सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर – वाहनाने अशी होते परिक्रमा

by Gautam Sancheti
डिसेंबर 27, 2021 | 5:34 am
in इतर
0
IMG 20211225 WA0016

 

इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर
वाहनाने अशी होते परिक्रमा

नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेबाबत आपण ऐतिहासिक व भौगोलिक माहिती याआधीच्या दोन भागात जाणून घेतली. आता आपण सध्याचा भाविकांचा कल लक्षात घेऊन प्रथम वाहनाने नर्मदा परिक्रमा कशी करावी हे जाणून घेऊ. त्यांनतर उत्तरवाहिनी परिक्रमेची माहिती घेऊ. शेवटी पायी नर्मदा परिक्रमा कशी असते, याबाबत तपशिलवार माहिती घेऊया….

भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

वाहनाने नर्मदा परिक्रमा
मागील भागात मी नमूद केले होते की वाहनाने परिक्रमा करण्यास साधारण १८ ते २२ दिवस लागतात. या परिक्रमेसाठी असा चार दिवसांचा फरक असण्याचे मुख्य कारण म्हणजे या परिक्रमे दरम्यान भाविकांना कटपूर ते मिठीतलाई येथील संगमावर बोटीने प्रवास करावा लागतो. हा प्रवास सागराची भरती-ओहटी, हवामान तसेच बोटींची उपलब्धता यावर अवलंबून असतो. त्यामुळे हा चार दिवसांचा कालावधी ठेवावा लागतो. यात सर्व सुरळीत झाले तर परिक्रमा १६ ते १८ दिवसातही पुर्ण होते. अथवा काही कारणास्तव प्रवास थांबला तर २० ते २२ दिवसही लागू शकतात.

परिक्रमेस किती दिवस लागतात याचा उल्लेख सुरुवातीलाच करण्याचा उद्देश हा आहे की, परिक्रमा करु इच्छिणार्‍या भाविकांनी नियोजन करता येईल. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे नर्मदा मातेवर संपूर्ण विश्वास ठेवून परिक्रमा केल्यास फारशा अडचणी न येता परिक्रमा व्यवस्थित पार पडते. म्हणून आपण साधारण १८ दिवसांची वाहनाने परिक्रमा कशी करावी याबाबत माहिती घेऊ.

परिक्रमेची तयारी
वाहनाने परिक्रमा करणार्‍या भाविकांनी खालील प्रमाणे तयारी करावी.
१) ४ ते ५ ड्रेस, स्वेटर, शाॅल, टोपी, मफलर, टाॅवेल, चप्पल/शूज शक्यतो स्पोर्टश शूज घ्यावे. (काही ठिकाणी कपडे धुण्याची सोय असल्याने ४/५ ड्रेस पुरे)
२) नर्मदा जल घेण्यासाठी पाण्याची बाटली, पुजेचे सामान, ३०/४० वाती, कन्यापूजन वस्तू, संकल्प दक्षिणा रु. १५००/-
३) नेहमीची औषधे तसेच प्रथमोपचार औषधे.

दिवस पहिला
आपापल्या गावातून/शहरातून इंदूरकडे प्रयाण. यात दुसर्‍या दिवशी आपण सकाळी इंदूरला पोहचू असे नियोजन असावे. इंदूर हे नर्मदा परिक्रमा मार्गात येत नाही. परंतु इंदूर हे शहर मुंबई-आग्रा या प्रमुख हायवेवर आहे. तसेच इंदूर हवाई मार्गाने व रेल्वेमार्गाने देशभरातील प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. शिवाय नर्मदा परिक्रमेसाठी लागणारी पुढील वाहनेही इंदूर येथे चांगली मिळू शकतात. म्हणून इंदूरला प्रथम पोहचावे.

