शुक्रवार, सप्टेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – चिदंबरमचे नटराज मंदिर (आकाश तत्त्वाचे प्रतिक!)

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 27, 2021 | 5:21 am
in इतर
0
natraj temple

पंच भूत स्थलम् – पांचवे शिवमंदिर
चिदंबरमचे नटराज मंदिर
(आकाश तत्त्वाचे प्रतिक!)

चिदम्बरम येथील शिवमंदिराला नऊ दरवाजे असून ते शरीरातील नऊ व्दाराचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे २८ खांब, ६४ बीम, २१,६०० सोनेरी टाईल्स आणि ७२,००० सुवर्ण खिळे हे शरीरातील विविध भागांशी संबंधित अवयव आहेत. तामिळनाडूत पंच महातत्वांपासून तयार झालेली पाच मोठी शिवमंदिरे हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. यात चिदम्बरम येथील नटराज मंदिर जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. पंच महा भूतातील आकाश तत्वाच्या रुपांत शिवाने येथे वास्तव्य केलेले आहे. या मंदिरातील स्फटिक शिवलिंग हे आकाशाचे प्रतिक समजले जाते.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

तामिळनाडूच्या पूर्वेला चिदम्बरम येथे थिलाई नटराज मंदिर या नावाने हे स्थान विख्यात आहे. जगभरातील शैव पंथियांची ही दुसरी काशीच समजली जाते. संस्कृति आणि कला यांचा संगम येथे झालेला आहे. प्राचीन काळातील पल्लव, चोला, पंडया विजयनगर आणि चेरा राजघराण्याच्या राजकर्त्यांनी हे मंदिर बांधले असून त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. आनंद तांडव करणारे भगवान शिव येथे नटराजाच्या रुपांत येथे पहायला आणि पुजायला मिळतात.

नटराज येथे कसे आले
भगवान शंकर येथे कसे आले याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा भगवान शंकर थिल्लाई वनांत फिरत होते. तेथे काही ॠषि आपल्या बायकांसह राहत होते. या ॠषिंचा जादूटोण्यावर विश्वास होता. जादूटोणा करुनच भगवत्प्राप्ती होऊ शकते अशी त्यांची श्रद्धा होती.
भगवान शंकर आणि मोहिनी रुपांत भगवान विष्णू त्या घनदाट जंगलात फिरत होते. त्यांना पाहून ॠषींचा समूह जोरजोरात मंत्रजप करू लागला.त्यांनी मंत्र सामर्थ्याने काही सांप भिक्षुकांवर सोडले. त्या सर्पांना पाहून भगवान शंकर हसले. त्यांनी सगळे सर्प आपल्या गळया भवती तसेच कमरेला गुंढाळून घेतले. यानंतर ॠषींनी मंत्र सामर्थ्याने एक भयंकर वाघ भगवान शिवशंकरावर सोडला. भगवान शंकरांनी वाघाचे कातडे आपल्या कमरे भोवती परिधान केले. यानंतर चिडलेल्या ॠषिंनी एक हत्ती भगवंतावर सोडला. शिवाने त्यालाही ठार केले. एवढ्यावरही ॠषिंचा समूह थांबला नाही. त्यांनी आपल्या जादूने ‘मुयालाकन’ नावाचा राक्षस तयार करून भिक्षुकावर युद्ध करण्यासाठी पाठविला.

राक्षसाला पाहून भगवान शंकर हसले त्यांनी क्षणार्धांत राक्षसाला जमिनीवर पालथे पाडले आणि त्यांवर ते उभे राहिले. त्यामुळे राक्षस थोडाही हलू शकेना. काही वेळाने भगवान शिवाने त्या मुयालाकन राक्षसाच्या पाठीवरच ‘आनंद तांडव’सुरू केले. हे पाहिल्यावर ॠषिंचे डोळे उघडले. हा भिक्षुक काही साधा नाही याची त्यांना जाणीव झाली. ते भगवंताला शरण गेले. भगवंताचे गुणगान गावू लागले.यानंतर भगवान शंकरानी त्या ॠषिंना आपले मूळ रूप दाखविले. ॠषिं समूहाने पत्नीसह भगवंताची माफ़ी मागितली. भगवंताच्या प्राप्ती साठी जादूटोण्याची गरज नसते याची त्यांना जाणीव झाली. या प्रसंगाची आठवण म्हणून येथे भगवान शंकरांची नृत्य करणार्या नटराजाची स्थापना करण्यात आली आहे.

