इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागे ग्राहक जागो
१ ते ११ गुंठे जमीन खरेदी करावी का?
आज आपण एका महत्त्वाच्या विषयाची माहिती घेणार आहोत. ते म्हणजे १ ते ११ गुंठे जमीन खरेदी करावी की नाही. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. हा संभ्रम दूर करण्यासाठीच आजचा हा लेखन प्रपंच…
नुकताच हायकोर्ट ने निकाल दिला आहे की जमिनीचे तुकडे पाडून त्याची खरेदी विक्री वर सरकार रोख लावु शकत नाही. वास्तविक सदर निकाल हा फक्त १९०८ चे स्टॅम्प duty रजिस्ट्रेशन बाबत आहे. आपण पेपरमध्ये, छोट्या जाहिरातीमध्ये, हँडबीलद्वारे तसेच रस्त्याचे बाजूला, फ्लेक्सद्वारे, फेसबुक व व्हाट्सअप द्वारे तसेच भिंतींवर व लाईटमीटरच्या डिपीवर १ ते ११ गुंठेचे प्लॉट स्वस्तात उपलब्ध म्हणून असंख्य जाहिराती वाचतो. व सदर व्यक्तीस फोन करुन नंतर जमिनीचे व्यवहार करतो.
वास्तविक पाहाता १ ते ११ गुंठे जमीन विकणारे हे बेकायदेशीर व्यवहार करणारे असतात. जमिनीच्या खरेदीमध्ये आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण स्वतःच काळजी घेतली पाहिजे. शेतीचे, जमिनीची बेकायदेशीर प्लाँटिंग करुन सामाईक विक्री केली जाते. घर बांधण्यास जमीन खरेदी करताना सदर जमीन अकृषीक (NA) आहे का, हे अगोदर पहावे. फक्त NA जमीनच खरेदी करावी. शेती झोनची जमीन कमीत कमी ११ गुंठे खरेदी करावी लागते. एजंट मात्र ५ ते १० लोकांना एकत्रित प्लॉटची विक्री करतात. कारण शेतीची जमीन ही कमीत कमी ११ गुंठेच विकावी लागते. त्याशिवाय सात-बारा ला नोंद होत नाही. परत विक्री करताना तसेच घर बांधताना बरोबरच्या खरेदीदारांमधे भांडणे होतात. तसेच स्वतंत्र ७-१२ उतारा होत नाही. तरी ग्राहकांनी स्वस्त प्लॉट विक्रीस कदापिही फसू नये.
जमीन खरेदी करताना जमिनीच्या मालकांची खात्री करुन घ्यावी. तसेच ७-१२ उतारा, फेरफार उतारे काढून शहानिशा करावी. जमिनीच्या झोनचा दाखला काढून जमीन शेती झोन आहे की रहिवाशी झोन आहे ते पहावे. फाँरेस्ट झोन (वन क्षेत्र) असेल तर जमीन अजिबात खरेदी करु नये. तसेच जमीन सरकारने अधिगृहीत केली असेल (aquired) तर खरेदी करु नये. तसेच जमिनीवर सरकारने Development Plan मध्ये काही रिझर्वेशन टाकले आहे का ते पहावे. कारण रस्ते, सार्वजनिक सोई सुविधांसाठी जमिनीवर आरक्षण टाकलेले असते. जमिनीचे सर्व कागदपत्रे एखाद्या वकिलास दाखवून मगच खरेदी करावे. म्हणजे फसवणूक होणार नाही. जमीन स्वकष्टार्जीत असेल तर मालक विक्री करु शकतो. पण जर जमीन ही वडिलोपार्जित असेल तर सर्व १८ वर्षे वरील वारसांची संमती अवश्यक असते. तसेच जमीन इनाम किंवा वतनाची नाहीना हे पण पहावे. कारण वतनाची जमीन विकत घेण्यासाठी शासनाची परवानगी लागते.
जमीन खरेदीबाबत मोफत सल्ल्यासाठी ग्राहकांनी आधी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे आपल्या जिल्ह्यातील व्यक्तीशी संपर्क साधवा. आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. त्याशिवाय अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005 किंवा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३० येथे भेट द्या. पुण्यात मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675