शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष – नवोदित – दमदार चढाया आणि भक्कम बचावासाठी प्रसिद्ध मानसी वाजट

by India Darpan
फेब्रुवारी 1, 2022 | 5:09 am
in इतर
0
IMG 20220131 WA0028

 

इंडिया दर्पण विशेष – नवोदित –
दमदार चढाया आणि भक्कम बचावासाठी प्रसिद्ध मानसी वाजट

लेझीम आणि कबड्डी यासाठी प्रसिद्ध असलेल्या गुलालवाडी व्यायाम शाळेत राष्ट्रीय स्पर्धा आणि मैदाने गाजविणारी मानसी वाजट ही कबड्डीपटू तयार झाली यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आज तिच्या कार्यकर्तृत्वालाच आज आपण उजाळा देणार आहोत…

Deepak odhekar
दीपक ओढेकर
लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532

पुरुषांचा कबड्डी संघ तयार करतांना महिलांचाही कबड्डी संघ तयार करण्याचा आधुनिक दृष्टिकोन सुमारे ६० वर्षांपूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवला. त्यामुळेच माधुरी गायधनी, भावना शुक्ल, अनुराधा डोणगावकर, क्षिप्रा पैठणकर ते आजची मानसी वाजट असे राष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊ शकले. राष्ट्रीय खेळाडू क्ष्रिप्रा पैठणकर हिच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाने २३ वर्षीय मानसी गेली १२ वर्षे आपल्या दमदार चढाया, नेमक्या व मजबूत पकडीने राज्य आणि राष्ट्रीय मैदाने गाजवित आहे. याच निमित्ताने ती नाशिकचे नावही राष्ट्रीय पातळीवर घेऊन जात आहे. नाशिक जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि पश्चिम विभाग या सर्व स्पर्धा ती ज्युनिअर आणि आता सीनिअर गटात खेळत आहे. आपल्या चमकदार खेळाने ती विशेष छाप सोडत आहे.

दोन वर्षापूर्वी तिने अर्जुन पुरस्कार विजेती मुंबई उपनगरची सुप्रसिद्ध चढाईपटू अभिलाषा म्हात्रे हिची सुपर tackle केली होती. (दोन किंवा कमी खेळाडू असताना झालेली पकड). खरं तर अभिलाषाचा संपूर्ण संघ मैदानावर हजर असला तरीही पकड करणे कठीण मानले जाते. पाचव्या क्रमांकावर म्हणजे राईट टर्न ला बचावपटू म्हणून मानसी प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या नामांकित खेळाडूमधील दोष हेरुन मानसी त्यांना आपल्या साखळीत अचूक अडकवते. पूर्वी ज्याला नो cross म्हटले जायचे त्या लाइनवर पकड करण्यातही मानसी तरबेज आहे.

बचावासाठी प्रसिद्ध असलेली मानसी चढाईतही निपुण आहे. चढाईच्या वेळी हमखास बोनस गुण मिळवून देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. टो टच वर (म्हणजे क्षणात प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पायाला पाय मारुन) खेळाडू बाद करण्यात तसेच पकड झाल्या झाल्या प्रतिस्पर्धी संघाच्या तावडीतून सुटका करून घेण्यात ती माहिर आहे. तिला अनेक बक्षिसे मिळाली असली तरीही राष्ट्रीय जुनियर स्पर्धेत मिळालेले कांस्यपदक हे तिच्या दृष्टीने खासच आहे. मानसी विषयी तिच्या गुरु क्षिप्रा पैठणकर म्हणतात की, “मानसी जरा जास्तच आक्रमक असली तरीही अनुभवाने ती शिकेल. तिच्यामध्ये मोठ्या खेळाडूत असणार नैपुण्य आहे. शिकण्याची इच्छा आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्र आणि भारतीय संघात स्थान मिळाल्यास एक उत्तम कबड्डीपटू मिळेल. शिवाय ती संघाला मोठे योगदान देईल, असा मला विश्वास आहे”. मानसीचे स्वप्न अर्थातच भारताकडून प्रतिनिधित्व करण्याचे आहे. तसेच, महिला प्रो कबड्डी सुरु झाल्यास तेथे खेळाडू म्हणून दमदार कामगिरी करण्याचे ध्येय ती उराशी बाळगून आहे. त्यासाठी लागणारी मेहनत आणि कष्ट यात ती कुठेही कमी पडताना दिसत नाही. ती फक्त संधी आणि नशीबाची साथ मिळण्याची वाट पाहत आहे. तिच्या आगामी वाटचालीला मनापासून शुभेच्छा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत बार्टीचा महत्त्वपूर्ण निर्णय; विद्यार्थ्यांना दिलासा

Next Post

हात धुण्याच्या सवयी वरून कळतो स्वभाव! कसं काय?

Next Post
प्रातिनिधीक फोटो

हात धुण्याच्या सवयी वरून कळतो स्वभाव! कसं काय?

ताज्या बातम्या

Untitled 63

वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार…एकनाथ शिंदे

जून 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011