इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जागो ग्राहक जागो
ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यास…
सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे असे म्हणतात. त्यामुळेच अगदी किरकोळ पदार्थापासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत ऑनलाईन खरेदीला प्रचंड वेग आला आहे. जशी ही उत्तम सुविधा किंवा पर्याय आहे तसे त्यात फसवणुकीचेही मोठे धोके आहेत. यासंदर्भात अनेकांना चांगला आणि वाईट अनुभव आला असेलच. जर, ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाली तर नक्की काय करावे, असा प्रश्न असंख्य ग्राहकांना पडतो. याचेच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत…
प्रिय ग्राहक मित्रांनो, आपण ऑनलाईन एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा सदर प्लॅटफॉर्म म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, जिओ मार्ट, बिग बास्केट, स्नॅपडील इत्यादी अनेक किंवा तत्सम इतर अनेक कंपनीचे वेबसाईट किंवा ॲप मधून असे व्यवहार आज भरपूर प्रमाणात करतो. असे online व्यवहार करतो आणि कित्येक वेळेला आपल्याला निकृष्ट दर्जाच्या वस्तू सदर साईट वरून मिळतात. काही साईट या फ्री रिप्लेसमेंट देतात तर काही नाही देत.
काही वेळेला आपल्याला सदर गोष्ट हवी असते पण वेळेवर चांगली वस्तु मिळत नाही त्यामुळे आपले नुकसान झालेले असते. तरीही आपण गप्प बसतो आणि तिथेच एक जागृत ग्राहक म्हणून आपण चुकतो आणि त्यामुळेच या कंपनीनचे फावते.
ग्राहक मित्रांनो देशातील प्रमुख ई-कॉमर्स प्लेटफॉर्म ‘फ्लिपकार्ट’ ला नुकताच रुपये एक लाख रुपये चा दंड केला गेला आहे. त्याला कारण असे की त्यांनी निर्धारित मानक (स्टँडर्ड) पेक्षा कमी गुणवत्ता असलेले प्रेशर कुकर विकण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्म वर ठेवले फ्लिपकार्टने खराब क्वॉलिटी चे प्रेशर कुकर विकायला परवानगी देऊन चूक केली होती. त्यामुळे केंद्रीय उपभोक्ता संरक्षण प्राधिकरणने (Central Consumer Protection Authority) ग्राहक हक्काचे उल्लंघन केले मुळे दंड केला.
आपण ग्राहक म्हणून सजग राहिले पाहिजे आणि आपल्याला असा अनुभव आला, खराब निकृष्ट दर्जाचे किंवा आयएसआय चे मानक नसलेल्या काही वस्तू या ऑनलाईन किंवा ऑफलाईन विकत असतील तर एक जागृत ग्राहक म्हणून लगेच त्याची तक्रार सदर ccpa कडे दिली पाहिजे. आपल्या हक्काचे उल्लंघन झाले तर काय करावे हे आता पाहूया.
केंद्र सरकारने वेळोवेळी सामानाची गुणवत्ता मिळणे साठी काही क्वॉलिटी कंट्रोल ऑर्डर कसे राखावे याची सूचना दिलेली असते. कोणत्याही प्रोडक्टची क्वॉलिटी कशी हवी यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही संस्था काम करते. प्रत्येक वस्तू ला चागल्या स्टँडर्ड नेच उत्पादित केले पाहिजे अशा अटी आहेत. हे स्टँडर्ड ठरवणे साठी बऱ्याच प्रमाणात टेस्टिंग केले जाते, कित्येक वस्तू या टेस्टिंग मध्ये फेल होतात मग परत त्यात सुधारणा करून मगच त्या सर्व चाचण्या मध्ये पास झाल्यावर बाजारात विकण्यासाठी ठेवल्या जातात, परवानगी दिली जाते. नव्हे अशा standard मिळाल्यावरच त्या बाजारात विक्री साठी ठेवल्या पाहिजेत असा शासनाचा कायदा आहे.
फ्लिपकार्टने जे कुकर विक्रीसाठी ठेवले होते ते सदर प्रकारे स्टँडर्ड नुसार बनवलेले नव्हते किंवा त्याचे टेस्टिंग केले गेले नव्हते त्यामुळे कित्येक ठिकाणी या कुकर मुळे अपघात होऊ शकले असते. लोक स्वस्त मिळतायत म्हणून खरेदी करतात पण काही वेळेला जीवावर पण बेतू शकते. सर्व इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आयटेम, शिवाय किचन मध्ये लागणाऱ्या वस्तू हे सर्व आयएसआय नुसार पाहिजे. त्यात ग्राहकाचा फायदा असतो. चिनी बनावटीच्या स्वस्त वस्तु घेऊन आपण कित्येक वेळेला फसलो आहे. अशा वस्तू ज्या स्टँडर्ड टेस्टिंग न करून बाजारात आणल्या असतात त्या धोकादायक असतात. सदर फ्लिपकार्ट कंपनीला 598 कुकर बाजारातून परत मागवून ग्राहकांना पैसे परत करणेचा आदेश सेन्ट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटी (CCPA) ने दिला होता.
ग्राहकांच्या अधिकारांना प्रोत्साहन, त्यांचे संरक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण हे कामकाज पाहते. ग्राहक संरक्षण कायदा, 2019, 20 जुलै 2020 पासून अंमलात आला आहे. कायद्याच्या कलम 10 मधील तरतुदीनुसार केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ची 24 जुलै, 2020 रोजी स्थापना करण्यात आली तेव्हा आपण पण आपल्या अधिकारांसाठी बाजारात चांगला माल यावा आणि ग्राहक फसवला जाऊ नये म्हणून लगेच तक्रार करूयात.
आपण CCPA कडे ईमेल द्वारे (com-ccpa@nic.in) तक्रार दाखल करू शकता.
खालील लिंक द्वारे पण आपण तक्रार दाखल करू शकता.
https://consumerhelpline.gov.in
फोन द्वारे किंवा टोल फ्री नंबर खालीलप्रमाणे
1800114000 किंवा 1404 किंवा 1915 तक्रार देऊ शकता.
एसएमएसद्वारे तक्रार करण्यासाठी
8130009809 या नंबर वर एसएमएस ने तक्रार दाखल करू शकता.
तेव्हा ग्राहक मित्रानो सजग व्हा. ग्राहकाला बाजाराचा राजा करणे आपल्या हातात आहे. आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005. तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
अधिक माहितीसाठी संपर्क
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे – 9421526777
Column Jago Grahak Jago Online Shopping Cheating by Vijay Sagar
Online Sale E Commerce Consumer Protection Consumer Rights