इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो
बिल्डरशिवाय सोसायटीची स्थापना करताना…
बिल्डर शिवाय सोसायटीची स्थापना करता येते का आणि ती कशी करायची यासंदर्भात आपण गेल्या लेखात काही माहिती घेतली. आता आपण पुढील माहिती या भागात जाणून घेऊ… सोसायटी स्थापन करताना काय काय करावे लागते यासाठी पुढील कार्यवाही करावी…

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
9422502315
इमारतीमधील सर्व भावी सोसायटी सभासदांची सभा झाल्यावर मुख्य प्रवर्तक आणि इतर ॲक्टिव सभासदांनी खालील गोष्टी कराव्यात. जर खालील कागद पत्रे फ्लॅट धारक लोकांकडे नसतील तर आपल्या महानगर पालिका, नगरपालिका तसेच जिथे ह्या संस्था नाहीत तिथे कलेक्टर चे ऑफिस मध्ये जे प्लॅन ला मंजुरी देतात त्यांच्या कडे खालील कागदपत्रे माहिती अधिकारात तसेच अर्ज करून मागवून घेऊ शकता. त्यात मंजूर नकाशा, complition certificate, 7/12 किंवा सिटी सर्वे चा उतारा, सर्च रिपोर्ट, टॅक्स रिसिप्ट, बिल्डर चे जागा मालक बरोबर झालेला विकसन करारनामा, अफिडविट इत्यादी सर्व कागद पत्रे ही प्रोजेक्ट मंजूर करून घेताना बिल्डर ने वरील पैकी एका संस्थेत जमा केलेली असतात. शिवाय आता रेरा वेबसाईट वर पण आपणास ही कागदपत्रे मिळू शकतात. मुख्य प्रवर्तक (चीफ प्रमोटेर) यांनी प्रथम बँकेत खाते उघडणे साठी आणि नाव आरक्षित करणे साठी सहकारी खात्यात, उप निबंधक यांचे कडे अर्ज करावा लागतो. त्या अर्ज बरोबर आपली योजना खालील प्रमाणे सादर करावी
योजना
मौजे ……. येथील स. क्र. ……… हिस्सा क्र…….प्लॉट क्रमांक…… या ……..चौ. मिटर जागेत मे…………… या फर्म ने/बिल्डर ने इमारतीचे
गाळे बांधून गाळे धारकांना मालकी हक्काने निर निराळ्या चौ. मीटर (चौ फूट) आकाराचे गाळे विकले तसेच काही गाळेधारकांना …….. ते ….. या कालावधी मध्ये ताबे दिले.
सहकारी संस्था स्थापन केल्यामुळे मिळणारा फायदा तसेच इमारतीचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम, व्यवस्था यापासून आम्ही वंचित राहिलो आहोत. आम्हास वेळोवेळी त्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे आम्ही सर्व गाळे धारक यांनी एक सभा दिनांक……. रोजी आयोजित केली आणि त्यामध्ये बिल्डर यांना सहकारी संस्था स्थापन करणे साठी विनंती करणे साठी पत्र/नोटीस द्यायचे ठरले त्याप्रमाणे आम्ही दिनांक…….. रोजी एक नोटीस बिल्डर यांना दिनांक…… रोजी दिली.
तसेच त्यांना प्रत्यक्ष भेटून पण आम्ही संस्था स्थापन करणे साठी विनंती केली. तरीही बिल्डर यांनी संस्था स्थापन करणे साठी कोणतीही कृती केली नाही. वास्तविक सहकार कायदा तसेच फ्लॅट ओनरशिप कायदा नुसार बिल्डर ने सहकारी संस्था स्थापन केली पाहिजे होती पण त्यांनी सदर बाब टाळली आहे आणि बिल्डर हे संस्था स्थापन करणे साठी सहकार्य देत नाहीत. आता आमचा बिल्डर वर विश्वास राहिलेला नाही. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही सर्व गळाधारक यांनी दिनांक….. रोजी एक सभा घेऊन बिल्डर चे सहकार्य विना संस्था स्थापन करणेचे ठरवले आहे. तसेच तसा ठराव संमत केला आहे (त्याची प्रत सोबत जोडत आहे) सदर सभेत ठरल्या प्रमाणे आम्ही संस्थेच्या नावाने बँकेत चीफ प्रमोटर चे नावाने खाते उघडण्यासाठी परवानगी मागितली आहे. सदर परवानगी नंतर सविस्तर संस्था नोंदणी चा प्रस्ताव दाखल करत आहोत.