दुसरा दिवस
सकाळी इंदौर येथे पोहचल्यावर स्नान करुन इंदूर येथून जवळच असलेल्या उज्जैन या बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर व कालभैरवाचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ व्हावे. अथवा इंदूर येथे नर्मदा परिक्रमेची काही आवश्यक खरेदी करावयाची असेल तर ती करावी. येथील शिशमहल, राजवाडा व खजराणा गणेश मंदिरास अवश्य भेट द्यावी. दुसर्‍या दिवशी इंदूर येथे मुक्काम करावा.

तिसरा दिवस
इंदूर ते ओंकारेश्वर हे अंतर ८० किमी आहे. सकाळी इंदूर येथून ओंकारेश्वराकडे प्रस्थान करावे. ओकांरेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून नर्मदा परिक्रमेतील महत्वाचे देवस्थान आहे. बहुसंख्य परिक्रमावासिय ओंकारेश्वर येथूनच परिक्रमेस सुरुवात करतात. ओंकारेश्वर येथून परिक्रमेस सुरुवात करण्यापूर्वी येथे नर्मदेच्या काठावर संकल्प पूजन केले जाते. याठिकाणी वाळूची १००० शिवलिंग बनवून पुजा केली जाते. आमची परिक्रमा सुखरुप व व्यवस्थित होऊ दे, अशी विनंती नर्मदा मातेस करतात. यासाठी भाविकांनी रु. १५०० सोबत ठेवावे. ओंकारेश्वर येथे कन्यापूजन, कन्याभोजन व ब्राम्हण भोजनही करतात.

कन्यापूजन इतर ठिकाणी केले तरी चालते. नर्मदा नदी ही कन्यारुपात असल्याने कन्यापूजन करतात. भाविक येथील मुलींना भोजनाबरोबरच कपडे, शालेय साहित्य, रोख रक्कम अथवा काही वस्तू भेट म्हणून देतात. ओंकारेश्वर येथे नर्मदा नदीस ओम आकार प्राप्त झाला आहे. तसेच येथे श्री मामलेश्वर मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर व इतरही अनेक छोटी-मोठी मंदिरे आहेत. तेथे भाविक दर्शन घेऊन परिक्रमेसाठी आशिर्वाद घेतात. या ठिकाणी नर्मदा नदीवरील मध्ये कुठलाही आधार नसलेला इंद्रधनुष्याच्या आकाराचा पुल आकर्षक आहे. या पुलामुळेच ओंकारेश्वर गावाचे दोन्ही भाग एकमेकास जोडले गेले आहे. यानंतर परिक्रमा पूर्ण होईपर्यंत नर्मदा नदी ओलांडायची नसते. सर्व पुजा-दर्शन झालेनंतर तिसर्‍या दिवसाचा मुक्काम ओंकारेश्वर येथेच करावा.

यानंतर परिक्रमेस सुरुवात होते. आपण ही परिक्रमा वाहनाने जरी करत असलो तरी नर्मदा माता नेहमी आपल्या उजवीकडे राहील याची दक्षता घ्यावी. काही वेळा मुक्कामासाठी चांगली हाॅटेल्स/धर्मशाळा नदीकाठी नसल्याने नदी सोडून थोडे दूरही मुक्काम करावे लागतात. त्यामुळे या लेखात मी सुचवलेली मुक्कामाची गावेच निवडावी असे काहीही नाही. मुक्कामाची ठिकाणे ही भाविकांची प्रवासाची तयारी, निवासस्थानी तडजोडीची तयारी ठेवली तर गावे बदलली तरी चालतात. परिक्रमेचा पुढूल प्रवास पुढच्या भागात पाहू…
क्रमशः

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिंह राशीसाठी २०२२ हे वर्ष कसे असेल? जाणून घ्या या १० बाबी

Next Post

युवा झाल्यानंतर मुस्लिम मुलगी हिंदू मुलाशी लग्न करण्यास सक्षम; न्यायालयाची टिप्पणी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
Next Post
court

युवा झाल्यानंतर मुस्लिम मुलगी हिंदू मुलाशी लग्न करण्यास सक्षम; न्यायालयाची टिप्पणी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011