शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

क्षेत्रफळ तब्बल २ लाख ४० हजार चौमीटर…. गिनीज बुकात नोंद…. हे आहे भारतातील अधिकृत सर्वात मोठे मंदिर

by Gautam Sancheti
डिसेंबर 24, 2022 | 9:43 pm
in इतर
0
Delhi Akshardham e1671881890897

इंडिया दर्पण विशेष लेखमाला 
– जगातील सर्वांत मोठी मंदिरे – भाग ४ 
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले
भारतातले अधिकृत सर्वांत मोठे मंदिर
दिल्लीचे अक्षरधाम मंदिर!
(क्षेत्रफळ २ ,४० ,००० चौमीटर)

आगरा म्हटलं की जसा ताजमहल आठवतो तसं दिल्ली म्हटली की अक्षरधाम मंदिर आठवते. ‘इंडिया दर्पण’च्या ‘जगातली सर्वांत मोठी मंदिरं’ या विशेष लेख मालेत आज आपण दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराची माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे आज आम्ही दिल्लीतच आहोत. ‘इंडिया दर्पण’च्या वाचकांसाठी जगातील सर्वांत मोठ्या मंदिरांचे दर्शन आपण घडवत आहोत.  या मालिकेत आजवर आपण युनेस्को आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्या क्रमवारी नुसार मंदिरांची माहिती पहिली आहे. आज आपण दिल्लीच्या ज्या जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराची माहिती पाहणार आहोत त्याचे वैशिष्ट्ये म्हणजे २००७ साली ‘गिनिज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड’ ने या मंदिराची जगातले सर्वात मोठे परिसर असलेले हिन्दू मंदिर म्हणून नोंद केली आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

भगवान स्वामिनारायण यांच्या स्मरणार्थ हे मंदिर निर्माण करण्यात आले आहे. स्वामी नारायण या जगद्विख्यात धार्मिक समुहाचे प्रमुख महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर बांधण्यात आले आहे. 11 हजार कुशल आणि अकुशल कामगारांनी सतत ५ वर्षे रात्रंदिवस मेहनत करून या मंदिराची निर्मिती केली. गुलाबी आणि पांढरा संगमरवर आणि वाळूचे दगड यांचे मिश्रण करुन संपूर्ण मंदिर बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे बांधकामासाठी विसाव्या शतकात जगभर वापरले जाणारे स्टील, लोखंड आणि कांक्रीट यांचा थोडाही वापर येथे करण्यात आलेला नाही.

अक्षरधाम मंदिर असे आहे
बोचासनवासी श्री अक्षरपुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था (बीएपीएस) या जगप्रसिद्ध धार्मिक संस्थेचे पांचवे गुरु परम पूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान स्वामिनारायण यांच्या पुण्यस्मृति प्रित्यर्थ १०० एकर जागेवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
दिल्लीचे अक्षरधाम मंदिर ८६३४२ चौरस फुट क्षेत्रावर बांधण्यात आले असून हे मंदिर ३५६ फुट लांब ३१६ फुट रुंद आणि १४१ फुट उंच आहे.मंदिरात २८७० पायर्या आहेत.

मंदिरात काय काय पहाल?
गार्डन ऑफ़ इंडिया : ‘गार्डन ऑफ़ इंडिया’ हे अक्षरधाम मंदिरातील अनेक आकर्षणांपैकी एक महत्वाचे आकर्षणआहे. मंदिरा जवळ हिरव्या गवताचे एक विशाल लॉंन्स असून येथे देशातील प्रमुख महापुरुष, सैनिक,बालवीर आणि कर्तुत्ववान महिला यांच्या तांब्याच्या धातुपासून तयार केलेल्या असंख्य मूर्ती पहायला मिळतात.
नारायण सरोवर: मंदिरा भोवती विशाल सरोवर आहे त्याला नारायण सरोवर म्हणतात. देशातील १५१ नद्यांचे जल याच सरोवरात सोडण्यात आले आहे. १०८ गोमुखातुन हे पवित्र जल बाहेर पड़ते.
म्युझिकल कारंजा: म्युझिकल कारंजा हे अक्षरधाम मंदिरातील आणखी एक आकर्षण. दररोज सायंकाली ५.१५ ते ५.३० या वेळत हा म्युझिकल कारंजा सुरु होतो.

मंदिराचे पाच भाग: दिल्लीचे अक्षरधाम मंदिर पाच भागांत विभागले आहे. मंदिराच्या भव्य रचनेत २३४ कोरीव खांब, कलाकुसर युक्त ९ घुमट, २० मंदिर शिखरं आणि पौराणिक काळातील २०,००० साधू,संत,ॠषि-मुनि, देव देवतांच्या शिल्पांचा\ समावेश आहे.
दशद्वारे: मंदिर परिसरांत प्रवेश करण्यासाठी दशद्वारे म्हणजे १० प्रवेशद्वार लक्ष्य वेधून घेतात. या दशद्वाराजवळ उंच उंच आकर्षक झाडं पहायला मिळतात.
भक्तिद्वार : भक्तिद्वार हे पारंपरिक भारतीय शैलीचे प्रतिक आहे.भक्ती आणि उपासना यांचे २०८ प्रकार येथे पहायला मिळतात.
मयूरद्वार: मयूरद्वार हे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोराच्या सौंदर्य,संयम आणि शुद्धतेचेप्रतिक मानले जाते. मंदिराच्या स्वागत द्वारात ८६९ भव्य कमानी असून त्यावर नृत्य करणारे मोर कोरले आहेत. मंदिराचे सर्व खांब एकमेकांना कलात्मकतेने जोडण्यात आलेले आहेत. वास्तुशास्त्र आणि पंचरात्र शास्त्रा नुसार हे मंदिर बांधण्यात आले आहे.

