इंडिया दर्पण विशेष लेखमाला – वृक्षवल्ली आम्हा सोयरी
ठिबक सिंचन योग्य की अयोग्य
वनीकरण किंवा वृक्षारोपणासाठी ठिबक सिंचन योग्य की अयोग्य असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. त्याविषयीच आज आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत…
खरंतर पाहायला गेलं ठिबक सिंचन ही प्रक्रिया जी आहे ती फळ झाड शेतीसाठी खुपच उपयोगी ठरते. ठराविक फळ झाडांसाठी योग्य रितीने काम आणि चांगली परिणामकारक आहे. द्राक्ष, डाळिंब, लिंबू, संत्रा अशा या आटोपशीर वाढणाऱ्या, ज्यांची मुळं ही जास्त खोलवर न जाणाऱ्या अशा फळ झाडांसाठी खूप उपयोगी अशी ही पद्धत आहे.
कमी पाण्यामध्ये कमी मनुष्यबळात वापरण्याची ही योजना आहे. पण आपल्याकडे ज्या प्रमाणामध्ये वनीकरणासाठी काही ठिकाणी याचा वापर होतो, तो त्या झाडांच्या दृष्टीने अयोग्य आहे. माझ्या बऱ्याच वर्षांच्या अनुभवातून हे लक्षात आल आहे. ठिबक सिंचनामुळे त्या वृक्ष प्रजातींची वाढ काही प्रमाणात होतांना दिसते, पण त्यांच्या मुळांची वाढ जी होते ती एक ठराविक मर्यादे मध्ये, मुळांचे वेटोळे होऊन गुंता तयार झालेले दिसतो.
मुळांचा विस्तार हा ज्याप्रमाणात हवा त्या प्रमाणात त्या कालावधीत होताना दिसत नाही. मला काही ठिकाणी असं दिसून आलं आहे की चार, पाच वर्षानंतर ठिबक सिंचना द्वारे पाणी देण्याचं काम जेवा थांबवलं जातं, त्या वृक्षांच्या काही कालावदीतच सुकण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. काही ठिकाणी वाऱ्यामुळे ही झाड सहजासहजी उन्मळून पडतात. तर हे का होत आपण थोड समजून घेऊ या.
(क्रमशः)