सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री – वसुंधरा दिनाचा जनक : गेरॉल्ड नेल्सन

ऑक्टोबर 5, 2022 | 9:47 pm
in इतर
0
FQ90W pWQAU0lUz

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्ग यात्री –
वसुंधरा दिनाचा जनक : गेरॉल्ड नेल्सन

“मानवाने लढलेल्या अनेक लढायांमधली पर्यावरण संकट ही मानवजातीसाठी सर्वात मोठी लढाई असेल” इति गेरॉल्ड नेल्सन
२२ एप्रिल ह्या वसुंधरा दिनाचे जनक गेरॉल्ड नेल्सन ह्यांच्याबद्दल आजच्या ह्या लेखात जाणून घेत आहोत.

Smita Saindankar
स्मिता अनिल सैंदानकर
मो. 9423932203

पृथ्वीला उध्वस्त करणारा सर्वात भयंकर मानवी हस्तक्षेप कोणता? असं जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नक्कीच ‘युद्ध’ किंवा ‘लढाई ‘ हे असेल.प्रचंड प्रमाणात नुकसान करणारे स्फोटक पदार्थ वापरून, इंधनाची नासाडी करून तंत्रज्ञानाच्या जोरावर चालणारी युद्ध म्हणजे धरणीमातेची वाताहत.या युद्धांचं एकमेव ध्येय असतं, ते म्हणजे युद्ध जिंकणं. या ध्येयाचा पाठलाग करताना मनुष्यहानी होणार, वित्तहानी होणार हे प्रत्येकालाच माहीत असतं पण, जिंकण्याची नशा मानवाला अशावेळी अंध करून सोडते.युद्धामध्ये प्रत्यक्षरीत्या लक्षात येते ती मनुष्यहानी आणि वित्तहानी परंतु, त्याबरोबरच पर्यावरण किंवा इतर जीवसृष्टीचे काय हाल होत असतील हे कुणाच्याही लक्षात येत नाही. या गोष्टी युद्ध संपल्यानंतर हळूहळू परिणामकारकरीत्या जाणवू लागतात.

भारताच्या इतिहासात मुघल आक्रमणांना तोंड देण्यासाठी पेशव्यांच्या सैन्यामध्ये लाकडाचा प्रचंड प्रमाणात वापर केला गेला. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले त्याआधी काही वर्ष बिकिनी आणि एनीवेटोक या बेटांवर अणुचाचण्या केल्या. त्याचे भयंकर कायमस्वरूपी परिणाम जैवविविधतेवर झाले. तिथल्या सागरी जीवसृष्टीवर झाले. केवळ अनणूचाचण्या झाल्यानंतर इतके भयंकर परिणाम होते तर प्रत्यक्ष बॉम्ब हल्ला झाल्यानंतर त्या जीवसृष्टीचं काय झालं असेल ही कल्पनाही करवत नाही .युरोपीय राष्ट्रात दोन्ही महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात जैवविविधतेची हानी झाली.जहाज आणि पाणबुड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने समुद्रातील जीवांची हानी झाली.

दुसऱ्या महायुद्धाने जग हादरून गेले. अनेक युद्धसामग्रींच्या चाचण्या साधारणपणे निर्मनुष्य भागात वाळवंटात किंवा एखाद्या बेटावर होत असतात. जिथे मानवी हस्तक्षेप नसतो पण ,वर्षानुवर्ष तिथे स्फोटक चाचण्या केल्याने विषारी प्रदूषण होते आणि तिकडची जैवविविधता तिथली माती निकृष्ट होत जाते.पॅसिफिक महासागरामधील काही बेटांवर ही परिस्थिती उद्भवली आहे. दोन्ही महायुद्धात मिळून ज्या प्रमाणात पर्यावरणाचा विध्वंस झाला तेवढा विध्वंस मानवी इतिहासातली सर्व युद्ध धरून देखील झाला नव्हता. इतक्या प्रमाणात रासायनिक आणि जैविक शस्त्रांचा वापर केला गेला. पहिल्या महायुद्धात एक लाख 40 हजार टन विषारी वायू वापरले गेल्याचा अंदाज आहे. हा विषारी वायू जिथे वापरला गेला असेल तिथे किडे-मकोड्यांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व काही नष्ट झालं.

पृथ्वीवरील येणाऱ्या या विविध संकटांपासून पृथ्वीचे संरक्षण व्हावं, या संकटांची मानवाला जाणीव व्हावी या उद्देशाने सर्वात प्रथम अमेरिकेमध्ये 22एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा केला. या पृथ्वी दिवसाचे जनक होते गेरॉल्ड नेल्सन. गेरॉल्ड नेल्सन यांनी पर्यावरणावर युद्धाचे परिणाम किती भयंकर होत आहेत हे दाखवून दिलं. वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी जवळजवळ वीस दशलक्ष अमेरिकन तरुण आणि वृद्ध यांनी 22 एप्रिल 1970 रोजी एकत्र येऊन सरकारपुढे वसुंधरा दिनाची मागणी मांडली. अमेरिकन लोकांना भेडसावलेल्या पर्यावरणीय संकटांबद्दल बोलण्यासाठी हा दिवस प्रस्तावित केला गेला. वसुंधरा दिनाच्या प्रचंड सार्वजनिक समर्थनामुळे राजकारण्यांना या समस्येची तीव्रता आणि सार्वजनिक व्याप्ती पाहून या दिवसाला मान्यता देण्यास भाग पाडले. नेल्सन यांच्या प्रयत्नांमुळे पर्यावरण संरक्षण कायद्यासह विविध पर्यावरणीय कायदे मंजूर करण्यास मदत झाली. कोण होते हे गेरॉल्ड नेल्सन ?ज्यांना आता पृथ्वी दिनाचे जनक म्हणून ओळखलं जातं.

गेरॉल्ड नेल्सन यांचा जन्म 1916 मध्ये अमेरिकेतील विस्कॉन्सिन इथे झाला. कॅलिफोर्नियातील जो स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये राज्यशास्त्रात त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर मेडिसनच्या विस्कॉनसीन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.त्या काळातील अनेक तरुणांप्रमाणे नेल्सनने दुसऱ्या महायुद्धात युनायटेड स्टेट्स आर्मीमध्ये देखील सेवा केली पण, तिथून परत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1948 मध्ये त्यांनी विस्कॉनसिन सिनेटची निवडणूक लढवली. तिथे जिंकून दहा वर्ष तिथे सेवा दिली. 1958 मध्ये ते गव्हर्नर झाले आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पर्यावरणवादासाठी अखंड झोकून दिले. राज्याच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची पुनर्रचना केली. सार्वजनिक उद्यान आणि वाळवंट क्षेत्रासाठी आउटडोर रिक्रिएशन ॲक्शन प्रोग्राम स्थापन केला.

सिनेटमध्ये असताना गेरॉल्ड नेल्सन यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यांवर जोर दिला. पर्यावरणवादाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष केनडी यांचा यशस्वीपणे पाठींबा मिळवला. मानवाचे हित जाणून पर्यावरणविषयक कायदे व्हावे यासाठी संघर्ष केला. 1969 मध्ये नेल्सनला व्हिएतनामविरोधी युद्धाच्या शिकवणीतून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी विचार केला की, कदाचित पर्यावरणवादासाठी प्रचंड प्रमाणात समर्थन मिळवलं तर आपली मागणी कायद्यात रूपांतरित होऊ शकते. नेल्सन यांची तळमळ पाहून सिनेटचे कर्मचारी भारावून गेले. तळागाळातील लोकांना त्यांनी संघटित केलं. देशभरात कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. नेल्सन यांच्यादृष्टीने मानवाने लढलेल्या अनेक लढायांमधली पर्यावरण संकट ही मानवजातीसाठी सर्वात मोठी लढाई असेल. एक प्रमुख पर्यावरणवादी म्हणून 11 मार्च 1970 रोजी मिशिगन विद्यापीठात नेल्सन यांनी अत्यंत प्रभावी असं भाषण केलं.

सामाजिक अशांतता आणि युद्धाच्या काळात पर्यावरणाला चालना देण्यासाठी अनेक मुद्दे मांडले. ते म्हणतात की,” मानव जातीसाठी व्यापक अर्थाने पाहिलं तर,मला वाटत नाही की, आपण ज्या वातावरणात राहत आहोत त्या वातावरणात पर्यावरणाइतका गंभीर इतर कोणताही गंभीर मुद्दा असू शकेल. तुम्ही इकॉलॉजी हा शब्द ऐकला असेल . तो एकूण इकोसिस्टीमशी संबंधित आहे. आम्ही टीनचे डबे, बाटल्या आणि आमच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतो हे एवढेच इकॉलॉजीशी संबंधित नाही. त्याची व्याप्ती अवाढव्य आहे.” 1972 मध्ये त्यांनी सभागृहात एक विधेयक सादर केलं ज्यामध्ये व्हिएतनामयुद्धाच्या पर्यावरणीय परिणामांचा त्यांनी विस्तृत अभ्यास सादर केला. त्यावेळी झालेल्या तीव्र बॉम्बस्फोटामुळे पर्यावरण कसे प्रभावित झाले हे मांडलं.

1980 मध्ये त्यांना वाईल्डलाईफ सोसायटीसाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं. तिथे त्यांनी उर्वरित संपूर्ण आयुष्य काम केलं. 1995 मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडून त्यांच्या पर्यावरण सेवेबद्दल त्यांना स्वातंत्र्य पदक देऊन सन्मान करण्यात आला. आणि अखेर जुलै 2005 रोजी त्यांचे हृदयविकाराने निधन झालं. त्यावेळी पर्यावरणाप्रती त्यांची निष्ठा पाहून त्यादिवशी गेरॉल्ड नेल्सन हे तिथल्या न्यूयॉर्क टाइम्सच्या अग्रलेखाचा विषय होते.

अमेरिकन हेरिटेज मॅगझीनने पृथ्वी दिनाची संकल्पना म्हणजे लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात उल्लेखनीय घटनांपैकी एक असा उल्लेख केला आहे. दरवर्षी जगभर सध्या 22 एप्रिल हा वसुंधरा दिन उत्साहात साजरा होतो. विविध चर्चासत्र होतात. कार्यक्रम आयोजित केले जातात. वृक्षारोपण केलं जातं. फोटो काढले जातात. वृत्तपत्रात, दूरदर्शनवर त्याच्या बातम्या दाखवल्या जातात पण, ते त्या दिवसापूरताच मर्यादित असतं. तेव्हा हा वसुंधरा दिवस म्हणजे एक इव्हेंट न होता खरोखर आपल्या वसुंधरेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणारा असावा. आत्मचिंतन करणारा असावा. जेणेकरून या दिवसाचं प्रयोजन सार्थकी लागण्यास आपला खारीचा वाटा आपण देऊ शकू.

Column Nisarga Yatri gaylord nelson by Smita Saindankar
World Earth Day

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पू जेव्हा नोकरीच्या मुलाखतीसाठी जातो

Next Post

या व्यक्तींचे आज महत्त्वाचे काम लागेल मार्गी; जाणून घ्या, गुरुवार, ६ ऑक्टोबरचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे आज महत्त्वाचे काम लागेल मार्गी; जाणून घ्या, गुरुवार, ६ ऑक्टोबरचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011