इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
स्पीड लिमिट आणि ट्रॅफिक चलानचा झोल
रस्त्यालगत स्पीड गनचे वाहन उभे करुन सर्रास वाहनधारकांकडून सर्रास २ हजार रुपयांचे वाहतूक चलान वसूल केले जात आहे. मात्र, हा एक मोठा घोटाळा असल्याचे दिसून येत आहे. तो कसा यासंदर्भात मी स्वतःच घेतलेला अनुभव आणि त्यानंतर माझे चलानच रद्द झाले. ते कसे हे सर्व आता आपण जाणून घेऊया…
मला दिनांक १४ ऑक्टोबर २२ रोजी रात्री ९.४३ वाजता माझे ऑफिस चे काम संपवून परत येत असताना नवले ब्रीज जवळील रस्त्याने येताना (बोगदा क्रॉस करून पुढे उतारावर) स्पीड जास्त आहे म्हणून रुपये २००० चे चलन पोलिसांनी पाठवून दिले होते.
मी फोटो पहिला असता त्यावर माझा स्पीड ६५ किमी प्रती तास होता आणि स्पीड लिमिट हे ६० किमी प्रती तास आहे असा उल्लेख होता.
आपली पोलीस यंत्रणा झकास काम करते आहे असे जाणवले परंतु काही शंका आल्यामुळे मी मी ट्रॅफिक चलन संबंधित ॲप मध्ये वाद उत्पन्न (dispute raise) केला आणि त्यांना खालील माहिती मागवली
१) सदर स्पीड गन ही स्पीड मोजणारी मशीन आहे तेव्हा ती कधी बसवली आहे त्याची माहिती द्या
२) स्पीड गन कधी callibrate केली आहे त्याचे कॅलिबरेशन सर्टिफिकेट द्या आणि सदर कॅलिबरेशन हे एन ए बी एल लॅब मधून केलेले हवे आहे कारण BIS STANDARD नुसार ती आवश्यकता आहे.
३) स्पीडगन उत्पादन करणाऱ्या कंपनी चे नाव द्या
४) भारतीय मानक ब्युरो नुसार कोणतेही measuring device हे कॅलिबरेट केलेले असावे कारण मोजलेला स्पीड आणि खरे स्पीड यात काही अंतर असू शकते जे कॅलीबरेशन करताना नमूद होते.
तरी मला वरील माहिती द्या म्हणजे मी आपण अकारलेले चलन भरेल असे नमूद केले.
सदर वाद मी रविवारी ट्रॅफिक ॲप वरून पाठवला होता आणि आज गुरुवारी मला मेसेज मिळाला की आपली विनंती अभ्यासली आहे आणि आम्ही सदर चलन रद्द केले आहे(deleted).
किती लोक हे जागृत आहेत आणि किती लोकांना माहिती आहे की कॅलिबरेशन सर्टिफिकेट असते, एन ए बी एल लॅब असते, BIS ही एक संस्था आहे जी मानक बाबत काम करते.
कित्येक लोक हे चलन मिळाले की लगेच भरून टाकतात कारण त्यांना भीती वाटते.
तेव्हा सर्व नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. अन्याय सहन करू नका मग तो गुंडांचा असो की पोलिसांचा/सरकारचा
पोलीस चलन साठी आपण गुगल प्ले store मधून mahatraficapp down load करावे त्यात आपली तक्रार दाखल करावी तसेच त्यांचा ईमेल दिला आहे helpdesk@mahatrafficechallan.gov.in यावर तक्रार दाखल करावी.
मित्रांनो आपली पोलीस यंत्रणा खरेच खूप चांगले काम करत आहे हे मात्र नक्की.
आता अशी यंत्रणा आल्यामुळे सर्व काही पारदर्शक आहे तेव्हा पोलिसांनी आजुन हायटेक होऊन उपग्रहावरून नजर ठेवली पाहिजे असे वाटते. ५ किमी जास्त स्पीड साठी २००० रुपये दंड हे पण जरा अतीच होत आहे.
माझी मायबाप सरकारला विनंती आहे की आपली पोलीस यंत्रणा ही जास्तीत जास्त अद्ययावत जरूर करावी परंतु सामान्य माणसाला त्रास देणे साठी त्याचा उपयोग न करता गंभीर गुन्हा करणाऱ्याला शासन करणे साठी करावी असे वाटते.
रोड सेफ्टी ही अत्यंत अत्यावश्यक आहेच पण त्याच बरोबर सामान्य माणसाला आपण किती मोठा गुन्हा केला आहे असे वाटायला नको.
तसेच कायदा हा सर्वांना समान पण हवा.
जेव्हा मंत्री लोकांचा, आमदार खासदार लोकांचा ताफा, पोलिसांच्या गाड्या ह्या प्रचंड स्पीडने जातात तेव्हा त्यांना पण स्पीडगनने स्पीड मोजून दंड आकारला तर मुंबई मधून निघाल्यापासून त्यांचे मतदार संघात पोहोचे पर्यंत कमीत कमी २०००० ते ३०००० दंड होईल. आणि हा दंड त्यांच्या स्वतःच्या खिशातून भरला पाहिजे तेव्हा कुठे सामान्य लोकांना वाटेल की कायदा सर्वांना समान आहे.
ट्रॅफिक चलन बाबत तक्रार अशी करा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे रोज शेकडो फोन येत आहेत आणि त्यात असंख्य प्रश्न विचारले जात आहेत.
बऱ्याच लोकांना आपले चलन चुकीचे आहे हे माहीत असून सुधा त्याबाबत दाद कशी मागायची हे माहीत नाही.
आपणास स्पीड लिमिट बाबत किंवा इतर कोणतेही चलन ची नोटीस मेसेज द्वारे आले तर घाबरु नका.
