शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा – गोदावरीला समजून घेताना…

ऑक्टोबर 14, 2021 | 5:12 am
in इतर
0
IMG 20210922 WA0025

गोदावरीला समजून घेताना…

नाशिकची ओळख, नाशिकचे वैभव म्हणून “गोदावरी”, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु आपण हे विसरतो की गोदावरीमुळे नाशिक आहे. नाशिकमुळे गोदावरी नाही. 1475 कि. मी. लांबीची, 3 लाख चौरस कि. मी. परिसरात जिचे खोरे आहे व 6 राज्ये जिच्यामुळे आहेत अशी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी. पृथ्वीतलावर अवतरलेली पहिली नदी अशी मान्यता असलेली आपली आई म्हणजे गोदावरी.

rajesh pandit
राजेश पंडित
अध्यक्ष, नमामी गोदा फाऊंडेशन
मो. ७३०४१२००७७

गोदावरी नदी, केवळ आपल्याला दिसणार वाहतं पाणी नसून एक फार मोठी संकल्पना आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्त वाहिन्या आहे ज्यांच्या मधून रक्त वहाते त्याचप्रमाणे गोदावरी नाशिकची रक्तवाहिनी आहे. आपल्या शरीरात वाहणारे रक्त हे जर शुद्ध, सातत्याने वाहणारे आणि विनाअडथळा असेल तर आपली तब्येत चांगली राहते तसेच गोदावरी जर अविरल, निर्मल आणि स्वतंत्र राहिली तर नाशिक ची तब्येत चांगली राहील. आधी नदी म्हणजे नेमके काय हे समजून घेणे गरजेचे आहे.

“हिमजल, भूजल-स्रोत एवं वर्षाके जल को उद्गम से संगम तक, स्वयं को प्रवाहित रखती हुवी, जो अविरलता, निर्मलता और स्वतंत्रता के साथ बेहती है और सदियोंसे सुरज, वायू और धरती से आजादी से स्पर्श करती हुवी जीवसृष्टी से परस्परपूरक और पोषक नाता जोडकर जो प्रवाहित है वो नदी है” असे प्रा जि. दि. अगरवाल आणि राजेंद्र सिंग म्हणतात.

मानवाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते किंबहुना पाण्यामुळेच मनुष्यप्राणी जिवंत राहू शकतो आणि म्हणूनच कुठलीही वसाहत नदीच्या किनारी वसली. आपण जर प्राचीन काळापासून भौगोलिक इतिहास बघितला तर असे लक्षात येते की, गोदावरी तीरी नाशिक शहर वसले तसेच जगातले जवळपास सर्वच मोठी शहरे ही कुठल्या ना कुठल्या नदीच्या किनारी वसलेली आहेत. गोदातीरी वसलेले नाशिक, यमुना तिरी वसलेले दिल्ली, मिठी तीरी वसलेले मुंबई, मुळा-मुठा तिरी वसलेले पुणे ही सर्वच शहर नदी किनारी वसली. नद्यांची तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी नद्या अविरल, निर्मल, स्वतंत्र होण्यासाठी राहण्यासाठी नेमके प्रश्न काय आहेस हे समजून घेणे गरजेचे आहे. गोदावरी, मुळा-मुठा, मिठी, यमुना, गंगा किंबहुना भारतामधल्या सर्वच नद्या या शोषण, प्रदूषण व अतिक्रमण यांच्यामुळे अडचणीत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची अविरलता आपणच खंडित केलेली आहे.

अविरलता नदी जर अविरतपणे वाहणारी नसेल तर ती नदी होऊ शकत नाही जुन्या गाण्याचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो “ओहरे ताल मिले नदी के जल से, नदी मिले सागर से” परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आता नदी सागराला मिळत नाही तर सागर नदीला भेटायला येतो आणि त्याची मुख्यतः कारणे दोन, एक म्हणजे आपण मोठ्या प्रमाणावर बांधलेली धरणे आणि दुसरे म्हणजे भूजलातील पाण्याचा केलेला बेसुमार उपसा. त्यामुळेच जवळपास सर्वच नद्यांची अविरलता आता अडचणीत आली आहे.

