इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन क्षेत्रात आपण खूप यशस्वी कलाकार पाहतो. छोट्या पडद्यावरील असेच एक यशस्वी नाव म्हणजे भारती सिंग. आपल्या विनोदाने ती प्रेक्षकांना खळखळवून हसवत असते. भारती कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते. नुकत्याच एका मोठ्या प्रकरणाला भारती आणि तिचा नवरा दोघेही सामोरे गेले होते. त्यानंतर भारती आता आई झाली आहे. एक प्रतिभावंत कलाकार, पत्नी, आईसह भारती एक उद्योजिका देखील आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नक्की काय काय करते भारती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
मूळची पंजाब राज्यातील अमृतसर येथील भारती सिंगने आपल्या करिअरची सुरुवात ‘इंडियन लाफ्टर चॅलेंज’पासून केली होती. त्यानंतर ती अनेक कॉमेडी शोजमध्ये दिसली. यात ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’, ‘कहानी कॉमेडी सर्कस की’ आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’सारख्या शोजचा समावेश आहे. ती फक्त कॉमेडियनच नव्हे तर एक चांगली डान्सरही आहे. याची झलक तिने डान्सिंग बेस्ट रियालिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्ये दाखवली आहे.
मध्यंतरी भारतीने ‘खतरा है’ या रिऍलिटी शोचे अँकरिंगही केले. त्याचबरोबर तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. यासह भारती केवळ कॉमेडियनच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील शूटरही आहे. तिने राष्ट्रीय स्तरावर पंजाबचे नेतृत्त्व केले आहे. तिला शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळालेले आहे. भारतीचं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील आहे.
या माध्यमाद्वारे तिने पती हर्ष लिंबाचिया आणि आपल्या गोंडस मुलासह एक व्हिडीओ शेअर केला आहे. ४ वर्षानंतर पंजाब येथील अमृतसर येथे गेल्याचं भारती या व्हिडीओमध्ये सांगत आहे. तसेच पंजाबमध्ये गेल्यानंतर आपण काय काय केलं हे भारतीने सांगितलं आहे. यादरम्यानच तिने आपल्या व्यवसायाबाबत देखील सांगितलं.
भारतीने पंजाब येथे स्वतःची एक फॅक्टरी सुरू केली आहे. मिनरल वॉटरची ही फॅक्टरी आहे. KELEBY या नावाचा मिनरल वॉटरचा तिचा ब्रँड आहे. तसेच या व्यवसायानिमित्त तिने गावातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. फॅक्टरीच्या आजूबाजूला असणाऱ्या गावातील लोक इथे काम करतात. गावातील लोक आपल्या फॅक्टरीमध्ये काम करत असल्याचं पाहून भारतीला आनंद होतो. या व्यवसायामधून भारती अधिकाधिक पैसे कमावते. इतकंच नव्हे तर तिथे तिचं छोटं रिसॉर्ट देखील आहे. भारती आपल्या मुलासह कुटुंबातील इतर मंडळींना घेऊन तिथेच राहिली होती.
Comedian Bharti Singh Profession Business Video
Entertainment
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD