बुधवार, ऑक्टोबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – ज्ञानेश सोनार यांची कथामाला – विठ्ठलाच्या पायाशी चक्क तासभर

जुलै 9, 2022 | 9:48 pm
in इतर
0
IMG 20220709 WA0003

 

विठ्ठलाच्या पायाशी चक्क तासभर

ज्या विठोबाच्या दर्शनाला लाखोंची गर्दी उसळते. ज्या पंढरपुरी जाऊन दर्शनही मिळत नाही त्या देवाच्या समीप मी व पत्नी अनुराधा चक्क तासभर होतो. जवळपास कुणीही नव्हते. असे घडणे केवळ स्वप्नवत. मात्र हे खरे आहे. मूर्ती पाहता पाहता डोळे भरून येत होते. पटकन डोळे पुसून ते रूप डोळ्यात सामावून घेत होतो. त्यांच्या पायाला स्पर्श केला तर ते सजीव असल्याचा प्रत्ययही आला. हे घडले कसे ऐकण्यासारखे आहे.

Dnyanesh sonar
ज्ञानेश सोनार
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि लेखक
मो. 9860050016

” तिरक्या रेषा हसरे बाण ” हा माझा व्यंगचित्र प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम खूप लोकप्रिय होता. महाराष्ट्रभर साडेतीन हजार कार्यक्रम मी केले. हजारो लोकांना मनसोक्त हसविले. असाच एक कार्यक्रम सोलापूरला एका नामांकित बँकेतर्फे होणार होता. गणपतीत तेथे दहा दिवस व्याख्याने होत. सहाच्या ठोक्याला पाचशे लोक प्रशस्त हॉलमध्ये हजर असत नंतर प्रवेश नसे. बॅंकेतर्फे जाणे, येणे, रहाणे व सोलापुरी चादर भेट म्हणून मिळे. मानधन नाही. बँकेत कार्यक्रम करायला मिळणे प्रतिष्ठेचे मानले जाई. मी दोन वर्ष मानधनासाठी हटून बसलो. शेवटी बँकेने मानधन कबूल केले. मी सपत्नीक सोलापूरला गेलो. सरकारी अतिथीगृहात उत्तम सोय झाली. बँकेचे एक कार्यवाह म्हणाले,’पाचसहाशे श्रोते पाहून येथे भल्या भल्या वक्त्यांची तारांबळ उडते. बघा बुवा.!” माझे मानधन त्यांना स्पष्ट खुपलले दिसत होते.

सहा वाजता गच्च भरलेल्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरु झाला. माझे नाव खूप झालेले असल्याने खालच्या हॉलमध्ये सुद्धा गर्दी झाली होती. १९९८ साल असावे. क्लोज सर्किट टीव्ही जन्माला आलेला नव्हता. म्हणून स्पीकर्स लावलेले होते. स्टेज शेजारी गणपती मूर्ती होती. माझ्या शो प्रथेप्रमाणे मी एक मिनिटांत गणपती रेखाटला. ती पहिली फोर होती. त्यानंतर व्यंगचित्रे विनोद याच्या सिक्स, फोर पडत होत्या.

खालच्या हॉलमधील लोकांना दीड तास टाळ्या व हास्यस्फोट ऐकू येत होते. बँकेच्या प्रथेप्रमाणे एक तासात कार्यक्रम संपायला पाहिजे तो दीड तास चालला. दुसरे दिवशी तेच कार्यवाह सर्किट हाऊस मध्ये आले व म्हणाले, “तुम्ही मानधन घेता हे अत्यंत उचित आहे. बँकेने प्रथमच असे हास्यस्फोट अनुभवले. पुढे ते म्हणाले, तासभर अंतरावर पंढरपूर आहे. जीप देतो उभयता जाऊन या. मनातून मी अनुत्सुक होतो. पंढरपुरातील प्रचंड गर्दी, रांगाच रांगा, ताटकळणे नको वाटे. बायको म्हणाली, जाऊ या ना देवाचे दर्शन तरी होईल. जराशाने जीप घेऊन ड्रायव्हर हजर झाला.

मजल दरमजल करीत जीप पंढरपुरात पोहोचली. बाजारपेठेतून पुढे गेलो. गर्दी फारच तुरळक होती. लाखो वारकऱ्यांनी गजबजलेले हेच का ते पंढरपूर ..प्रश्न पडला. चालत चालत मंदिरात पोचलो. अजिबात गर्दी नव्हती. इतरवेळी गर्दीत रमलेले विठूराय एकटेच कमरेवर हात ठेवून जणू आमची वाट पाहत उभे होते.
॥ युगे अठ्ठावीस ..कर कटेवरी घेऊन विटेवरी उभा॥ फक्त ऐकले होते. मूर्ती जवळ गेलो. जे मुख मंडळ पाहण्यासाठी भाविक प्राण कंठाशी आणतात ते एकटक पाहत पायांना स्पर्श केला. खळकन डोळ्यांत पाणी आले.” भेटीलागे जीवा” अस आर्तपणे आळवणा-या तुकोबाचा, विटेवर उभा करणा-या नामदेवाचा, संत एकनाथांचा, दळण दळता दळता उस्फु्र्तपणे ओव्या रचणा-या जनाबाईचा, सोपान, मुक्ता, निवृत्ती ज्ञानदेवांचा प्रियसखा मी पहात होतो. सात जन्म घेतले तरी दर्शन दुर्लभ असा विठुराया अगदी एकटा मला दिसत होता. ही लाखों वारक-यांची मालमत्ता उचलून पळवून न्यावी, असे मनातही आले.

