इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जागो ग्राहक जागो
वाहन खरेदी आणि लूट
ग्राहक राजा वाहन घेताना रजिस्ट्रेशन चार्ज आणि कर या व्यतिरिक्त कोणतेही चार्जेस देऊ नकोस! शासनाने आता वाहन रजिस्ट्रेशनचे काम खूपच सोपे केले आहे आणि वितरकाचे ऑफिस मध्येच रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करणे ची जबाबदारी वितराकवर टाकली आहे.
प्रत्येक मोठ्या वितरकासा त्यासाठी शासनाने संगणक प्रोग्राम आणि एक विशिष्ट की दिला आहे. असे असतानाही काही वितरक हे वाहन विक्री करतांना *हँडलिंग चार्जेस* म्हणून ग्राहकाकडून अतिरिक्त रक्कम वसूल करत आहेत अशा तक्रारी फोन द्वारे अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे येत आहे. याविषयी आपण आज सविस्तर जाणून घेऊ…
ग्राहक मित्रानो, महारष्ट्र शासनाने यासंदर्भात दि. 14/11/2018 रोजी विसअताप्र०८१८/प्र क्र ४६/परि-४ हे परिपत्रक काढले आहे आणि त्यानुसार वितरकानी वाहन विक्री करताना ग्राहकाकडून नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी/ चारचाकी वाहनाकरिता शासनाने वेळोवेळी विहित केलेले नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये असे बजावले आहे.
या शिवाय प्रादेशिक/उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रत्येक वाहन नोंदणीसाठी वितरकानी परिवहन कार्यालयात जमा केलेल्या कागदपत्रांची काटेकोर तपासणी करून वितरकाने ग्राहकांकडून शासनाने विहित केलेल्या नोंदणीशुल्क व कर याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क स्वीकारले नाही ना याची खातरजमा करूनच वाहनाचा नोंदणी क्रमांक जारी करायचा आहे.
प्रत्येक वाहन विक्री शो रूम मध्ये वाहन नोंदणीसाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेले नोंदणी शुल्क व कर याबाबतची माहिती प्रत्येक वितरकाने दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करावी असे आदेश दिले आहेत आणि शोरूम मध्ये मोटार वाहन नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नाहींत असेही प्रदर्शनी भागात लिहावे असा सक्त आदेश दिला आहे.
ग्राहक मित्रानो आपणास तरीही काही वितरक त्रास देत असतील, नोंदणी आणि कर व्यतिरिक्त काही शुल्क आकारत असतील तर आपण गप्प बसू नका. सदर बाबतीत आपली वितरका बाबत तक्रार असल्यास आपल्या
प्रादेशिक / उपप्रादेशिक परिवहन खाते (आरटीओ) यांच्याकडे लेखी/समक्ष/टपालद्वारे/इ-मेलद्वारे किंवा
transportcomplaints.mahaonline.gov.in या पोर्टल वर तक्रार दाखल करा.
ग्राहकराजा सजग बन शासन आदेश काढते त्याची अम्मल बजावणी होत नसेल तर त्वरित तक्रार दाखल करा. आपण वरील व्यतिरिक्त आपले सरकार या पोर्टल वर देखील तक्रार दाखल करू शकता. कोणत्याही गाडी विक्री करणाऱ्या शोरूम मध्ये गाडी रजिस्ट्रेशन बाबतचे सर्व चार्जेस दर्शनी भागात लावले नसतील तर त्वरित संबंधित शोरूम ची तक्रार आरटीओ कडे करून त्यावर देखील काही होत नसेल तर आरटीओ कडे माहिती अधिकारात खालील बाबी विचारा १) आपल्या पत्राची दखल घेतली का? २) कोणत्या ऑफिसर कडे आपल्या पत्रावर कार्यवाही करणे साठी जबाबदारी दिली आहे त्याचे नाव आणि हुद्दा ३) कारवाई केली असल्यास त्याचा अहवाल द्यावा.
४) कारवाई केली नसल्यास त्याची कारणे काय याची माहिती द्यावी असे माहिती अधिकारात विचारावे.
ग्राहक राजा नुसते फोन वर किंवा संबंधित व्यक्तीला भेटून चर्चा कराच परंतु लेखी पत्र व्यवहार नक्की करा. लेखी पत्र व्यवहार केला की आपल्याकडे पुरावा राहतो शिवाय सर्व सरकारी ऑफिस मध्ये त्यावर कार्यवाही करणे भाग असते. नागरिक हेच मालक आहेत त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पत्रावर कार्यवाही करणे अधिकारी वर्गावर बंधनकारक असते. तेव्हा नागरिकांनी लिहीते व्हावे आणि प्रशासन गतिमान करावे.
आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा:
*दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
सौ अंजली देशमुख 9823135803
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
*नागपूर* श्री विलास ठोसर 77570 09977
Column Jago Grahak Jago New Vehicle Purchase Charges by Vijay Sagar
Automobile Cheating Fraud