मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर – परिक्रमेचा अखेरचा टप्पा

by Gautam Sancheti
जानेवारी 26, 2022 | 7:11 pm
in इतर
0
narmada parikrama 1

 

इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर
परिक्रमेचा अखेरचा टप्पा

नर्मदा परिक्रमेतील १२ दिवसांचा कार्यक्रम आपण मागील लेखात बघितला. यात बर्‍याच लहान गोष्टींवरही आपण सखोल माहिती जाणून घेतली. तरी नर्मदा परिक्रमा करतांना प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात. त्यामुळे आपापल्या अनुभवानुसार प्रत्येकाची मते याबाबत वेगळी असू शकतात. तसेच मुक्कामाची ठिकाणे, प्रवासातील मंदिरे, जेवणाच्या सोयी अशा विविध गोष्टींबाबत भाविकांना वेगवेगळे अनुभव येतात. मागील भागात आपण १२ दिवसांपर्यंतचा मार्ग बघितला आता आपण याभागात यापुढील शेवटपर्यंतचा म्हणजेच ओंकारेश्वर पर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.

भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

दिवस-१३
भाविकांना १२ व्या दिवशी अमरकंटक येथे पोहचण्यास सायंकाळी उशीर होतो. त्यामुळे तेराव्या दिवशीचा संपुर्ण वेळ हा अमरकंटक परिसरातील विविध मंदिर दर्शन व पुजाविधी यातच जातो. त्यामुळे १३ व्या दिवशीचा मुक्कामही अमरकंटक येथेच केलेला तर छान होते.
दिवस – १४ – अमरकंटक ते नरसिंगपूर
अमरकंटक ते नरसिंगपूर हा प्रवासही मोठा म्हणजेच साधारण ३२० किमी आहे. त्यास जवळपास संपुर्ण दिवस लागतो. या प्रवासादरम्यान आपण कबीर चबूतरा, रुसा, गाडासरई, डिंडोरी मार्गे नरसिंगपुर येथे पोहचतो. यादिवशी प्रवास मोठा असल्याने व प्रवासादरम्यान फार विशेष मंदिरे अथवा पर्यटनस्थळे नसल्याने दिवसभर प्रवासच करावा लागतो. हा प्रवास वाढण्याचे मुख्य कारण की दोन ठिकाणांचे मध्ये बरगी येथे नर्मदा मातेचा मोठा जलाशय व धरण आहे. त्यामुळे मंडलामार्ग फिरुन जावे लागते. निसर्ग व जंगलाची आवड असलेले पर्यटक बरगी येथे मुक्काम करु शकतात. तेथे मध्य प्रदेश टुरिझम बोर्डाने छान रिसाॅर्ट बनवले आहे. हा सर्व परिसर दाट जंगलाचा असल्याने येथे अनेक पशुपक्षी वास्तव्य करतात. मात्र यासाठी नदी ओलांडावी लागत असल्याने परिक्रमावासिय येथे मुक्काम करु शकत नाहीत. जवळपास दुसरीकडे राहण्याची चांगली व्यवस्था नसल्याने नरसिंगपूर येथे मुक्काम करावा.

दिवस – १८ – नरसिंगपूर ते होशंगाबाद
नरसिंगपूर ते होशंगाबाद हे अंतर १८० किमी असून साधारण सहा-सात तास प्रवासास लागतात. भाविक गाडरवारा, पिपरीया, सोहागपूर मार्गे सायंकाळपर्यंत होशंगाबाद येथे पोहोचतात. होशंगाबाद हे मध्य प्रदेशातील भोपाळ जवळचे एक प्रमुख शहर आहे. होशंगाबाद येथे रामजीबाबा मंदिर, होशंगशहा किल्ला, श्रीशक्ती सरोवर, गोंदरी घाट, शेठाणी घाट, दत्तमंदिर व नर्मदा घाट येथे भाविक भेट देतात. सायंकाळी नर्मदा घाटावर नर्मदा आरती असते.