अति विशाल आणि वैभवशाली देवस्थान
चिदम्बरम येथील शिव मंदिर शहराच्या मध्यभागी ४० एकर जागेवर बांधलेलं आहे.भगवान शंकरांप्रमाणेच शिवकाशी अम्मान,गणेश, मुरुगण आणि विष्णु यांची भव्य मंदिर आहेत. येथील मुख्य मंदिराचे शिखर सोनेरी असून चोला राज्यकर्ते परान्तक याने इ.स. ९०७ ते ९५० च्या दरम्यान या मंदिरावर शिखर चढविले आहे.या मंदिराला राजराजा चोला प्रथम, कुलोथुगा चोला, तसेच कुन्दावाई द्वितीय, विक्रम चोला या राजांनी सदैव भरघोस दान केलेले असल्यामुळे दक्षिणेतील पद्मालय मंदिरापेक्षाही चिदम्बरम येथील नटराज मंदिर वैभवशाली आहे.

हे मंदिर केवळ प्रेक्षणीयच आहे असे नाही तर याची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. या मंदिराचे स्थान पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवावर आहे. पंच महा भूतांचे प्रतिनिधित्व करणारी कलाह्स्ती,कांचीपुरम आणि चिदम्बरम ही तीन मंदिरं एकाच सरळ रेषेत आहेत हाही एक अनोखा योगायोग आहे. या मंदिराला नऊ दरवाजे असून ती शरीरातील नऊ व्दाराचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे २८ खांब ६४ बीम २१,६०० सोनेरी टाईल्स, ७२,००० सुवर्ण खिळे हे शरीरातील विविध भागांशी संबंधित अवयव आहेत. याच क्रमाने इथला पुढचा मंडप १८ खांबांचा असून तो १८ पुराणांचे प्रतिक समजला जातो. मंदिराला ९ दारं असून चार गोपुरं आहेत. ही गोपुरं सात मजली आहेत. मंदिराची भव्यता,वास्तुकला आणि हजारो मुर्त्या हजारो वर्षांपासून सर्वांना प्रभावित करीत आहेत. विविध प्रकारच्या वास्तुकलेने चिदम्बरम मंदिर साकार करण्यात आले आहे.

मंदिर समुहाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहात भगवान शिवाची नटराज मूर्ती आणि पार्वती (शिवाकामी) यांच्या मूर्ती आहेत. भगवान शंकराच्या मंदिरात दर्शन व पूजेसाठी सहसा शिवलिंग असते. चिदम्बरम येथे मात्र भगवान शंकर नटराजाच्या मानवी रुपांत नृत्य करतांना पहायला मिळतात हे दुर्मिल आहे. या भवनाला ‘चित्रसभा’ म्हणतात.याच्याच बाजूला ‘कनकसभा’ आहे.या दोन्ही सभा उंचावर आहेत. आतल्या प्राकारात नटराजाच्या नैॠत्येला गोविन्दराज पेरूमल यांचे मंदिर आहे.

येथील सर्वांत प्रमुख व पवित्र मंदिर चित्रसभा पूर्णपणे लाकडांपासून बनविलेले आहे. चित्रसभेचे सर्व खांबही लाकडी आहेत.चित्रसभेचे छत एखाद्या झोपड़ीसारखे दिसते.या सभेत नटराज आणि शिवाकामी यांच्या अरूप मूर्ती आहेत.यातील एक मूर्ती लाल रंगाच्या तर दूसरी मूर्ती काळया रंगाच्या पडद्या समोर आहेत.फक्त पूजेच्या वेळीच येथील दीपक लावतात.भगवान शिवाच्या उजव्या बाजूला चिदम्बर रहस्य म्हणजे ‘विल्व वृक्षाची पानं’ ठेवलेली आहेत. याच चित्रसभेत रत्नसभापती, चंद्रमौलिश्वराचे स्फटिक शिवलिंग,स्वर्णा कर्शान भैरावर,मुखालिंगम यांच्याही मूर्ती आहेत.
चित्रसभेच्या अगदी समोर कनकसभा आहे.दोन्ही सभा उंचावर आहेत.मात्र चित्रसभा कनकसभेपेक्षा एक मीटर उंच आहे. येथे पाच पायऱ्या चढाव्या लागतात. पायर्या चढतांना पंचाक्षर मंत्र जपण्याची प्रथा आहे.