प्रदूषण
प्राचीन काळी नदीचे पाणी हे अमृत समजल्या जात असे नदीत आंघोळीला जाण्याआधी डोक्यावर एक तांब्या घेतला जायचा जेणेकरून नदीत अंघोळ करताना लघवी होऊ नये याची देखील दक्षता घेतली जायची. आता सर्व शहराचे सांडपाणी हे तथाकथित “प्रक्रिया” करून नदीत सोडले जाते आता ही प्रक्रिया नेमकी काय असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरे म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. सर्वात घातक म्हणाल तर नद्यांमध्ये सर्रासपणे सोडले जाणारे रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी.

अतिक्रमण
नदीची आपली एक स्वतःची हद्द असते त्याला आपण पुरेरेशा म्हणतो परंतु आता शहरात जागांच्या वाढत्या किमतीमुळे, मानवी लोभामुळे आपणच त्यांच्या हद्दीत घुसायला लागलेलो आहोत. तसेच “रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट” च्या नावाखाली जवळपास सर्वच शहरांमध्ये नद्यांचे “कॅनॉल” बनवायची प्रक्रिया सुरू झालेली आहे लहान लहान ओढ्यांमुळे नद्या बनतात. शहरांमध्ये तर ते ओढे शोधावे लागतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे थोडासा पाऊस जरी पडला तर सर्वच मोठ्या शहरांच्या रस्त्यांनी नद्या वाहायला लागतात.

शोषण
शोषण ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आधी आपण “विकास” या शब्दाची राज्यकर्त्यांची व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून विकास म्हणजे फक्त सिमेंट/स्टील याचा जास्तीत जास्त वापर. नदीपात्रामध्ये सिमेंट चे काँक्रिटीकरण, बेसुमार वाळू उपसा या माध्यमांनी नदीच्या शोषणाची प्रक्रिया सातत्याने चालू आहे. नद्यांवरील हे सर्व अत्याचार हे गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहेत. आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर दुर्घटना वारंवार घडत आहेत. उत्तराखंडमध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटना, माळीन ची दुर्घटना किंवा आपल्या त्रंबकेश्वर मध्ये थोड्याश्या पावसात रस्त्यावर वाहणारी गोदावरी हे सर्व याचेच परिणाम आहेत.

मनुष्यप्राणी हा स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजायला लागलेला आहे आणि त्यामुळेच निसर्गाने मानवाशी युद्ध पुकारले आहे. निसर्ग खूप मोठा आहे त्याच्या बरोबर युद्धात मानवाला जिंकणे अशक्य आहे आणि ते मान्य करावेच लागेल. यावर उत्तर म्हणजे पुनश्च एकदा, प्राचीन काळाप्रमाणे निसर्गाचा, नद्यांचा, पंचमहाभूतांचा सन्मान करणे हे क्रमप्राप्त आहे. त्यांच्यामुळे आपण आहोत आपण त्यांच्या पेक्षा खूपच छोटे आहोत हे मान्य करावेच लागेल. प्राचीन काळी नद्यांना आई समजत असत आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी आचरण होत असे.

आजही माता म्हणतात परंतु आता ते फक्त म्हणण्या पुरते. आपण नद्यांना माता म्हणतो परंतु त्यांच्याशी मातेप्रमाणे आचरण करतो का? आता आपण त्यांच्याकडे सन्मानाने बघण्याऐवजी, उपभोगाच्या वस्तू म्हणून बघायला लागलो आहोत आणि त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. जर ही परिस्थिती बदलायची असेल आणि ती बदलणे आवश्यक आहे तर आपल्याला परत एकदा त्यांच्याशी प्राचीन काळाप्रमाणे नातं जोडावं लागेल. नद्यांचा सन्मान करावा लागेल. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. तसें केले नाही तर निसर्गाला, नद्यांना फरक पडणार नाहीये परंतु आपला विनाश मात्र निश्चित आहे. आज विश्व नदी दिन या निमित्ताने सर्वांनी मिळून संकल्प करूया आपल्या आपल्या भागातील नदीचा सन्मान करूया…