दिवस – १६ – होशंगाबाद ते ओंकारेश्वर
होशंगाबाद ते ओॅकारेश्वर हा प्रवास २४० किमी आहे. आपल्या नर्मदा परिक्रमेतील बस प्रवासाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज परिक्रमा पुर्ण होते. हा प्रवास टिमरणी, हरदा, खिरकीया व हरसूद या गावांजवळून होतो. तसेच याही प्रवासात हनुमंतिया येथे नर्मदा मातेचा मोठा जलाशय असल्याने प्रवास वाढतो. या परिसरातही हनुमंतिया बेटावर मध्य प्रदेश शासनाने अनेक पर्यटन विषयक सुविधा केल्या आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांचा राबता असतो. येथे अनेक पाण्यावरील साहसी खेळ, हाऊस बोटस तयार करण्यात आल्या आहेत. सायंकाळी ओंकारेश्वर येथे परत एकदा ओंकारेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर , ममलेश्वर मंदिर व घाटावरील सर्व देवदर्शन करुन परिक्रमावासिय प्रसन्न मनाने संकल्पपुर्ती करतात.

परिक्रमावासिय येथे स्नान करतात व परिक्रमाकरतांना नर्मदा पुजन करुन जे जल सोबत आणलेले असते ते या दोन्ही मंदिरात अर्पण करतात. तसेच येथील ॠणमूक्तेश्वर मंदिरात ॠणमुक्त होण्यासाठी डाळ अर्पण केली जाते. अशा प्रकारे नर्मदा परीक्रमेची सांगता होते. ही परीक्रमा करतांना कुठलीही अडचण न येता निर्विघ्नपणे परिक्रमा पुर्ण करवून घेतल्याबद्दल नर्मदा मातेचे भक्तीभावाने आभार व्यक्त करतात. नर्मदा माता परिक्रमा पुर्ण करुन घेते तशी जीवनही परिपुर्ण करते. त्यामुळे नर्मदा मातेला विसरु नये. तिचा किनारा कधीही सोडू नये. परिक्रमेमुळे अंतःकरणातील घाण काढली जाते. नर्मदा मातेच्या असीम कृपेने आपण अंर्तबाह्य न्हाऊन निघतो. सायंकाळी मोठी नर्मदा आरती करुन परिक्रमा पूर्ण होते.
दिवस – १७ – ओंकारेश्वर ते इंदूर अथवा आपापल्या निवासस्थानाकडे प्रयाण

टीप:- मी कुणी लेखक नाही. फक्त जे अनुभवले ते लिहीले. त्याला थोडी पर्यटनाची जोड दिली. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येकाची परिक्रमा व अनुभव वेगवेगळे असू शकतात. मी जे अनुभवले ते लिहिले. सर्वांनी परिक्रमा करावी यासाठी तपशिलवार लिहिले आहे. ज्यांच्याकडे श्रद्धा व निष्ठा आहे, अशा कुठल्याही मनुष्याकडून परिक्रमा पूर्ण होऊ शकते. त्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणूनही हे लिखाण कामी येऊ शकते. हे लिखाण आपल्याला कसे वाटले, आपल्या काही सूचना असल्या तरी आवर्जून सांगाव्यात. संपर्क क्रमांक 9689038880

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तब्बल १ हजार कोटींची बोगस बिले देणाऱ्या लेखापालाला अटक

Next Post

मुंबईतील बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Untitled 22
संमिश्र वार्ता

नाशिकहून एअरलिफ्ट करण्यासाठी हॅलिकॉप्टर…बीडमध्ये बचाव कार्याला गती

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक…बघा, शासनाचा निर्णय

सप्टेंबर 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आर्थिक स्थिती आनंद देईल, जाणून घ्या,मंगळवार, १६ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Next Post
gst

मुंबईतील बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011