इंडिया दर्पण विशेष लेखमाला – वृक्षवल्ली आम्हां सोयरी
कमळ शेतीची वैशिष्ट्ये
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये कमळ बाग स्थापन झाली आहे. ती स्थापन करण्यामागे कमळ शेतीचा प्रचार, प्रसार करण्याचा हेतू आहे. कमळ शेतीचे नक्की फायदे काय आहेत हे आपण आता जाणून घेऊया…

आपलं पर्यावरण संस्था
मो. 9422267801
कमळ बाग उभारण्याचा उदेश. कमळ हे दलदलित व उथळ पाण्यातील एक वनस्पती आहे. गुलाबी,पांढरा, हे प्रमुख प्रकार आहेत. कमळाचे नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात येत चालले आहे. निसर्गाचा हा एक जैवविविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो अबाधित राहावा व कमळाचं व ईतर जल वनस्पतींचे नैसर्गिक आदिवासाची जपणूक व्हावी लोकांमध्ये प्रबोधन व्हाव या दृष्टीने आपण कमळ बाग उभी केली आहे. ज्याप्रमाणे वृक्ष, वेली, झुडपे, वनस्पती, जंगला मध्ये आवश्यक असतात, त्याच अनुषंगाने जल वनस्पतीचे नैसर्गिक आधीवास गरजेचे आहेत. कमळाचे नैसर्गिक अधिवास बऱ्याच ठिकाणी संकटात आले आहेत.
काही ठिकाण लोप पावले आहेत व काही ठिकाण संपुष्टात येण्याच्या मार्गावर आले आहेत, ते वाचण्यासाठी लोक जनजागृती होणे गरजेचे आहे. लोकांना ह्या गोष्टीच आजुन पाहिजे तस गांभीर्य नाही. ज्याप्रमाणे कुठे झाड तुटत असतील आपण झाड वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याच अनुषंगाने अशी नैसर्गिक कमळ व कुमुदिनी चे ठिकाण सुरक्षीत करुन वाचवण्याची नितांत गरज आहे.
दुसरा भाग म्हणजे, कमळ शेती विषयी प्रबोधन करणे हे आहे. निसर्गाचा ह्य ठेव्याचे आपल्या क्षेत्रात आदिवास वाढवून चांगल्या प्रकारे शेती केली जाऊ शकते. यांच्यापासून खाद्य उद्योग उभे राहू शकतात कमळ काकडी ,पान, फुलं ,बिया,यापासून लोणचे, वेफर्स, कमळकंद(गुलकंद), आसे विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवता येतात व ती सर्व पौष्टिक आहेत.
अनेक प्रकारच्या शारीरिक तक्रारीत औषधी उपयोग. कमळाचे वेगवेगळ्या भागापासून आयुर्वेदात औषध निर्मिती करतात. म्हजेच आजुन चांगल्या प्रकारेऔषध उद्योग उभे राहु शकतात. काही सौंदर्य प्रसाधना मध्ये पण कमळाचा वापर केला जातो. अश्या सर्व उद्योगांना कच्चा माल कमळ शेतीतून उपलब्ध केला जाऊ शकतो. म्हणजेच निसर्ग संवर्धना बरोबर कमळ शेती उपजीविकेच एक चांगले साधन होवु शकते. कमळ बागेत वेळोवेळी अभ्यास दौरे घेऊन ह्या विषयी प्रबोधन करण्यात येणार आहे.