तिचा सन्मान केवळ पुजा करून होणार नाहीये. तिचा खऱ्या अर्थाने सन्मान करायचा असेल तर तिला अविरल, निर्मल, स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा. प्रत्येकाने किमान एक झाड लावायला हवे आणि ते जागवायला हवे. आपल्या छतावर पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरायला हवा. आपण स्वतः प्रदूषण करू नये आणि करू देऊ नये. प्लास्टिकचा वापर बंद करावा. या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाने केल्या तर खऱ्या अर्थाने नद्यांचा सन्मान होईल.

नाशिकची गोदावरी, महाराष्ट्रातल्या सर्व नद्या किंबहुना भारतातल्या सर्वच नद्या कोर्टकचेरीत अडकल्या आहेत. पर्यावरण प्रेमींना पर्यावरण वादी म्हटलं जातं. विकास विरुद्ध पर्यावरण हा संघर्ष काही नवीन नाही. आपल्या नाशिकच्या गोदावरी चे उदाहरण घ्यायचं ठरलं तर माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय राष्ट्रीय हरित लवाद यांनी अनेक निर्देश दिलेले आहेत. शोषण, अतिक्रमण, प्रदूषण, प्रवाह व त्याचबरोबर समाजाची मानसिकता यावरही अनेक आदेश झालेले आहेत.

माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दोघांवर दोष ठेवलेला आहे. माननीय उच्च न्यायालय मुंबई हे आपल्या आदेशात म्हणते की “On one hand the state has failed in protecting the river and on the other hand the citizens have failed in performing their fundamental duties..” राज्यकर्ते आणि समाज हे दोघेही दोषी आहे असं एकंदरीत माननीय उच्च न्यायालय म्हणते आहे. राज्यकर्त्यांनी काय करावे यासाठी नीरी नावाच्या संस्थेची नेमणूक केली तर समाजाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करावयास सांगितले आहे.

अशाच आशयाचे आदेश जवळपास भारतातल्या सर्व नद्यांच्या बाबत माननीय उच्च न्यायालये आणि माननीय राष्ट्रीय हरित लवाद तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे. परंतु हा प्रश्नच मुळात का निर्माण होतो आहे? याचे कारण म्हणजे समाजाची “निष्क्रियता” ज्या वेळेस समाज म्हणेल की आम्हाला आमची नदी अविरत, निर्मल स्वतंत्र पाहिजे आहे त्याच वेळेला खरेतर नद्यांचा सन्मान होईल. यासाठी खरोखर गरज आहे ती म्हणजे संत म्हणजे विद्वान, शासन आणि समाज यांनी सर्वांनी एकत्र येण्याची.

गरज आहे ती विकासाची परिभाषा बदलण्याची. पर्यावरण पुरक विकास शक्य आहे हे समजण्याची. नद्या आणि निसर्ग यामुळे आपण आहोत, आपल्यामुळे नद्या आणि निसर्ग नाही हे समजण्याची. नद्यांना जोडण्यापेक्षा आपण नद्यांशी जोडले जाण्याची. निसर्गाला बदलण्या ऐवजी आपण आपल्यात बदल घडवण्याची. चला तर मग एक संकल्प करूया गोदावरी चा, ब्रह्मगिरीच्या, निसर्गाचा तथा या पंचमहाभूतांचा सन्मान करूया…

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यशोगाथा! शेती विकू न देता दागिणे गहाण ठेवून दुप्पट द्राक्षबाग करणाऱ्या निळवंडीच्या मीना पवार

Next Post

धक्कादायक! मौलाना बनून युवकांचे माथे भडकावत होता दहशतवादी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
FBe41z5VcAAc9GC

धक्कादायक! मौलाना बनून युवकांचे माथे भडकावत होता दहशतवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011