शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो – बनावट पनीर असे ओळखा

by Gautam Sancheti
सप्टेंबर 15, 2022 | 9:40 pm
in इतर
0
IMG 20220913 WA0029 e1663060347153

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
बनावट पनीर असे ओळखा

गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या बातम्या आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की, अन्न व औषध प्रशासनाने ठिकठिकाणी छापे टाकले आणि बनावट पनीरचा मोठा साठा जप्त केला. पुण्यातच तीन कारवाया झाल्या. गेल्या काही वर्षात पनीरचा व्यवसाय प्रचंड वाढला आहे. यात मोठी फसवणूकही होते. त्यामुळे सावधान रहा, सजग राहून नकली पनीर, नकली दूध पावडर आणि नकली दूध यापासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबीयांना वाचवा. आज यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया…

IMG 20220513 WA0011
विजय सागर,
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
9422502315

आपण सध्या वर्तमानपत्र तसेच न्यूज चॅनलवर बातम्या पहिल्या असतील की पुण्यात ५ सप्टेंबर पासून तीन ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनचे वतीने छापे मारले आणि लाखो रुपयांचे नकली पनीर आणि स्किम् मिल्क पावडर जप्त करून नष्ट केले. तसेच अशीच कारवाई नाशिक मध्ये पण केली आहे. आपण जेव्हा जेव्हा लग्न कार्य, मोठ्या पार्टी आयोजित करतो, त्यात आवर्जून पनीरची भाजी ठेवली जाते. ते एक स्टेटस सिम्बॉल झाले आहे. तसेच हॉटेल्स मध्ये जेवायला जातो तेव्हा देखील पनिरच्या 30-40 भाज्यामधून एखादी भाजी निवडून आवडीने खातो.

एक सजग नागरिक आणि जागृत ग्राहक म्हणून आपण कधीही असा विचार करत नाही की आपल्या राज्यात किती गायी म्हशी आहेत आणि त्या रोज किती दूध देतात. शिवाय रोज किती लिटर दूध खपते. साधारण प्रत्येक घरात रोज कमीत कमी अर्धा लिटर ते दोन लिटर दूध लागते. शिवाय दुधा व्यतिरिक्त दही, ताक, लोणी, तूप, खवा, चीज आणि पनीर असे नाना विध दुधाचे प्रकार रोजचे वापरात असतात.

ग्राहक मित्रानो महाराष्ट्र राज्यात एप्रिल 2022 मध्ये एकूण 76 को ऑपरेटिव्ह दूध डेअरी आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ फिशरिज, अनिमल हजबंड्री आणि डेअरी यांनी दिली आहे. सदर माहिती ही राज्य सभेत उत्तर देताना स्वतः मंत्री महोदय यांनी दिली आहे त्यामुळे ती सत्य आहे. मागील पूर्ण वर्षात महाराष्ट्र राज्यात एकूण 13703000 मेट्रिक टन दूध उत्पादन झाले. राज्याची लोकसंख्या ही 12.5 करोड आहे. त्यामुळे दुधाची कमतरता आहे. दूध हे खालील गोष्टींसाठी वापरले जाते.
1. पिण्यासाठी,
2. तूप
3. दही
4. ताक
5. लस्सी
6.पनीर,
7.आईस क्रीम,
8.लोणी
9.स्कीम मिल्क पावडर, 10.लहान मुलांसाठी विविध उत्पादने जसे मिल्क पावडर, फॉर्म्युला, सेरेलॅक, इत्यादी,
11. थंड व सुगंधित दूध.
12. चीझ
13 चहा, कॉफी
14. मिठाई पेढे, बर्फी, खवा, गुलाबजामुन इत्यादी
आता रोजचा वरील उत्पादनाचा खप पहिला तर आपल्या लक्षात येईल की किती जास्त प्रमाणात दूध लागेल. आपल्या राज्यात गुजरात मधून काही प्रमाणात दूध येते.

मागणी जास्त प्रमाणात आहे आणि पुरवठा कमी आहे तरीही रोज एवढे दूध कुठून येते त्याचा विचार केला जात नाही पुण्यात आणि नाशिक मध्ये पनीर फॅक्टरी मध्ये नकली पनीर आणि दूध पावडर जप्त केली त्याची बातमी आपण पहिली किंवा वाचली असेल पण सदर फॅक्टरीज चे एवढे धाडस कसे झाले आणि सदर फॅक्टरिज नी ज्या ज्या दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि मिठाई बनवणाऱ्या लोकांना हाताशी धरून ही विक्री केली त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण नेहमी पेपर मधे जप्तीची कारवाई येते परंतु नंतर काय झाले त्यांनी किती व्यापारी, हॉटेल मालक आणि मंगल कार्यालये, कॅटरिंग व्यवसाय करणारे मोठे कॉन्ट्रॅक्टर यांना हा नकली माल विकला आहे हे शोधून काढून त्यांना जब्री शिक्षा झाली पाहिजे अशी आग्रहाची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे वतीने महाराष्ट्र शासनाकडे केली आहे आणि त्या बाबर जॉइंट कमिश्नर FDA यांना कमिश्नर यांनी सखोल तक्रारीची चौकशी करून रिपोर्ट द्यायला सांगितला आहे.

