इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी
पुनर्रोपण करण्यापूर्वी
रस्ते किंवा विविध विकासकामे करताना सद्यस्थितीच अडथळा ठरणारे वृक्ष पुनर्रोपण करण्याचा पर्याय आहे. मात्र, तो सरसकट वापरणे शक्य आहे का. पुनर्रोपण म्हणजे काय यासह सर्व बाबींची माबिती आपण या आणि पुढच्या लेखात घेणार आहोत.
वृक्षांचे पुनर्रोपण याविषयी सखोल विचार होणे आवश्यक आहे. पुनर्रोपण करताना झाडाच्या आयुर्मानाचा अभ्यास करणे अत्यंत जरुरीचे आहे. साधारण दहा वर्षाचे वय असलेले वड, पिंपळ, भेंडी, काटे सावर, नारळ या झाडांचा वाढलेला घेर आणि विस्तार राखून पुनर्रोपण करता येऊ सकते. तेव्हाच ही प्रक्रिया योग्य होऊ शकते. सध्या जो पन्नास ते शंभर वर्ष वय झालेल्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा अट्टाहास आहे, तो चुकीचा आहे. त्यात पैशांचा चुराडा, वेळेचा व जागेचा दुरुपयोग, सामान्यांच्या भावनेशी खेळ असा आहे. ते कसे हे आपण सविस्तर समजून घेऊ..
पन्नास ते शंभर वर्षे वयाच्या झाडांचा खोडाचा गाभा वयोमानानुसार कुजत असतो. प्रत्येक झाडाची वयोमर्यादा प्रजाती नुसार 75, शंभर, दीडशे, दोनशे वर्षापर्यंतची असते. आपण जे झाड पुनर्रोपण करणार आहोत त्या झाडाच्या प्रजातीनुसार त्याची वयोमर्यादा लक्षात घ्यायला हवी. त्याद्वारे ते पुनर्रोपण करण्यास योग्य आहे की नाही याचा विचार प्रथम करणे गरजेचे आहे. प्रत्येक झाडाला एक काल मर्यादा असते. सर्रास कुठल्याही झाडाचे पुनर्रोपण होऊ शकतो हा विचारच चुकीचा आहे.
पुनर्रोपण करताना प्रत्यक्ष ज्या जागेवरून आपण झाड हलविणार आहोत, त्या जागेवरील मातीचा व ज्या ठिकाणी आपण पुनर्रोपण करणार आहोत त्या जागेतील मातीच्या पोताचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच आपल्याकडील हवामानाचा विचार होणे गरजेचे आहे. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी कोरडे हवामान असते. त्याचा पुनर्रोपण केलेल्या वृक्षांवर वाईट परिणाम होतो. आपल्याकडे आपण केलेल्या पुनर्रोपण वृक्षास जगण्याचा जर-तरच्या विचारांचा प्रभाव आहे. यामध्ये कोणतीच पुनर्रोपण केलेल्या वृक्षांची जगण्याची शाश्वती नाही. निश्चितता असल्याची हमी कोणीही देऊ शकत नाही.
पुनर्रोपणासंबंधीच्या अन्य बाबींची माहिती आपण पुढच्या लेखात बघू..
(क्रमश..)