या नियोजित…… संस्थेत एकूण…….. गाळे आहेत त्यात दुकाने…… ऑफिस……. रहिवाशी……इतके गाळे आहेत. कार्पेट एरिया ही ……… ते ……. इतकी आहे. गाळ्याची किंमत ही रुपये …….. ते रुपये….. इतकी आहे. इमारतीमधील एकूण…. गाळ्यांपैकी ……….इतके गाळे बिल्डर नी विकले आहेत. सदर पैकी आमच्या सभेस ,…दुकानदार,…….ऑफिस धारक………रहिवाशी गाळे धारक उपस्थित होते तसेच ………लोक उपस्थित नव्हते पैकी… ….. लोकांनी सभेचे वृत्त वाचून ते मान्य आहे असे लेखी दिले आहे. आम्ही प्रत्येक भागधारक सभासदा कडून रुपये ५००/- पाच भागासाठी…रुपये १००/- प्रवेश फी आणि रुपये…… प्रत्येकी इतर खर्च साठी घेतले आहेत. संस्था नोंदणी नंतर प्रत्येक सभासद कडून वर्गणी काढून इमारत देखभाल आणि दुरुस्ती करू तसेच इतर अनेक कामे जसे लाईट बिल,सरकारी टॅक्स, पाणी बिल यासाठी वर्गणी काढून खर्च भगवणार आहोत. या सर्व कामासाठी संस्था स्थापन करणेची परवानगी मागत आहोत.
मुख्य प्रवर्तक,
……. नियोजीत सहकारी गृहनिर्माण संस्था………
वरील प्रमाणे योजना तयार करून ती उप निबंधक यांचे कडे सादर करायची असते.
सभे साठी जे हजर आतील त्यांची संमती खालील प्रमाणे घ्यायची असते.
सभेस हजर असणाऱ्या इमारतीतील गाळाधारक लोकांची संमती.
आम्ही खाली सही करणारे राहणार …….इमारत मधील गाळा धारक असून आम्ही नियोजीत……… सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या साठी जी सभा दिनांक……. बोलावली होती त्यात उपस्थित होतो आणि सदर बिल्डर चे सहकार्य शिवाय नियोजीत सस्थे मध्ये या लेखी संमती पत्राद्वारे सामील होत आहोत आणि सभेत ठरल्या प्रमाणे सर्व ठरावास आमची मान्यता आहे. तसेच संस्था स्थापन करणे साठी येणारा खर्च देणे साठी मी बांधील आहे.
अ क्र. ….. सभासदाचे नाव……. गाळा क्रं……. सही
असे संमती पत्र सर्व सभासद कडून घ्यावे. तसेच जे लोक सभेस गैर हजर असतील त्यांच्या कडून पण एक संमती पत्र घ्यावे त्याचा मजकूर असा… सभेस हजर असणाऱ्या इमारतीतील गाळाधारक लोकांची संमती. आम्ही खाली सही करणारे राहणार …….इमारत मधील गाळा धारक असून आम्ही नियोजीत……… सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या साठी जी सभा दिनांक……. बोलावली होती त्यात आम्ही काही कारणांनी उपस्थित नव्हतो. आम्ही सदर बिल्डर चे सहकार्य शिवाय नियोजीत सस्थे मध्ये या लेखी संमती पत्राद्वारे सामील होत आहोत आणि सभेत झालेले सर्व ठराव मी वाचले आहेत आणि त्यात ठरल्या प्रमाणे सर्व ठरावास आमची मान्यता आहे. तसेच संस्था स्थापन करणे साठी येणारा खर्च देणे साठी मी बांधील आहे.
अ क्र. ….. सभासदाचे नाव……. गाळा क्रं……. सही वरील प्रमाणे योजना आणि संमती पत्र तयार करून ते बँकेत खाते उघडण्यास जो अर्ज करतात त्याबरोबर द्यावे त्यामुळे आपणास संस्था स्थापन करण्यास अडचण येणार नाही. या बाबत आणखी माहिती हवी असल्यास आपण अवश्य संपर्क करावा. आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005. आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे 9421526777
Column Jago Grahak Jago How to form Society without Builder by Vijay Golesar