गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – ६१ फुटी बेलेश्वर महादेव!

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 17, 2021 | 5:03 am
in इतर
0
beleshwar mahadev1

६१ फुटी बेलेश्वर महादेव!

ओरिसातील गंजम जिल्ह्यांत भंजनगर जवळ ‘रसेल कोंडा’ नावाचा एक मोठ्ठा तलाव आहे. या तलावाकाठी वसविलेले बिजू पटनाईक चिल्ड्रन्स पार्क केवळ ओरिसातच नाही तर सर्व देशांत प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी भगवान शंकराची ६१ फूट उंचीची भव्य मूर्ती तयार करण्यात आल्यामुळे पर्यटकासाठी तसेच शिव भक्तांसाठी हे एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आले आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

भंजनगरचा रसेल कोंडा तलाव २५ स्क्वेअर मैल एवढा मोठा आहे. १८९४ पासून भंजनगर,बेहरामपुर (ब्रह्मपुर),आणि छत्तरपुर या तीन तालुक्यातील सर्व गावांची माणसं, जनावरं याच तलावाचे पाणी पितात. या परिसरातील शेती आणि लघुउद्योग याच तलावाच्या पाण्याने सुजलाम सुफलाम झाले आहेत. इतर गावाना जीवनदायिनी नद्या असतात. या परिसराचे जीवन रसेल कोंडा तलावाने बहारदार केले आहे. कदाचित याची जाणीव ठेवूनच भंजनगरच्या एरिगेशन विभागातील कर्मचारी व अधिकार्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतुन भगवान शंकराची ६१ फूट उंचीची मूर्ती घडविली.

ही खरंच कौतुकाची,अभिमानाची अभिनंदन करावी अशी गोष्ट आहे. खरं तर सरकारी खात्यातील कर्मचारी वर्गाची नेहमी अवहेलना केली जाते. त्यांच्यावर टीकेची एकही संधी समाज आणि मिडिया कधी सोडत नाही. परंतु भंजनगर एरिगेशन विभागाचे कर्मचारी याला अपवाद आहेत. भंजनगर एरिगेशन डिव्हिजन एम्प्लॉइज कल्चरल असोशिएशन ही त्यांची मान्यताप्राप्त रजिस्टरर्ड संस्था असून या संस्थेच्या माध्यमातुनाच त्यांनी हा विक्रम केला आहे.

भंजनगर एरिगेशन विभागाच्या या सांस्कृतिक मंडळात सध्या कार्यरत असलेले तसेच सेवानिवृत झालेले सर्व कर्मचारी सहभागी आहेत.२००६ पासून त्यांच्या या कार्याची सुरुवात झाली आहे. २००६ पासून भंजनगर एरिगेशन विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी दर महिन्याला आपला एक दिवसाचा पगार वर्गणीद्वारे जमा करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे ५ वर्षे आपल्या पगारातील पैसे जमा केल्यावर त्यांनी जवळच असलेल्या बेलेश्वर हिलवर भगवान शंकराची एक भव्य मूर्ती स्थापन करण्याचे ठरविले. या टेकडीवर असलेले श्री श्री बेलेश्वर महादेव मंदिर पूर्वी पासून प्रसिद्ध होतेच. शिवाय बिजू पटनाईक चिल्ड्रन्स पार्क मुळे हा परिसर नावारुपाला आलेला होताच. त्यात या देशातल्या सर्वांत उंच महादेव मूर्ती मूळे या स्थानाचे पर्यटन महत्व खुपच वाढले.

प्रचंड मोठी शिव मूर्ती तयार करण्याचे ठरविल्यावर जवळपास ३ वर्षे त्यांचे काम सुरु होते. मूर्ती तयार करण्याप्रमाणेच, मुर्तीची स्थापना करण्यासाठी टेकडी वर योग्य जागा निवडने,मुर्तीची स्थापना करण्यासाठी तेथे योग्य बांधकाम करणे.परिसरांत बगीचे व रस्ते तयार करणे.अशा कामासाठी तीन वर्षे लागली. २०१३ च्या महाशिवरात्रीच्या दिवशी बेलेश्वर टेकडी वर ओरिसातील सर्वांत उंच बेलेश्वर महादेवाच्या मुर्तीची यथासांग प्रतिष्ठापना करण्यात आली. भगवान शिवाच्या मूर्ती समोर त्याचे वाहन असलेला २१ फूट उंचीचा नंदी देखील स्थापन करण्यात आला.

या ठिकाणी भगवान शंकराची व्याघ्राजिनावर बसलेली ६१ फूट उंच चतुर्भुज मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. भगवान शिवाच्या मागील बाजुच्या उजव्या हातांत त्रिशूल असून डाव्या हातात डमरू आहे. पुढच्या उजव्या हाताने ते भाविकांना आशीर्वाद देत असून डावा हात कुबड़ीवर टेकविलेला आहे. भंजनगर महादेव मंदिराचा हा सर्व परिसर निसर्ग संपन्न,सुंदर व शांत असून येथे फिरताना शेगाव येथील श्री गजानन संस्थान आणि आनंदसागर तलाव परिसराची आठवण येते. आजही बेलेश्वर महादेवाची ही मूर्ती ओरिसातील प्रथम क्रमांकाची सर्वांत उंच शिव मूर्ती असून देशातील सर्वांत उंच १० शिव मूर्ती मध्ये तिचा समावेश होतो. भंजनगरच्या भगवान शिवाच्या मुर्तीची स्थापना व देखभाल येथील एरिगेशन विभागाच्या सांस्कृतिक मंडळाद्वारे केली जाते.

भंजनगर येथील २५ स्क्वेअर मैल पसरलेला विस्तीर्ण तलाव, येथील अद्ययावत बोट क्लब, बिजू पटनाईक चिल्ड्रन्स पार्क आणि श्रीश्री बेलेश्वर महादेवाची ६१ फूट उंचीची मूर्ती हे पर्यटकासाठी प्रमुख आकर्षण केंद्र झाली आहेत. करोना नंतर सध्या जरी येथील पर्यटक संख्या कमी झालेली असली तरी त्यापूर्वी दररोज हजारो भाविक व पर्यटक या ठिकाणाला भेट देत असत. पर्यटकासाठी येथे भोजन व निवासाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथील भगवान शिवाची मूर्ती दिवस भरात कधीही पाहता येते मात्र टेकडी वरील श्री श्री बेलेश्वर महादेवाचे मंदिर सकाळी ८ ते १२ व दुपारी ४ ते ८ या वेळेतच उघडे असते. त्यामुळे येथे येतांना वेळेचे नियोजन करून यावे.

कसे जावे : ओरिसातील भुवनेश्वर पासून १६७ किमी तर बेहरामपुर (ब्रह्मपुर) पासून ८० किमी अंतरावर राज्य महामार्ग क्रमांक ७ वर भंजनगर आहे. बेहरामपुर आणि फूलबनी येथून भंजनगर येथे बसेस,टैक्सी आणि खाजगी बसेस उपलब्ध आहेत.

संपर्क : बेलेश्वर शिव मंदिर
KSUB College Road, RJ 74+MVM Nunipada & Sasan, Bhanjanagar Odisha 761123
Mob. 07077214784

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या बुधवारचे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – वादळ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

इंडिया दर्पण - हास्य षटकार - वादळ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011