जिंदा, है तो, प्याला, पूरा भर दे …२०१३मध्ये झळकलेल्या ‘भाग मिल्खा भाग ” नावाच्या चित्रपटाचे लेखक आहेत प्रसून जोशी. हिंदी साहित्य, सिनेसृष्टी यांच्यातील दिग्गज नाव. नामवंत धावपटू मिल्खासिंग यांच्यावर हा चित्रपट निघाला होता. दिग्दर्शक होते राकेश ओमप्रकाश मेहरा. त्या चित्रपटात प्रसून जोशी यांनी हे गाणे लिहिले होते. प्रत्यक्षात मिल्खासिंग यांचे जगणे कसे होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मिल्खासिंग आयुष्य भरभरून जगले. परवा कोरोनाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले तेव्हा त्यांचे वय ९१ होते. परंतु, अजूनही खूप जगण्यासारखे आहे, जीवन आनंदी आहे,” हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांच्या पत्नी निर्मल कौर या ८५ वर्षांच्या. त्या स्वतः व्हॉलीबॉल चॅम्पियन व संघाच्या कर्णधार होत्या. दोघेही मनाने तरुण होते. निर्मल कौर यांचे मिल्खासिंग जाण्याच्या पाचच दिवस आधी कोरोनामुळेच निधन झाले.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
ashok.panvalkar@gmail.com