पोलिसांनी ऑटोमॅटिक पद्धतीने सॉफ्टवेअर द्वारे चलन तयार होऊन ते ग्राहकांना/नागरिकांना मिळेल असे केले आहे. प्रत्येक वेळी चलन आले म्हणजे नागरिक चुकीचेच आहेत असे नाही.
तेव्हा आपण खालील पद्धतीने यावर दाद (ग्रिवेन्स) मागू शकता.
१) प्रथम आपण गूगल प्ले स्टोर मध्ये जाऊन mahatrafficapp हे ॲप डाऊनलोड करा जर ते डाऊनलोड केले नसेल तर. (पाहा स्क्रीन शॉट)
२) त्यानंतर आपण मोबाईल नंबर द्वारे रजिस्ट्रेशन करा. आपल्याला एक OTP येईल त्याद्वारे हे होईल.
३) ॲप मध्ये my vehicles हे बटण आहेत त्यात आपल्या कडे असणाऱ्या सर्व गाड्यांची नोंद करा.
४) त्यानंतर my E-Challans हे बटण दाबले की आपणास कोणत्या गाडीचे बाबत माहिती हवी आहे त्या गाडीचे नंबर वर आलेल्या लिंक वर दाबले की किती चलन आहेत हे समजेल.
५) त्यानंतर आपण सदर चलन नंबर वर क्लिक केले की आपल्याला कोणत्या कारणासाठी चलन भरायचे आहे ते दिसेल
६) आपण सदर पेज वर इमेज असे लिहिले असेल तिथे क्लिक केले की आपणास फोटो दिसेल
७) फोटो पाहून आपण त्यात किती स्पीडने जात आहोत/ हेल्मेट / झेब्रा क्रॉसिंग / सिग्नल तोडला इत्यादी माहिती बरोबर आहे का हे तपासा.
८) चुकीचा फोटो आहे, चुकीचा गाडी नंबर आहे किंवा काही चुकीची माहिती असेल तर आपण दाद मागू शकता
९) दाद मागण्यासाठी आपण या ॲप मध्ये सुरवातीच्या पेजवर डाव्या कोपऱ्यात खाली grievance म्हणून बटण आहे ते दाबा
१०) आपण grievance बटण दाबले की उजव्या कोपऱ्यात खाली अधिकचे चिन्ह आहे त्यावर क्लिक करा
११) चलन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल, भरा
१२) कारण निवडा, (आपले कारण त्यात नसेल तर other निवडा)
१३) रिमार्क कॉलम मध्ये थोडक्यात तक्रारीची माहिती भरा
१४) गाडी नंबर, चासी नंबरचे शेवटचे चार अंक टाकून एक चौकोनी बॉक्स वर टिक करा आणि सबमिट बटण दाबा
१५) आपणास एक मेसेज येईल त्यात आपली विनंती मिळाली आहे आणि एक युनिक रेफरन्स नंबर मिळेल.
१६) आपण या व्यतिरिक्त जेव्हा सदर ॲप उघडता त्यात सर्वात खाली सेंटर ला contact us येथे क्लिक केले की आपणास एक ईमेल आयडी दिसेल
१७) helpdesk@mahatrafficechallan.gov.in हया ईमेल वर आपण सविस्तर तक्रार दाखल करा. त्यात हवे ते पुरावे पण द्या.
ग्राहक मित्रानो कोणतेही मापन करणारे यंत्र/मशीन हे परिपूर्ण असेल याची खात्री नाही. (इथे वेग मोजणारे स्पीड गन)
त्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड या भारतातील संस्थेने प्रत्येक मापन यंत्र हे NABL लॅब मध्ये कॉलिब्रेट (प्रमाणित) केलेले असावे तरच ते बरोबर मापन करते असे प्रमाणित होते.
यंत्रात मापन करताना किती दोष आहे हे प्रमाणित करताना दाखल्यासह दिले जाते. दर सहा महिन्यांनी प्रमाणीकरण केले पाहिजे त्यामुळे प्रत्येक वेळी किती फरक पडतो आहे ते समजते.
त्यामुळे यंत्रावर दाखवलेला स्पीड हा बरोबर आहे हे सिद्ध होत नाही त्यात दोष असू शकतो आणि नागरिक म्हणून, ग्राहक म्हणून आपणास कॅलीबरेशन सर्टिफिकेट मागणे म्हणजे गुन्हा नाही.
पोलीस यंत्रणेने पण मागणी केल्यावर असे सर्टिफिकेट देणे गरजेचे आहे त्यामुळे नागरिकांचा यंत्रणेवर विश्वास बसेल.
तेव्हा नागरिकांनी सजग राहावे. आपले हक्क समजून घ्या, आपले कर्तव्य पण समजून घ्या. नियम मोडू नका. दुसरे मोडत आहेत म्हणून आपण मोडू नका.
नियम हे आपल्या भल्यासाठी केलेले आहेत. त्यात त्रुटी असतील तर ते बदलण्यासाठी प्रयत्न करा, सरकार कडे हरकत नोंदवा.
लोक अदालतची नोटीस आपणास विधी प्राधिकरण कडून आली असेल तरी घाबरु नका.
लोक अदालत मध्ये जे खटले दाखल होतात त्यात दोन्ही पार्टीना मंजूर असतील तरच त्यावर न्याय दिला जातो अन्यथा ते नेहमीच्या न्यायालयात वर्ग होतात.
आपणावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. कोर्टात आपण सामने वाले कडून हवी ती माहिती कायद्याने मागवू शकतो.
आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा. आमची वेबसाईट : www.abgpindia.com अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286, श्री दिपक सावंत 9833398012
डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे 9421526777
Column Jago Grahak Jago Traffic Challan by Vijay Sagar