स्वामीनारायण दर्शन : मंदिराच्या मध्यभागी एका भव्य अशा अत्यंत आकर्षक घुमटाखाली भगवान स्वामिनारायण यांची 11 फुट उंच मूर्ती आहे. स्वामीनारायण भगवान यांची अभयदान करणारी ही मूर्ती बैठी म्हणजे बसलेली आहे. पंचधातुनी बनविलेली ही मूर्ती अतिशय तेजस्वी आकर्षक आणि चित्तवेधक आहे.स्वामिनारायण यांच्या भोवती त्यांचे ५ प्रमुख अनुयायी यांच्यामूर्ती आहेत.
इतर देव देवता : अक्षरधाम मंदिरातील राम-सीता , राधा-कृष्ण, शिव-पार्वती, लक्ष्मी-नारायण या सर्वच मूर्ती पंचधातू पासून तयार करण्यात आल्या असून सर्व देवता अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. हिन्दू देवता एवढ्या सुंदर आणि वैभवशाली रुपांत फार क्वचित पहायला मिळतात. मंदिराच्या सर्व भिंती,खांब आणि छत घुमट कलात्मक कोरीव कामाने सजलेले आहेत. त्याचे सौन्दर्य पाहून प्रेक्षक चकित होतात. मंदिरांत सर्वत्र स्वामीनारायण यांच्या जीवनातीलप्रसंगाची रंगित चित्रे सोनेरी चौकटीत आकर्षकपणे मांडली आहेत.

मंदिराचे बाह्यसौंदर्य
१०८ पितळी गोमुखं : अक्षरधाम मंदिराची मुख्य इमारत नारायण सरोवर भोवती स्थित आहे. या सरोवरांत देशांतील १५१ प्रमुख नद्यांचे पाणी टाकण्यात आलेले आहे. सरोवरा भोवतीची १०८ पितळी गोमुखं आकर्षक दिसतात.
१४८ सुबक हत्ती : मंदिराच्या पायाभोवती १४८ सुबक हत्ती पहायला मिळतात. याला गजेन्द्र पीठ म्हणतात. हत्तींची लहान मोठ्या आकारातील अनेक आकर्षक रूपं येथे पहायला मिळतात. लहान मोठ्या सर्वाना हे हत्ती आकर्षित करतात.
कारंजे शो :या मंदिरांत दररोज सायंकाली निसर्गरम्य कारंजे शो आयोजित केला जातो. या शो मध्ये जन्म मृत्युच्या चक्राचा उल्लेख आहे . अनेक कथा या शो द्वारे दाखविल्या जातात.

सहजानंद दर्शन : हॉल ऑफ़ वैल्यूज या कार्यक्रमांत ऑडियो आणि अनिमेशन यांच्या द्वारे शाकाहार , नीतिशास्त्र आणि एकामेकांतील सुसंवाद यांचे महत्व सांगितले जाते. यातील प्रत्येक मूर्ती जणु सजीव असल्याचा भास होतो.
नीलकंठ यात्रा : एक अतिशय भव्य पडद्यावर ‘नीलकंठ यात्रा’ हा चित्रपट दाखविला जातो.हा चित्रपट बालयोगी नीलकंठावर आधारित आहे.
संस्कृति दर्शन: कल्चरल बोट राइड द्वारे भारताच्या संस्कृति आणि परंपरा यांचा गौरवशाली इतिहास पहायला मिळतो.
अभिषेक मंडप; येथे नीलकंठ वर्णाच्या मुर्तीची अभ्यागताना आपल्या हातांनी अभिषेक व पूजा करता येते.
योगी ह्रदय कमल : कमळाच्या फुलांचे गार्डन
सहज आनंद वॉटर शो : हा २४ मिनिटांचा अप्रतिम वॉटर शो दाखविला जातो. केन उपनिषदातील विविध कथा दाखविण्यासाठी मल्टीमीडिया, लेसर, अंदर वाटर फ्रेम्स, मोशन पिक्चर्स अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला आहे. खूपचआकर्षक आणि प्रभावी असा हा शो आहे. आणि अक्षरधामच्या एक भव्य सुशोभित हॉल मध्ये हा ‘वॉटर शो’ पाहण्याचा वेगळाच अनुभव येतो.

मंदिर कुठे आहे? कसे जावे?
नवी दिल्लीत यमुनेच्या काठावर खेळग्रामाजवळ अक्षरधाम हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. मंदिराजवळ मेट्रो स्टेशन आहे .बस,ट्रेन, टैक्सी ने मंदिरात जाता येते. दिल्ली रेल्वे स्टेशन, नवीदिल्ली रेल्वे स्टेशन ,आनंद विहार रेल्वे स्टेशन ते अक्षरधाम मेट्रो अशी थेट मेट्रो सेवा उपलब्ध आहे. अक्षरधाम मंदिरा समोर बस स्थानक आहे.दिल्लीच्या सर्व भागातून मंदिरा पर्यंत पोहचण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे..
अक्षरधाम मंदिर सोमवारी बंद असते. मंगळवार ते रविवार मंदिर खुले असते. त्यामुळेच काल रविवारी हे मंदिर पाहून आज हा लेख आपल्याला सादर केला आहे.
संपर्क : ‘स्वामीनारायण अक्षरधाम’ NH-24, अक्षरधाम सेतू, नवी दिल्ली -११००९२
दूरध्वनी- ०११-४३४४२३४४

– विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Column Worlds Biggest Temple Akshardham Temple Delhi by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिककरांनो, ही संधी चुकवू नका! तब्बल ४० हजार जणांनी दिली भेट; होमेथॉन प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – गोलू आईला दवाखान्यात नेतो

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - गोलू आईला दवाखान्यात नेतो

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011