इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी
कमळ बाग फुलवूया
येत्या २५ एप्रिल रोजी जगभरात वसुंधरा दिन साजरा होत आहे. त्याचनिमित्ताने आपण नाशिकमध्ये कमळ बाग फुलवूया हा उपक्रम साजरा करीत आहोत. तो नेमका काय आहे, हे आपण आता जाणून घेऊया….

आपलं पर्यावरण संस्था
मो. 9422267801
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होत आहेत. या औचित्यावर आपण आपल्या आपल्या देशाच्या निसर्गमान चिन्हांपैकी एक अन् राष्ट्रीय फुलाचा दर्जा प्राप्त असलेल्या कमळाची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. बहुगुणी अशा या कमळ पुष्पाचे, आपण 75 कमळ कुंड उभारणार आहोत. त्यामध्ये 75 वेगवेगळ्या प्रजातीचे कमळ पुष्प लावणार आहोत. नेहमीप्रमाणे परंपरेनुसार संगोपनाची जबाबदारी ‘आपलं पर्यावरण संस्थे’ने घेतली आहे.
कमळ हे या धर्तीवरचे फुलांच्या प्रकारातील सर्वात सुंदर फुल म्हणून ओळखले जाते. या निमित्ताने कमळ फुलाविषयी जनप्रबोधन होऊन त्याचा नैसर्गिक अधिवास टिकवून राहण्यासाठी मदत होईल. कमळ या वनस्पतीचे महत्व लोकांना कळावे, कमळ वनस्पतीमध्ये आयुर्वेदानुसार खूप काही औषधी गुणधर्म आहेत, वेगवेगळ्या विकारांवर या औषधी गुणधर्माचा उपयोग होतो. सौंदर्य प्रसाधनांमध्येही कमळाचा उपयोग केला जातो.अशा या बहुपयोगी वनस्पतीचे, त्या अनुषंगाने लोकांमध्ये कमळ शेती करण्याचे प्रबोधन व्हावे, त्या मधून चांगल्या प्रकारे औषध, सौंदर्य, खाद्यपदार्थांचे उद्योग उभे रहावेत, अनेकांना उपजीविका मिळावी, हा यामागचा उद्देश आहे.
ही कमळ बाग आपण “नाशिक वनराई” म्हसरूळ येथे लोकसहभागातून फुलविणार आहोत. त्याचे काम सुरु झाले आहे. या कमळ लागवड प्रकल्पाकरिता आम्ही सर्वांना आवाहन करीत आहोत की, त्यांनी या उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावी. देणगी देत एक कमळ कुंड कायमस्वरूपी दत्तक घ्यावे. दत्तक घेतलेल्या कमळ कुंडावर संबंधित पालकाचे नाव किंवा त्यांच्या संस्था, फर्मचे नाव देखील अगदी ठळकपणे लिहिण्यात येणार आहे. या कमळ बागेचे उदघाटन येत्या २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिनाच्या औचित्यावर केले जाणार आहे. सहभागासाठी संपर्क:- शेखर गायकवाड,(९४२२२६७८०१/९१३०२५७८०१) आपलं पर्यावरण संस्था नाशिक.