एव्हाना अनुराधा फळाफुलांची ओटी घेऊन आली. देवाला हार फुले, हळदीकुंकू वाहिले. डोळ्यातलं पाणी मला दिसू नये, मी हसेल म्हणून तिने ओंजळीत चेहरा घेऊन देवांना नमस्कार केला. तिला माहितीच नव्हते की मी आधीच देवांच्या पायी अश्रू वाहिले होते. दोघंही शांतपणे खाली बसलो. देवांना दंडवत घातला. मात्र नजर हटत नव्हती. दुपारचा दीड वाजला होता. म्हणजे जवळपास तासभर आम्ही कोट्यवधी भक्तांच्या प्रिय सख्या समोर अबोल बसलो होतो. मन श्रांत होते. जगण्यातला अत्युच्च क्षण अनुभवीत होतो. क्षणभर मनात विचार आला जीवन मुक्तीचा हाच क्षण तर नव्हे.. तुकोबांनी म्हटलंय ना ” लई न्हाई मागण देवा शेवटचा दिस गोड व्हावा”असाच क्षण तर आम्ही अनुभवी नव्हतो?

आता या भेटीची उकल सांगतो, महालक्ष्मी गौरी चा तो दुसरा दिवस होता. ज्येष्ठा लक्ष्मी कनिष्ठा लक्ष्मी या बहिणीकडे पुरणपोळीचे जेवण करायला येते. ती महालक्ष्मीच्या जेवणाची वेळ होती. म्हणूनच सर्व बडवे मंडळी, पूजाधिकारी जेवणासाठी घरी गेलेले होते. असे आजूबाजूच्या माहीत गारांनी सांगितले. देवांचे सोळा खांबी मंदिर, एकनाथांच्या पणजोबांची भानुदासांची समाधी पाहिली. विजयनगरच्या कृष्णदेवरायांनी विठोबारायांच्या प्रेमात पडून मुर्ती विजयनगरला नेली होती. त्यांचे कडून पुन्हा पंढरपूरला भानुदासांनी आणली होती.
देवांच्या मागच्या बाजूस रुक्मिणी माईचे मंदीर आहे. त्यांचे दर्शन घेतले. त्यांचा चेहरा अत्यंत सुंदर, लोभसवाणा आहे.

गोकुळची राधा द्वारकेस प्रथमच आली होती. कृष्ण दर्शन होताच आवेगाने ती पुढे झाली. व झोपाळ्यावर बसलेल्या कृष्णाच्या डाव्या मांडीवर जाऊन बसली. दोघे अखंड बडबड करू लागले. गावाकडच्या गप्पांमध्ये रंगून गेले. हे रुक्मिणीला काही आवडले नाही कारण ती पट्टराणी होती. मग काय रात्रभर दणक्यात भांडण. कृष्णाने डोक्यात राख घातली व थेट पंढरपुर गाठले. शोधत शोधत रुक्मिणीदेवी तेथे पोहोचल्या पण अद्याप अबोला मिटलेला नाही. अशा अनेक छोटय़ा मोठय़ा कथा कथाकार सांगतात. देवींना हात जोडून म्हटले,”माई आता सोडून द्या ना रुसवा” !  ‘आधी त्यांना सांग.. ‘ असं कुणीतरी बोलल्याचा भास मला झाला. पुन्हा एकदा देवरायांचे दर्शन घेतले.

कृतार्थ मनाने..!अशी ” भूतो न भविष्यती” गळाभेट देवांशी झाली. आता आषाढी सुद्धा देवांना भेटण्यासाठी आतुर झाली आहे. विठुरायाच्या सावळ्या रंगाचे ढग आकाशी आणि हजारो वारकऱ्यांच्या दिंडी पताका नी भरगच्च लेला महासागर घेऊन. आमच्या लहानपणी लताबाईंचे एक भावगीत होते पी सावळाराम यांनी लिहिलेले
“विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला॥ तुळशी माळ घालूनी गळा कधी नाही कुटले टाळ ।
पंढरीला नाही गेले चुकूनीया
एक वेळ।
देव्हाऱ्यात माझे देव त्यांनी केला प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला” . आज कित्येक शतके सर्वसामान्य भाविकांची हीच भावना. पूर्वी रस्ते नव्हते, अन्न, निवारा नसायचे, वाहने नव्हती त्यामुळे अनेकांना कधी जाताच आले नाही. म्हणून आज ना उद्या विठ्ठल आपल्याला भेटायला येईल या आशेवर हजारो भावीक जगत आलेत. अशा या मसहामाऊलीने आम्हाला एकांती पायाशी बसवून मन अतृप्तसे राहील इतकी भेट दिली हे पुण्य कुठले?

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय जैन संघटनेच्या राज्याध्यक्षपदी नंदकिशोर साखला यांची निवड

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १० जुलै २०२२

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - १० जुलै २०२२

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011