सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलियन – फुटबॉल, झुंड आणि वास्तव

by Gautam Sancheti
मार्च 6, 2022 | 5:12 am
in इतर
0
jhund

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलियन
फुटबॉल, झुंड आणि वास्तव

“आप कहते है की यह एक झुंड है. मै कहता हू, यह हमारी नॅशनल फुटबॉल टीम है”. हा अमिताभचा डॉयलॉग म्हणजे ‘झुंड’ चित्रपटाचा सारांश आहे. किंबहूना ज्या भारतात फुटबॉलच्या विकासाला चालनाच मिळेनाशी झाली आहे, त्या प्रक्रियेला दिलेला एक बुस्टर डोस आहे असे म्हणावे लागेल. पॅव्हेलियन हे सदर क्रिडाविषयक आहे यात शंका नाही. मात्र या सदरात आज “झुंड” हा चित्रपट लिखाणासाठी निवडला म्हणून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल. परंतु, नागराज मंजुळेंनी “झुंड” नावाच्या चित्रपटात फुटबॉल सारखा क्रिडा विषय अतिशय योग्य पध्दतीने हाताळल्याने या विषयावर लिहावेच लागेल. लेखक आहेत जगदीश देवरे

असो, “स्लम सॉकर” या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय बारसे यांच्या जीवनावर आधारीत झुंड चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. सैराटकार नागराज मंजुळेंचा चित्रपट आणि त्यात अमिताभ बच्चनची भुमिका या सगळ्या गोष्टी अकल्पीत असल्या तरी सत्य आहेत. विषय निवडतांना उगाच मनोरंजन, असा काही विषय यात निवडलेला नाही. एक वेगळा विषय आहे. थेट मनाच्या गाभा-यापर्यन्त पोहोचणारा. झाेपडपट्टीतली मुलं हा चित्रपटाचा मुळ गाभा. अर्थात, झाेपडपट्टी म्हटल्यानंतर त्यांच्या वागण्या बोलण्यात टुकारपणा आलाच. गुन्हेगारी आली. शिवराळ भाषा आली. ती आहेच या चिञपटात..या झाेपडपट्टीची सिमारेषा एका भिंतीपर्यन्त आणि ही झुंड म्हणजेच इंग्रजीत ज्याला आपण गॅंग म्हणतो तेच या भिंतीपर्यन्तचे सर्वेसर्वा. त्यांच्या याच टुकारपणाला जण का योग्य आकार दिला तर त्यातून फुटबॉलची एक नॅशनल टीम तयार होवू शकते…., ही संकल्पना आणि त्यावर साकारलेला प्रवास म्हणजे झुंड चित्रपट. कॉलेजमध्ये स्पोर्टसचा प्राध्यापक असलेला अमिताभ नावाचा नायक या पोरांची फुटबाॕल टीम तयार करतो आणि ती झुंड एका टीममध्ये रुपांतरीत होते.

हा चित्रपट इथेच थांबू नये इतका हा विषय भारताच्या फुटबॉल क्षेत्रासाठी महत्वाचा आहे. म्हणजे बघा, ‘फिफा’ अर्थात फुटबॉलची जागतिक व्यवस्थापन करणारी जी संस्था आहे तिच्या जागतिक रॅंकींगमध्ये भारतीय फुटबॉल संघाचा नंबर लागतो १०४. आपण या क्रमवारीत कधीकाळी १७३ व्या क्रमांकावर होतो पण मध्येच काहीतरी जादू झाली आणि ९४ व्या क्रमांकावर सुध्दा गेलो. पण त्यानंतर आजचे सत्य हेच आहे की आपण जागतिक क्रमवारीत १०४ क्रमांकावर आहोत. झुंडच्या निमीत्ताने नागराज मंजुळेनी जसा मला भारतीय फुटबॉलचा इतिहास चाळायला लावला तसाच तो जर ऑल इंडिया फुटबाॅल फेडरेशनच्या लोकांनीही चाळून बघितला तर झुंडची निर्मीती ख-या अर्थाने यशस्वी होईल यात शंका नाही. ही संस्था भारतात फुटबॉल खेळाच्या विकासासाठी काम करणारी अधिकृत संस्था आहे. ही संस्था भारतामध्ये ग्रास रूट लेव्हल अर्थात तळागाळापर्यन्त फुटबाल पोहोचविण्याचे काम करते असे ऐकिवात आहे. चांगले प्रशिक्षक तयार करणे, शाळा, कॅम्पस, लीग स्तरावरच्या मॅचेस, विविध वयोगटातल्या मॅचेसचे आयोजन करणे आणि फुटबाॅलच्या विकासाचा कार्यक्रम राबविणे हे या फेडरेशनचे काम. हे झालं या संस्थेविषयी. आता या संस्थेचे यश काय ते बघू. १९५० साली पहिल्यांदा आणि कदाचित एकदाच भारतीय फुटबॉल संघ विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरला होता. वाचून धक्का बसतो खरा, पण पुढे काय झालं तेही नीट वाचा. विश्वचषक स्पर्धा होती ती ब्राझीलला. या स्पर्धेत खेळण्यासाठी संघ ब्राझीलला पाठविण्यातइतपत खर्च उचलण्याची क्षमता आपल्यात नसल्याने आपण तो अमृतयोग देखील अनुभवू शकलो नाही. यातले गुपीत असे की, त्यावर्षी म्यानमार, इंडोनेशिया आणि फिलीपाईन्स या देशांच्या संघानी आपल्या टीम काढून या स्पर्धेतून काढून घेतल्याने आपला नंबर लागला होता. त्यानंतर आजतागायत, १९९० चा अपवाद वगळला तर पात्रता फेरीच्या स्पर्धा खेळण्याची पात्रता असणारा संघ देखील आपल्याला तयार करता आलेला नाही.

राष्ट्रीय स्तरावर असलेली भारतातल्या फुटबॉलची ही विदारक अवस्था मांडण्याचे कारण हेच की झुंड मध्ये या परिस्थीतीत सुधारणा करण्यासाठीचे गणित रुजलेले आहे. ही कथा आहे नागपुरच्या विजय बारसेंची. कोण आहेत हे विजय बारसे हे आपल्याला बघावेच लागेल. अमिरखानच्या ‘सत्यमेव जयते’ या मालिकेतल्या एका एपिसोडचा विषय ठरलेले विजय बारसे मुळचे नागपुरचे. हिलसॉप काॅलेजला क्रिडा विषय शिकवणारे माजी प्राध्यापक. मोकळया मैदानावर कशाचाही चेंडू करून खेळणारी मुलं आपणही पहातो. पण आपल्यात आणि विजय बारसे यांच्या नजरेत जमिनी अस्मानाचा फरक होता. झाेपडपट्टीतली काही मुलं प्लास्टीकच्या बादलीला फुटबॉल करून फुटबॉल खेळत असतांना त्यांनी बघितली आणि बारसेंनी त्यांना एक चेंडू उपलब्ध करून दिला. या खेळाला लागते एक मोठे मैदान आणि एक फुटबॉल. घाम गळेपर्यन्त खेळण्याचा स्टॅमीना या पाेरांकडे जन्मजात होताच. मग काय, फुटबॉल मिळाला आणि टीम तयार झाली. यातून पुढे स्लम सॉकर नावाची संकल्पना जन्माला आली. रिटायर झालेल्या विजय बारसेंनी नोकरीतून मिळालेल्या १८ लाखात एक मोठे मैदान असलेली जमिन विकत घेतली आणि तिथे फुटबाॅलची अॕकेडमी उघडली. घारीची असते तशी तीक्ष्ण नजर असलेल्या या अवलियाने स्लम एरियातून धष्टपूष्ट आणि फुटबॉलला साजेसा स्टॅमीना टिकवून ठेवू शकणारे तरूण फुटबाॅलकडे वळवले….! झुंड चित्रपटात खास अमिताभच्या स्टाईलमध्ये एक डॉयलॉग आहे “आप कहते है की यह एक झुंड है. मै कहता हू, यह एक हमारी नॅशनल फुटबॉल टीम है”. हा डॉयलॉग म्हणजे झुंड चित्रपटाचा सारांश आहे किंबहूना ज्या भारतात फुटबॉलच्या विकासाला चालनाच मिळेनाशी झाली आहे त्या प्रक्रियेला दिलेला एक बुस्टर डोस आहे असे म्हणावे लागेल. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाचा एखादा प्रिमीअर ऑल इंडिया फुटबाॅल फेडरेशनच्या अधिका-यांसाठी आयोजित करायला हरकत नाही. मनोरंजना व्यतिरीक्त असलेला या चित्रपटाचा दुसरा हेतू कदाचित त्यातून साध्य होवू शकेल.

क्रिकेटचा खेळ भारतासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कमी न करता फुटबॉलकडे भारतीय प्रेक्षक वळविण्यासाठी काही तरी करावेच लागेल अशी बोंब नेहमी होते. परंतु, प.बंगाल वगळता आमचे फुटबाॅलप्रेम फुलायचे नावच घेत नाही. या खेळात प्रचंड पैसा आहे. प्रसिध्दी आहे. क्रिकेटमध्ये इंग्लडच्या कौंटी लीग वगळता इतक्या दिवस लीग स्पर्धाही होत नव्हत्या. अगदी अशा काळापासून फुटबॉल लीग स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळणाऱ्या अनेक देशात खेळविल्या जातात आणि खेळाडूंसाठी तो एक पैसा कमविण्याचा मोठा मार्ग ठरतो आहे. फुटबॉलमध्ये भारताकडे गुणवत्ता असलेले खेळाडू नाहीत अशातला भाग नाही. परंतु, त्यांना योग्यवेळी योग्य प्लॅटफाॅर्म उपलब्ध न झाल्याने फुटबॉलची एक चांगली टीम त्यांच्या सहभागाने तयारच होत नाही. …….ती फक्त झुंड बनून रहाते.
(लेखकाचा इ मेल – [email protected])

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

…म्हणून ऑनलाईन रोलेट, बिंगो, जुगार बंद झालाच पाहिजे

Next Post

महिला दिनी विशेष ग्रामसभा का आयोजित केली जाते?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
Next Post
womens gramsabha

महिला दिनी विशेष ग्रामसभा का आयोजित केली जाते?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011