इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– राऊळी मंदिरी –
दुबईत झाले भव्य हिंदू मंदिर!
दुबईतील ‘जेबेल अली’ नावाचे गाव विविध धर्मांच्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात ऑलरेडी सात चर्चेस, एक गुरुद्वारा आणि हिंदू मंदिर अस्तित्वात आहे. याच गावात आणखी एका अतिशय देखण्या आणि भव्य मंदिराचे विजयादशमीला लोकार्पण करण्यात आले आहे.
भारतीय लोकांना मुळातच दुबईचे आकर्षण आहे.दुबईचे विलासी जीवन तिथल्या गगनचुंबी इमारती, लक्झरियस होटेल्स यांचे गुणगान गातांना भारतीय लोक थकत नाहीत. दुबईच्या या वैभवात आता अतिशय देखण्या आणि भव्य हिंदू मंदिराची भर पडली आहे. महिनाभरापूर्वी विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर दुबईतल्या दुसर्या हिंदू मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे.
‘जेबेल अली’ मंदिरांचे गाव
दुबईतील ‘जेबेल अली’ नावाचे गाव विविध धर्मांच्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात ऑलरेडी सात चर्चेस, एक गुरुद्वारा आणि हिंदू मंदिर अस्तित्वात आहे. याच गावात आणखी एका अतिशय देखण्या आणि भव्य मंदिराचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे.
७०,००० चौरस फूट जागेवर उभारलेले हे मंदिर भारतीय आणि अरबी वास्तुशास्त्रानुसार निर्माण करण्यात आले आहे. २०१९ मध्ये या मंदिराची पायाभरणी करण्यात आली. करोना काळात देखील काम करून केवल दोन वर्षांतच हे मंदिर बांधून तयार झाले आहे.
सहिष्णुता, शांतता आणि सौहार्दाचे प्रतिक
दुबईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व व्यवहार मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान आणि अबुधाबीतील भारताचे राजदूत संजय सुधीर यांनी दुबईतील या नवीन हिंदू मंदिराचे लोकार्पण केल्याचे अबुधाबीतील भारतीय दुतावासाने प्रसिद्ध केले आहे. हे मंदिर म्हणजे सहिष्णुता, शांतता आणि सौहार्द यांचे प्रतिक असून संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील भाविकांसाठी ते मागच्या महिन्यात जयदशमीच्या दिवशी ५ ऑक्टोबर पासून खुले करण्यात आले आहे.
दुबई का पहला हिन्दू मंदिर जय श्री राम??https://t.co/MucEwfMwHp pic.twitter.com/A74OKzo5ap
— 100rabh SRIVASTAV? ? ( एक सनातनी)?? (@Chitransh57) September 22, 2022
१६ देवी देवतांची प्रतिष्ठापना
दुबईतील या दुसर्या नवीन हिंदू मंदिरात राम-सीता, राधा-कृष्ण, विष्णु-लक्ष्मी, शिव-पार्वती, ब्रह्मदेव, साईबाबा, हनुमान, शिवपिंडी ,दुर्गादेवी आदि १६ देवी देवता यांच्या मुर्तींची स्थापना करण्यात आली आहे.’गुरु ग्रंथ साहिब’ साठी स्वतंत्र विभाग असून तेथे ‘गुरु ग्रंथ साहिब’ची स्थापना करण्यात आली आहे.
लक्ष्यवेधी गुलाबी कमळ
हे नवीन हिंदू मंदिर दुमजली असून अतिशय कलाकुसर युक्त आहे. मंदिराच्या मुख्य सभागृहात थ्रीडी प्रिंटेड एक गुलाबी रंगाचे भव्य कमळ लक्ष्य वेधून घेते. विशेष म्हणजे सर्व घुमटांवर हे कमळ दिसते. यामुळे मंदिराच्या सौन्दर्यांत भरच पडली आहे.
पहिल्या मजल्यावर मोठे प्रार्थना गृह आहे. त्याच्या बाजूला लहान लहान आकाराची १६ देखणी मंदिरं बांधली असून त्यात ब्रह्मदेवासह १६ देवी देवतांची स्थापना करण्यात आली आहे.
दुबई में महादेव की गूंज।
दुबई स्थित हिन्दू मंदिर में भगवान शिव की आरती।#harharmahadev #harharmahadevॐ pic.twitter.com/MpcKXjQ9yG
— पवित्रा श्री मिश्रा ??? (@spavitra277) November 2, 2022
उपयुक्त ‘बैंक्वेट हॉल’
ग्राउंड फ्लोअरवर ४००० चौरस फुटांचा प्रशस्त ‘बैंक्वेट हॉल’ असून साखरपुडा, विवाह समारंभा प्रमाणेच अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी त्याचा उपयोग करण्यात येईल. याच्या बाजूलाच एक मल्टीपर्पज कक्ष आणि ज्ञान कक्ष तयार करण्यात आलेला आहे.
दुबईतील पहिले हिंदू मंदिर १९५८ साली बांधण्यात आले होते. त्यावेळ दुबईत ६००० भारतीय रहात होते आता ती संख्या ३३ लाखांवर गेली आहे. ‘बुर दुबई’ येथे असलेल्या या पहिल्या मंदिरांत भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
दुबईतील आध्यात्मिक हब
दुबईतील नवीन हिंदू मंदिर अमिरातीच्या ‘कोरिडोर ऑफ टोलरंस’ भागात बांधलेले असून हे हिंदू मंदिर सर्व धर्मांच्या लोकांसाठी आध्यात्मिक हब म्हणून उपयुक्त ठरेल, तसेच दुबईत जाणार्या भारतीय पर्यटकांना आपले वाटणारे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून निश्चित पसंत पडेल यात शंका नाही.
दुबई में खुला ये भव्य मंदिर देखा आपने? pic.twitter.com/pqZRt1b2ez
— BBC News Hindi (@BBCHindi) October 7, 2022
Column Rauli Mandiri Dubai Temple by Vijay Golesar