खरे तर अशा नकली पनीर विक्री आणि वितरण मुळे ग्राहकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हॉटेल तसेच मिठाई बनवणारे यांनी किती तरी लोकांना असे नकली पनीर विकले असेल आणि कित्येक लोकांचे आरोग्यावर वाईट परिणाम झाला असेल. या सर्व पनीर फॅक्टरीनी ज्या ज्या व्यापारी लोकांना माल विकला आहे त्या व्यापारी लोकांवर, त्या व्यापारी लोकांना सप्लाय करणाऱ्या लोकावर खटले दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती.. सदर ईमेल त्यांनी जॉइंट कमिश्नर FDA यांचे कडे वर्ग केली आहे आणि सखोल चौकशी करून केलेल्या कारवाईची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे देणे साठी कळवले आहे.

या गुन्ह्यात सामील सदर व्यापारी आणि पुरवठा साखळीतील लोक हे देखील या फॅक्टरी मालकांबरोबर जेल मध्ये गेले पाहिजेत. त्यांनी ग्राहकांचे जीवाशी खेळ खेळला आहे. त्यांना व्यापार करायचा काहीही अधिकार नाही. मित्रानो आपण जेव्हा पनीर घेता तेव्हा ते कसे तपासून पहावे……
– आपल्या जिभेच्या टोकावर थोडासा पनीरचा तुकडा ठेवा आणि जर ते आंबट किंवा कडू वाटत असेल तर पनीर खराब आहे हे नक्की.
– पनीरचा पोत तपासा, ते सडपातळ नसावे.
– पनीरचा वास घ्या – त्याला आंबट किंवा उग्र वास नसावा.
– पानीरचा रंग पहा. तो पिवळा असेल तर घेऊ नका.
– फ्रीझरमध्ये पनीर ठेवल्याने ते तुटते आणि त्याचा पोत आणि चव खराब होते.
– पनीर साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चिलर ट्रे (दुधासाठी चिन्हांकित शेल्फ किंवा फ्रीजरच्या अगदी खाली शेल्फ)

पनीरच्या पॅकेटमध्ये पाणी मिळणे सामान्य बाब आहे. पाणी हे पनीर ओलसर ठेवते आणि ते चुरा होण्यापासून थांबवते.
नेहमी ताजे पनीर तयार करण्याचा सल्ला दिला जातो. जराही शंका आल्यास साठवलेले पनीर फेकून द्यावे आणि त्याचा बाहेरील थर काढून आतील भाग वापरण्याचा प्रयत्न करू नये. कारण आपणास फूड पोइजन (विषबाधा) होऊ शकते.
पनीर गोठवले तरी २-३ दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. पनीरमधून दुर्गंधी येते आणि त्याचा रंग फिकट पिवळसर होतो. ते थोडे चिकटही होते. पनीर दुग्धजन्य पदार्थ असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सेवन करणे आवश्यक हितावह आहे

खरे तर दुकानातून पनीर आणणे पेक्षा आपण घरीच पनीर केले पाहिजे. त्याची बनवण्याची कृती पाहू..
साहित्य : दूध – 1/2 लिटर, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस – 3 ते 4 थेंब किंवा आवश्यकतेनुसार.
दूध उकळवा आणि नंतर लिंबाचा रस किंवा व्हिनेगरचे दोन थेंब घाला. ते जेलचे स्वरूप येईपर्यंत थांबा. नंतर पाणी काढून टाका आणि जेल पदार्थ स्वच्छ कपड्यात गुंडाळा. कापड जड वस्तूखाली ठेवा. यामुळे अतिरिक्त पाणी पिळून पनीर मऊ होते.
पनीर तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवण्याची गरज नाही, फक्त रेफ्रिजरेशन पुरेसे आहे. तुकडे करण्यापूर्वी ते खोलीच्या तपमानावर थंड करा.
आपण दुकानात पनीर घेतले नंतर जर खराब पनीर असेल तर लगेच अन्न आणि औषध प्रशासन कडे बिल आणि पनीर द्या आणि तक्रार करा.
दुकानदार लगेच परत घेतो आणि पैसे देतो म्हणजेच त्याला माहित आहे की १०० ग्राहकांपैकी २-५ लोक तक्रार करण्यासाठी येतील आणि त्यातही १-२ लोक फक्त लेखी तक्रार देतील.

ग्राहक मित्रानो आपण आपल्या जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी संपर्क साधून या व्यवसायाचे शुध्दीकरण करूयात. अधिक माहितीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे ४११०३०. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675

ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103

*पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे – 9421526777

Column Jago Grahak Jago How to Find Duplicate Paneer by Vijay Sagar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या तालुक्यातील ९ सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शुक्रवार – १६ सप्टेंबर २०२२

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - शुक्रवार - १६ सप्टेंबर २०२२

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011