इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
ट्रॅफिक चलन, नियम आणि तक्रारी
सर्वसाधारणपणे वाहनधारकांना ट्रॅफिक चलन विविध कारणांसाठी येत आहेत. मात्र, या चलनबाबत अनेकविध तक्रारीही आहेत. यासंदर्भात योग्य ती वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे, हे चलन आल्यावर काय करायचे हे सुद्धा लक्षात घ्यावे….
ग्राहक मित्रानो !
आपल्याला ट्रॅफिक नियम साठी चलन आले आहे का?
अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे गेल्या तीन चार दिवसात प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक चलन बाबत तक्रारीसाठी फोन आले आहेत.
तक्रारी खालील प्रकारच्या आहेत.
१) स्पीड लिमिट पेक्षा १ किमी पण जास्त असेल तर २००० रुपये दंड आकारला आहे
२) विधी प्राधिकरणने लोक अदालतीसाठी नोटीस पाठवली आहे आणि त्यात चलन रक्कम त्वरित भरा असे सांगितले आहे.
३) गाडी दुसऱ्याची तरी चलन आले आहे
४) टू व्हीलर असताना फोर व्हीलरचे चलन आले आहे
५) फोर व्हीलर असताना हेल्मेट चे चलन आले आहे
६) नो पार्किंग बोर्ड नसून ही नो पार्किंग चे चलन फाडले आहे
७) नो पार्किंग बोर्ड नसताना पण गाडी टोईंग करून नेली आहे
८) दुसऱ्याचे गाडीचे चलन आल्यावर दंड भरला आहे पण लक्षात आल्यावर परत मागितले तर देत नाहीत.
९) ठराविक चौकातच थांबले की चलन येते शहरात इतरत्र चलन येत नाही
१०) झेब्रा क्रॉसिंग वर थांबल्यावर चलन असेल
११) पोलीस दबा धरून बसतात आणि सिग्नल सुटला की अंगावर धाऊन येऊन पकडुन चावी काढून घेतात आणि चलन फाडतात
१२) सिग्नल तोडला नाही तरी उगीच फोटो काढून दंड आकारतात आणि चलन पाठवतात
१३) गाडीचे नंबर प्लेटचा फक्त फोटो काढतात आणि गाडी टोईंग करून वाहतुकीला अडथळा आला असे सांगून चलन पाठवले आहे.
१४) गाडी नसताना पण फोन वर मेसेज आले की तुम्ही ट्रॅफिक नियम तोडले
१५) साईड मिरर नाही म्हणून टू व्हीलर ला दंड आकारून चलन पाठवले आहे.
१६) एकाच प्रकारच्या गुन्ह्याला कधी २००, कधी ५०० तर कधी १५०० रुपये दंड आकारला आहे.
ग्राहक मित्रानो अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे आम्ही याबाबत माहिती गोळा करत आहोत. ज्या कोणाला आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटते आणि चलन चुकीचे आहे असे वाटते त्यांनी कृपया खालील तपशीलवार माहिती पाठवून द्यावी.
१) नाव
२) फोन नंबर
३) आलेले चलनाचा स्क्रीन शॉट
४) चलन मधील गाडीचा फोटो
५) ठिकाण
६) चलन का चुकीचे त्याची कारणे
७) आपणास आलेल्या नोटीसचा फोटो
८) आपल्याला अजून काही म्हणायचे असेल तर माहिती
कोणत्याही एका व्हॉट्सॲप नंबरवर ही माहिती पाठवून द्या
श्री विजय सागर, पुणे – 9422502315
श्री विलास ठोसर, नागपूर – 7757009977
श्री राजेंद्र बंडगर, ठाणे – 9975712153
सौ राजश्री दीक्षित, पुणे – 9422318909
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
634, सदाशिव पेठ, पुणे 411030
वेबसाईट www.abgpindia.com
Column Jago Grahak Jago traffic Challan Complaint By Vijay Sagar