इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी
जगातील सर्वांत मोठे महाबली हनुमान!
महाबली हनुमानाची भक्ती रामाच्या काळापासून केली जाते. हनुमान हा असा देव आहे जो लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हनुमान चिरंजीव आहे. शक्तिशाली आहे. महाबली महापराक्रमी आहे. ह्नुमानाची असंख्य मंदिरं भारतात आणि परदेशांत देखील आहेत. हुनमानाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हनुमान सूक्ष्म रूप घेऊ शकतो तसेच प्रचंड महाकाय देखील होऊ शकतो.
हुनमानाच्या शक्तीचे आणि प्रचंड मोठ्या आकाराचे भक्तांना आकर्षण आहेच. त्यामुळेच हनुमान भक्तांनी देशांत हनुमानाची मोठ मोठी मंदिरे बांधली आहेत. तसेच अनेक ठिकाणी ह्नुमानाच्या मोठ मोठ्या अवाढव्य मूर्ती देखील स्थापन करण्यात आल्या आहेत.
‘इंडिया दर्पण’च्या ‘राउळी मंदिरी’ या सदरांत यावेळी आपण हनुमानाच्या जगातील सर्वांत मोठ्या मुर्तींचा परिचय करुन घेणार आहोत. आपल्या देशांत हनुमानाच्या अनेक मूर्ती आहेत. यातील काही मूर्ती अतिशय उंच आणि मोठ्या आहेत. मात्र सध्या जगातली हनुमानाची सर्वांत उंच मूर्ती आंध्रप्रदेशांत आहे. आंध्रप्रदेशांतील विजयवाड़ा या मोठ्या नगरा जवळच ही महाकाय हनुमान मूर्ती आहे.
विजयवाड़ा पासून ३० किमी अंतरावर विजयवाड़ा हैदराबाद या 9 नंबरच्या नेशनल हाय वे वर ‘परिताला’ नावाचे एक शहर आहे. येथे हनुमनाचे एक प्राचीन मंदिर आहे. त्याच ठिकाणी जगातली सर्वांत मोठी हनुमान मूर्ती स्थापन करण्यात आली.
हनुमानाची जगातली सर्वांत मोठी असलेली ही मूर्ती परिताला अंजनेय नावाने प्रसिद्ध असली तरी स्थानिक भाषेत ती वीर अभय अंजनेय हनुमान स्वामी ‘ म्हणूनच ओळखली जाते. हनुमानाची ही मूर्ती १३५ फूट म्हणजे ४१ मीटर उंच आहे. ही मूर्ती कॉंक्रिट पासून तयार करण्यात आली असून २२ जून २००३ पासून ही मूर्ती भाविकांना दर्शन देत उभी आहे. वीर अभय अंजनेय हनुमान स्वामी मंदिराचा परिसर आंध्रप्रदेश सरकारने पर्यटकांसाठी विकसित केला आहे. आंध्रप्रदेश पर्यटन विकास विभागाचे हे एक महत्वाचे पर्यटन स्थान आहे. त्यामुले येथे येणारया पर्यटकांना येण्याच्या निवासच्या खाण्याच्या सर्व प्रकारच्या उत्तम सुविधा येथे निर्माण करण्यात आल्या आहेत. येथे राम सीता लक्ष्मण, देवी तसेच हनुमान मंदिरं आहेत. ह्नुमनाचे मूळ मंदिर लहानसे असून प्राचीन आहे. नवीन परिसर मात्र खुपच आकर्षक करण्यात आला आहे.
नॅशनल हाय वे ९ वरून दुरूनच ही भव्य मूर्ती लक्ष्य वेधून घेते. वीर अभय अंजनेय हनुमान स्वामीची मूर्ती उभी असून तिच्या डाव्या हातांत गदा धरलेली आहे. तर उजवा हात अभय मुद्रेत आहे. ही मूर्ती एवढी अवाढव्य आहे की ती पहिल्या बरोबर शब्द बाहेर पडतात,”अबब! केवढा मोठा आहे हा हनुमान!” हनुमान मूर्ती भोवती नारळाची मोठ मोठी झाडं आहेत पण ही उंच झाडं हनुमान मूर्तीच्या गुढ़घ्याच्याही पेक्षा लहान दिसतात. त्यामुळे तर मुर्तीची भव्यता अधिकच भासते.
संपर्क: Paritala Mandal Kanchikariam, Andhr Pradesh- 521180, Mob. 9848194497
column rauli mandiri worlds tallest hanuman by vijay golesar