नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या १० ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या कुटुंबियांकडून आणि सहकाऱ्यांकडून सतत अपडेट्स मिळत होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमीही आली होती, मात्र आता त्यांच्या निधनाच्या दु:खद बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
गेल्या महिन्यात राजू श्रीवास्तव हे दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबला होते. त्याच जिममध्ये ते सकाळी वर्कआउट करत होते. कसरत करत असताना राजू यांची अचानक तब्येत बिघडली. राजू हे ट्रेड मिलवरच कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले. एम्सच्या हृदयरोग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राजू यांच्या मेंदूला दुखापत झाल्याची माहिती त्यांच्या जवळच्या मित्रांनी दिली होती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पडल्यामुळे मेंदूपर्यंत बराच वेळ ऑक्सिजन पोहोचला नाही. त्यांना शुद्धीवर येण्यासाठी वेळ लागू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. उपचारादरम्यान त्यांच्या शरीरात काही हालचाल झाल्याचेही सांगितले गेले.
लोकांना खुप हसवले
राजू यांनी अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले. ते देशातील लोकप्रिय विनोदी कलाकार होते. त्यांनी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, बिग बॉस, शक्तीमान, कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो सारखे शो केले. याशिवाय, मैंने प्यार किया, तेजाब, बाजीगर यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. अलीकडेच तो इंडियन लाफ्टर चॅम्पियनमध्ये खास पाहुणे म्हणूनही ते दिसले होते.
एका मुलाखतीत राजू यांनी कॉमेडी शोबद्दल सांगितले होते की, ‘जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा लोकांना कॉमेडीयन फारसे समजत नव्हते. त्या वेळी जॉनी वॉकरपासून विनोद सुरू होतो आणि जॉनी वॉकरवरच संपतो असे सगळे म्हणायचे. त्यावेळी स्टँड-अप कॉमेडीला जागा नव्हती, त्यामुळे मला हवी असलेली जागा तेव्हा मिळाली नाही.
मुंबईत राजू यांनी करिअरसाठी मोठी धडपड केली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी रिक्षा चालविण्याचेही काम केले. तसेच, भारतात स्टँडअप कॉमेडियन हे पात्र सिद्ध करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यारुपाने मोठा कलाकार आज देशाने गमावला आहे. सर्वस्तरातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे.
Comedian Raju Shrivastav is No More
Entertainment Delhi AIIMS
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी
खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD