सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राजू श्रीवास्तव यांच्या आठवणीत पत्नी भावूक; शेअर केला कॉमेडियनचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ

by India Darpan
नोव्हेंबर 1, 2022 | 5:24 am
in मनोरंजन
0
Shikha Raju Shrivastav

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जाऊन नुकताच एक महिना झाला. २१ सप्टेंबरला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. राजू यांच्या निधनानंतर महिन्याभराने त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. राजू यांचा कधी न पाहिलेला हा व्हिडीओ त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यासोबतच कॅप्शनमध्ये एक कविता लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जिममध्ये व्यायाम करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शिखा यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव गाणं म्हणताना दिसत आहेत. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वामी’ या चित्रपटातील गाणं ते गात आहेत. ‘तू जाऊन महिना झाला पण आम्हाला माहीत आहे की तू अजूनही आमच्यासोबतच आहेस आणि कायम राहशील’, असं कॅप्शन शिखा यांनी या व्हिडीओला दिले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेष लोढा, स्टँडअप कॉमेडियन एहसान कुरेशी आणि सुनील पाल यांनी एकत्र येऊन राज यांच्या आठवणीत एक शो केला होता. राजू यांचा भाऊ काजू श्रीवास्तव यांनीसुद्धा या शोमध्ये भाग घेतला होता.

१० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना ताबडतोबत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं डॉक्टरांनी त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. त्यानंतर मध्ये त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ४२ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांचे निधन झाले.

View this post on Instagram

A post shared by Raju Srivastav (@rajusrivastavaofficial)

Comedian Raju Srivastava Wife Share Video

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतले हे मोठे निर्णय

Next Post

काय होतीस तू, काय झालीस तू? काजोलच्या मुलीचा बदललेला लूक पाहून नेटकरी अचंबित

Next Post
Nyasa Devgan

काय होतीस तू, काय झालीस तू? काजोलच्या मुलीचा बदललेला लूक पाहून नेटकरी अचंबित

ताज्या बातम्या

mudrank

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढ मिळणार….

जून 9, 2025
crime1

पोलीसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या बापलेकावर धारदार कोयत्याने हल्ला…चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Untitled 35

वाहन धारकांनी या तारखेपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवावी….

जून 9, 2025
mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना…तिसरा व अंतिम लकी ड्रॉ या तारखेला

जून 9, 2025
rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
Audi A4 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ही सिग्‍नेचर एडिशन’ लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011