नटराज मंदिराप्रमाणेच येथे नृत्य सभा आहे. या नृत्यसभेत भगवान शिवाची उर्ध्व तांडव मूर्ती आहे.या नृत्यात भगवान शिवाने देवी कालीवर विजय मिळविला होता. याच सभेत भगवान शिवाची सर्वेश्वर मूर्ती आहे. नृत्यसभा एखाद्या रथासारखी दिसते.या रथाला घोड़े जोडलेले आहेत. येथील देव सभेत सोमास्कंदर,पार्वती, विनायक,सुब्रमण्य आणि चंदिकेश्वर यांच्या पंचमूर्ती तसेच इतरही देवमूर्ती आहेत.दुसर्या प्राकारांत मुलान्थर रुपांत भगवान शिवाचे लिंग स्थापन केलेले आहे.

बाहेरच्या प्राकारात उजव्या बाजूला शिवकामी अम्मान देवीचे मंदिर, शिवगंगा तलाव आणि १००० खांबाचा सभा मंडपआहे. उत्सव काळात नटराजाची मूर्ती येथे आणतात.शिवकामी अम्मानचे भव्य मंदिर उजव्या बाजूला असून मुख्य मंडपाच्या छतावर नायक राज्यकर्त्यांच्या वेळी बनविलेली पेंटिंग पहायला मिळते. मंदिराच्या भिंतीवर नर्तक,नगारे वादक,संगीतकार यांच्या प्रतिमा आहेत. येथील सर्वांत मोठे भवन रथासारखेच दिसते.याच्या प्रवेशव्दारावर दोन हत्ती आणि बाजूला अनेक नर्तक दिसतात. पंडया राज्यकर्त्यांच्या राजवटीत बनविलेले सुब्रमण्यम मंदिर प्राकाराबाहेर आहे. येथील भवन १०० स्तंभांचे आहे.सुब्रमण्यम मंदिरही रथाच्या आकारात बनविलेलेअसून यामंदिराला पंडया नायकम असेच म्हणतात.

चिदम्बरम मंदिराची चारी दिशांची गोपुरं अतिशय भव्य आणि सुंदर आहेत.प्रत्येक गोपुर २५० फूट उंच असून प्रत्येक गोपुराला सात मजले आहेत. मंदिराच्या पश्चिमेला सर्वांत प्राचीन स्तंभ असून या स्तंभावर नृत्यशास्त्रातील भरत नाट्यम या नृत्यप्रकाराच्या १०८ नृत्य मुद्रा दाखविलेल्या आहेत. मंदिरंतील खांबांवर हिंदू धर्माशी निगडित अनेक प्रसंग चित्र बनविलेली आहेत.प्रत्येक गोपुरंवर भगवान शिवाचे भिक्षाटन,कंकाल,कल्याणसुंदर,सोमास्कंदर आदि रूपं दखाविलेली आहेत. चिदम्बरम मंदिरांत वर्षभर अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. येथे भगवान शिवाची पूजा सहा प्रकारे केली जाते. संपूर्ण वर्षांत सहा वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात.त्या प्रत्येक प्रसंगी लाखो भाविक मंदिरांत येतात.

कसे जावे
चिदम्बरम देशातील सर्ब प्रमुख शहरांशी रेल्वे आणि बस मार्गांनी जोडलेले आहे. त्रिचनापल्ली येथील विमानतळ चिदम्बरम पासून १२८ किमी अंतरावर आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता! पॉर्नहबवर चक्क गणिताचे क्लास; दरवर्षी दोन कोटींची कमाईही! कसं काय

Next Post

सर्वोच्च न्यायालयाने बार असोसिएशनला फटकारले; पण का?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात एलआयसीच्या या अधिका-याला दिली ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 5, 2025
IMG 20250904 WA0382 1
संमिश्र वार्ता

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव….परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

सप्टेंबर 5, 2025
CM
संमिश्र वार्ता

आता राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ …१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

सप्टेंबर 5, 2025
A90 LE KV e1757035342319
संमिश्र वार्ता

आयफोनसारख्या डिझाईनसह हा फोन लाँच….६,३९९ रुपये आहे किंमत

सप्टेंबर 5, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना आता इतकी मुदत…

सप्टेंबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
Next Post
SC2B1

सर्वोच्च न्यायालयाने बार असोसिएशनला फटकारले; पण का?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011