिनावा क्रूझर स्कूटर बॅटरी 2 ते 3 तासात पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते.
हिरो इलेक्ट्रिक स्कूटर एई -२९
ही स्कूटर हीरो इलेक्ट्रिकने ऑटो एक्सपो २०२० मध्ये सादर केली होती. हीरो इलेक्ट्रिक स्कूटर एई मोटरद्वारे चालविली गेली आहे, जी लाइटवेट पोर्टेबल लिथियम-आर्यन 48 व्ही किंवा 3.5 केडब्ल्यूएच बॅटरीद्वारे तयार आहे. हीरो इलेक्ट्रिक स्कूटर एई -29 ही प्रतितास 55 किमी वेगाने धावू शकेल. हीरो इलेक्ट्रिक स्कूटर 4 तासात एई -29 बॅटरी पूर्ण चार्ज करू शकतो. या स्कूटरची किंमत 85 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते.