मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – जगन्नाथपुरी मंदिर

मे 27, 2021 | 12:29 am
in इतर
0
jagannath 4

जगन्नाथपुरी मंदिर

भारताच्या पूर्व किनार्यावर ओरिसा राज्यात वसलेलं ‘जगन्नाथपुरी’ किंवा ‘पुरी’हे चारधाम यात्रेतलं दुसरं महत्वाचं धाम. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दर्शनासाठी आणि जून-जुलाई महिन्यात होणार्या त्यांच्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी देशातुंनच नाही तर सगळ्या जगातून लाखो भाविक आणि पर्यटक जगन्नाथपुरीला येतात.
vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७
प्राचीन काळी येथे जगान्नाथाच्या ऐवजी ‘नीलमाधव’ या देवाची पूजा केली जात होती. विश्ववसू नावाचा आदिवासी जमातीचा राजा अतिशय निबिड़ आरण्यात असलेल्या नीलमाधव नावाच्या देवाची पूजा करीत असे. इन्द्रधुम्न नावाच्या राजाला या देवताबद्दल थोड़ी माहिती मिळाली. या दैवाताची सर्व माहिती आणि पूजाविधिविषयी जाणुन घेण्यासाठी त्याने विद्यापती नावाच्या ब्राह्मण तरुणाला विश्ववसुकड़े पाठविले.ही सर्व माहिती मिळविण्यासाठी विद्यापतीने विश्ववसुची कन्या ललिता हिच्याशी विवाह केला.
विश्ववसू जावयापासून आपली इष्ट देवता आणि तिचा पूजाविधि कसा लपवून ठेवणार? शेवटी विद्यापतीचे डोळे एका फडक्याने पक्के बांधून विश्ववसूने त्याला घनदाट जंगलातील गुहेत असलेल्या नीलमाधव मंदिरांत नेले. विद्यापतीही काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता त्याचे जरी डोळे बांधलेले होते तरी हात मोकळेच होते. जातांना तो एका विशिष्ट धान्याचे दाणे वाटेने टाकत गेला. विद्यापतीने निलमाधवाची मूर्ती पहिली.पूजाविधी पहिला.परत येतांनाही त्याला डोळे बांधूनच परत आणले.परंतु त्याने वाटेत टाकलेल्या धान्याने आपले काम केले. काही दिवसांनी सर्व रस्त्याने ते विशिष्ट धान्य दिसू लागले. त्याचाच आधार घेउन विद्यापतीने राजा इन्द्रधुम्नला त्या गुहेत नेलं. पण राजाला पाहून नीलमाधव तिथेच वाळूच्या खाली गुप्त झाले.
राजा इन्द्रधुम्नही जिद्दी होता. तो म्हणाला, ‘जोपर्यंत नीलमाधव मला दर्शन देणार नाही तो पर्यंत मी नील पर्वतावरच आमरण उपोषण करीन.’ देवाने त्याला सांगितले, ‘योग्य वेळी मी तुला दर्शन देईन. त्यानंतर राजा त्याच्या राज्यात परत गेला आणि त्याने तिथे अतिशय भव्य विशाल असे मंदिर बांधले. या मंदिरांत नारदाने दिलेली नृसिहाची मूर्ती स्थापन केली. नंतर मग इन्द्रधुम्न राजालाच स्वप्नात दृष्टांत झाला. जगान्नाथाने समुद्राच्या काठावरील सुगंधी वृक्षापासून जगन्नाथ,बलभद्र,सुभद्रा आणि सुदर्शन चक्र यांच्या मूर्ती कशा तयार करायच्या ते त्याला सांगितले.देवाच्या सुचनेनुसार राजाने समुद्राकाठच्या सुगंधी वृक्षापासून मूर्ती तयार करवून घेतल्या आणि याच मुर्तिंची प्रतिष्ठापना या मंदिरांत केली.

E2CSXA9UcAI3aAr

जगन्नाथपुरी म्हणजे भगवान कृष्णाचं किंवा भगवान विष्णुंचे जागृत स्थान मानले जाते. वैष्णवांच्या दृष्टीने हे फारच महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते.गौडीय वैष्णव पंथाची स्थापना करणारे चैतन्य महाप्रभु अनेक वर्षे जगन्नाथ पुरीलाच राहात होते.
जगन्नाथाचं मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर ४००,००० वर्ग फूट (३७,००० मीटरवर्ग) परिसरात पसरलेल आहे.कलिंग शैलीतील हे मंदिर भारतातल्या भव्य मंदिरांपैकी एक आहे. मुख्य मंदिर २१४ फूट म्हणजे ६५ मीटर उंचीच्या चबुतर्यावर उभारलेल आहे. मुख्य मंदिराभोवती २० फूट उंचीची संरक्षक भिंत बांधलेली असून सोळा किनारे असलेला एकाच सलग दगाडातून साकारलेला स्तंभ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूंना दोन सिंह कोरलेले आहेत. त्यामुळे या प्रवेशद्वाराला सिंहद्वार म्हणतात. जगन्नाथाचं हे मंदिर समुद्राच्या काठावर आहे.परन्तु सिंहद्वार ओलांडून मंदिरांत प्रवेश करताच समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येणे बंद होते. तसेच मंदिरातून सिंहद्वार ओलांडून बाहेर पडताच पुन्हा समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. हा एक चमत्कार समजला जातो.

jagannath 2

मंदिराच्या मुख्य कळसावर श्रीविष्णुचे आठ आर्यांचे सुदर्शन चक्र बसविण्यात आले आहे.यालाच नीलचक्र असेही म्हणतात. विशेष म्हणजे बाहेरून कोणत्याही दिशेने मंदिराकडे पाहिल्यास सुदर्शनचक्र आपल्या समोर असल्यासारखे दिसते. मंदिराचा ध्वज दररोज २१४ फूट उंचीवर उभारण्यात येतो. यात एकही दिवस खंड पड़त नाही.कारण यात खंड पडल्यास मंदिर १८ वर्षे बंद ठेवावे लागेल असे म्हणतात. या ध्वजाचे आणखी एक वैशिष्ट्ये  म्हणजे हा ध्वज नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेने फड़कत असतो.
या मंदिराच्या शिखरावर आणि मंदिर परिसरांत आजवर एकही पक्षी उडताना दिसला नाही. त्यामुळे मंदिरावरून विमानं किंवा हेलीकॉप्टर्स उडविण्यास परवानगी नाही. २१४ फूट उंचीच्या या भव्य मंदिराची सावली पड़त नाही हे देखील फार मोठे आश्चर्य मानले जाते. जगन्नाथ मंदिरातील भगवान जगन्नाथ,बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विशिष्ट लाकडाच्या ओंडक्यातून तयार करतात. दर बारा वर्षांनी या मूर्ती बदलतात.
जगन्नाथपुरी मंदिरातली रसोई किंवा स्वयंपाकघराचा  देशातल्या सर्वांत मोठ्या स्वयंपाकघरात समावेश होतो. एका दिवशी दोन लाख पेक्षा अधिक भाविक येथे प्रसाद ग्रहण करतात. ५०० आचारी आणि ३०० सहय्यक दररोज हा प्रसाद भोजन तयार करतात. मंदिरंतील रसोईत आजही लाकडी चुलीवर अन्न शिज्विले जाते.येथे  एकावर एक अशी सात मोठी भांडी अन्न शिजविण्यासाठी  ठेवतात. आश्चर्य म्हणजे यातील सर्वांत उंच भांड्यातील अन्नपदार्थ सर्व प्रथम शिजतात.त्यानंतर वरून दुसरे, तीसरे,चौथे, पाचवे,सहावे आणि सर्वांत शेवटी खालच्या भांड्यातील अन्नपदार्थ शिजतात.विज्ञानाच्या नियमाच्या  उलट प्रकार येथे दररोज घड़ताना दिसतो.
दर वर्षी आषाढ़ महिन्यातील शुक्लपक्षातील द्वितीये पासून म्हणजेच जून-जुलाई महिन्यात येथे मोठी रथयात्रा भरते.यावेळी भगवान जगन्नाथ,त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहिण सुभद्रा तीन वेगवेगळ्या रथातुन नगर यात्रेला निघतात. अक्षरशः लाखो भाविक या रथयात्रेत सहभागी होतात.

E2J1ycoUcAUPZ2F

काय पहाल 
जगन्नाथपुरीला जग्न्नाथाच्या सुप्रसिद्ध मंदिरा प्रमाणेच पुरीचा समुद्र किनारा,गोल्डन बीच, शंकराचार्यांनी स्थापन केलेले गोवर्धन पीठ नावाचा हिंदू मठ, स्वर्गव्दार म्हणजे ओरिसामधील सर्व प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतीस्थान, श्रीलोकनाथ मंदिर हे सुप्रसिद्ध शिव मंदिर येथे आहे. सुनारा गौरांग मंदिर, बेडी हनुमान मंदिर, चक्रतीर्थ मंदिर, मौसिमा मंदिर आणि श्रीगुंडीचा म्हणजे जिथे रथयात्रा संपते ते ठिकाण ही ठिकाणं आवश्य पहावीत. जगन्नाथपुरीत लोकल फिरण्यासाठी आटोरिक्षा आणि सायकल रिक्षा स्वस्त दरांत उपलब्ध आहेत.फक्त सुरुवातीला भाड़े ठरवून घ्यावे. भाड़े आधी ठरवून घेतले तर मतभेद ण होता धार्मिक विधि आनंदात व समाधानात पार पाडता येतात.
कसे जावे
जगन्नाथपुरी हे पूर्व रेल्वेचे महत्वाचे जंक्शन आहे.त्यामुळे दिल्ली, मुम्बई, कोलकत्ता, ओखा, अहमदाबाद, तिरुपति पासून सर्व एक्प्रेस आणि सुपरफास्ट रेल्वे येथे थांबतात. पुरीला जाण्यासाठी रस्तेही अतिशय चांगले आहेत.भुवनेशवर,कटक,कोणार्क या ठिकाणांहून बस व मिनी बस सतत सुरु असतात.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नावेळी नवरदेवाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; असा संपन्न झाला विवाह

Next Post

ठुमरी सम्राज्ञी गिरीजादेवी यांच्याविषयी या बाबी आपल्याला माहित आहेत का?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
DZzl2KuXkAkRrRw

ठुमरी सम्राज्ञी गिरीजादेवी यांच्याविषयी या बाबी आपल्याला माहित आहेत का?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011