नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांच्या मार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी 16 एप्रिल 2023 रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी 30 जानेवारी 2023 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ज्या इच्छुक उमेदवारांनी कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपलब्ध होण्यासाठी 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे मुलाखत घेण्यात येणार आहे. या मुलाखतीस येताना फेसबुक किंवा संकेतस्थळावर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करून त्यामधील CDS-60 कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेले प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्ट पूर्ण भरून ते मुलाखतीच्या वेळी सोबत आणावे.
कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक व नवयुवतींसाठी 1 फेब्रुवारी ते 7 एप्रिल 2023 या कालावधीत CDS कोर्स क्रमांक 60 चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणार्थीच्या निवास, भोजन व प्रशिक्षणाची सोय निःशुल्क करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी 0253-2451032 या दूरध्वनी तसेच 8888798584 भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.
Combined Defence Services Pre Exam Interview