कवयित्री,लेखिका म्हणून सर्वदूर परिचित आहे. त्या शासकीय उच्च माध्यमिक शाळेतून प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्यात. त्यांचे शिक्षण बी.एस्सी,बी.एड आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश,तेलगू या भाषा येतात.त्यामुळे या चारही भाषेत त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.आजपर्यंत त्यांनी कथा, कविता, ललित लेख,पद्य,पथनाटिका,कादंबरी,बालकथा, बालकविता यासारख्या साहित्य प्रकारात विपुल लेखन केले आहे.आजपर्यंत त्यांचे बरेच साहित्य प्रकाशित आहे.
मराठी भाषेत अक्षर (बालकथा संग्रह) क्षणैक (कथासंग्रह )ओंजळ (कविता संग्रह) हॅपी बर्थ डे (बाल कविता) सुपरमॅन (किशोर कथा संग्रह) चला चला सुंदर देशात (बाल कविता).मानससरंग (चारोळी संग्रह) गीत गजानन,गजानन चालीसा (भक्तीगीत) सीता शक्ती (कादंबरी) प्रेम म्हणजे काय असतं?(ललित बंध)तूं कविता, तूं अस्मिता (कविता संग्रह ) प्रकशित आहेत.
तर हिंदी भाषेत एहसास (कविता संग्रह) बेटी घर की शान (पद्द पथ नाटिका) माय फ्रेंड (बालकथा संग्रह)प्रकाशित आहेत. त्यांनी तेलगू भाषेत अनुवादित केलेले पिलक ब्राह्मणडू (म्हणजे शेंडीधारी) व तेल्ला पालरमू (म्हणजे पांढरे कबूतर) ही दोन पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांनी इंग्रजी भाषेत अनुवादित केलेली My Beauyltiful country ,अलेक्सा (किशोर कथा)ई बुक साहित्य प्रकारात प्रकाशित आहेत.त्याचप्रमाणे त्यांनी श्री क्षेत्र भद्राचलम् महात्म्य,सी .नारायण रेड्डींच्या कविता,अक्का महादेवीच्या कविता मराठीत अनुवादित केल्या आहेत.कथावली,प्रिय हा भारत देश हे दोन ग्रंथ संपादित केले आहेत.कवयित्री इंदिरा संत यांचा फुलवेल आणि बाबा आमटे यांचा ज्वाला आणि फुले या कविता संग्रहाचे समीक्षण केले आहेत.
कवयित्री मीना खोंड यांनी लंडन येथील भारतीय उच्चायोग बहुभाषी कविसंमेलनात कविता सादर केली.
डिस्कव्हरी चॅनेलसाठी असलेल्या Body bezarre London च्या स्टुडिओत वर्हाडी कथेचा इंग्लिशमधे अनुवाद संपादन केला.विशेष म्हणजे लंडन मराठी रेडिओवर मुलाखत आणि कविता वाचन प्रसारित झाले आहे.
आकाशवाणी नागपूर, हैद्राबाद केंद्रावरून त्यांच्या कथा,कविता व ललित लेखांचे वाचन प्रसारित झाले आहे.त्यांना आजपर्यंत विविध सन्मान,पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन पुरस्कार ,नागपूर, मरती ,भैंसा ,ब्राम्हण समाज सन्मान भैंसा, म.सा.प.हैद्राबाद,आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरस्कार, हैद्राबाद.कादंबिनी क्लब हैद्राबाद,सन्मान,ऑथर गिल्ड ऑफ इंडिया ,सन्मान भारतीय उच्चायोग लंडन ,सन्मान प्राप्त आहेत.
आजपर्यंत त्यांनी विविध मराठी,हिंदी साहित्य सम्मेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग घेतला आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रमंडळ दिवाळी अंक लंडन, महाराष्ट्र टाईम्स,तरुणभारत ,लोकसत्ता,लोकमत,लोकपत्र,सकाळ,देशोन्नती,सामना या वर्तमान पत्रात तसेच पंचधारा,श्रीसर्वोत्तम,माझीसहेली,स्री,म-मराठीचा पद्यगंधा,गृहशोभिका वसुधा,
अन्नपूर्णा,चक्रपाणी,साहित्यलेणी,सुगंध,मैत्रिण, अप्सरा,श्रमिक ,एकजूट ,सज्जनगड,लोकप्रभा ,दै. स्वाभिमानी छावा,जन आधार ,शब्दशिवार,बृहन् मायमराठी ,साप्ताहिक जनमंगल, मराठी साहित्य वार्ता ई मासिकात ,दिवाळी अंकात कथा,कविता,ललित लेख सातत्याने प्रकाशित झाले आहेत.तसेच किशोर,आनंद,कुमार,मुलांचे मासिक,चंपक,चिव चिव चिमणी,बालवाडी,छोट्यांसाठी गंमत, गंमत जंमत ,देवपुत्र इ.दिवाळी अंकात ,मासिकात बाल साहित्य प्रकाशित झाले आहे.
हिंदी मिलाप, वार्ता,सरिता,सरस सलिल,गृहशोभा, अहल्या, गोलकोंडा ददर्पण, साहित्य सेतू ,स्रीकाल, कालजयी,पब्लीक लाईफ समाचार,राष्ट्रनायक,दक्षिण समाचार,प्रसंगम,सृजन पंखुडी,अरुण, देवपुत्र,बालहंस,चंपक,इ.हिंदी वर्तमान पत्रात,मासिकांमधे कथा,कविता साहित्य प्रकाशित झाले आहे.
कवयित्री मीना खोंड यांचे वास्तव्य हैदराबाद येथे असून त्या तरल मनाच्या भावकवयित्री आहेत. त्यांच्या कवितेत स्त्रीमनाच्या जाणीवा व्यक्त करताना दिसतात. त्याचबरोबर सामाजिक जीवनातील विविध अंगांना त्यांची कविता स्पर्श करते.त्यांच्या कवितेत विरह,प्रेमभंग,स्वप्नभंग तर दिसतो.त्याचप्रमाणे निसर्ग,पशु पक्षांचे सहजीवनही तितक्याच सहजतेने डोकावतांना दिसते.त्यांच्या कवितेत मनाला लागलेली चिरंतन अंधाराची ओढ प्रकर्षाने जाणवते. चला आपण त्यांच्या काही कविता त्यांच्या आवाजात ऐकुया.आणि आस्वाद घेत त्यांच्या कवितांचे मूल्यमापन करुया.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!