सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो – घर/फ्लॅटचा ताबा वेळेवर मिळाला नाही तर काय करावे?

by Gautam Sancheti
जून 9, 2022 | 10:09 pm
in इतर
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो
घर/फ्लॅटचा ताबा वेळेवर मिळाला नाही तर काय करावे?

ग्राहक मित्रांनो, आपण बिल्डरकडे फ्लॅट बुक केला त्याबरोबर करारनामा केला आणि त्यात ताबा/ पझेशन ची तारीख ही समजा १ मार्च २०२२ अशी लिहिली आहे पण आता जून महिना उजाडला तरीही पझेशन मिळाले नाही ते साधारण १ जुलै २०२२ ला मिळेल असे बिल्डरने सांगितले आहे त्यामुळे आपणास काय काय नुकसान होते त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आज आपण यासंबंधी अतिशय सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

IMG 20220513 WA0011
विजय सागर,
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
9422502315

*काही जुनी लोक आहेत ते म्हणतील की ४ महिनेच फक्त उशीर होत आहे त्यात काय विशेष आमच्या काळी तर चार चार वर्षे घराचा ताबा उशिरा मिळत होता किंवा मिळत पण नव्हता, आपण बिल्डरचे काहीही वाकडे करू शकत नाही कारण बिल्डर पैशाने तकदवान असतो वगैरे वगैरे.*

पण माझ्या ग्राहक मित्रानो आपणास माहीत आहे का? मोफा कायदा, रेरा कायदा, ग्राहक संरक्षण कायदा १९८६ आणि २०१९ नुसार आपणास उशिरा ताबा/ delay in possession साठी बिल्डर कडून नुकसान भरपाई मिळू शकते. नव्हे तशी नुकसान भरपाई कित्येक ग्राहकांना जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग यांनी दिलेली आहे. आता आपण पाहू की आपणास काय काय नुकसान होत आहे.

1) उशिरा ताबा मिळाला तर जितके दिवस/महिने उशिरा ताबा मिळतो त्या काळासाठी सध्या राहत असलेले घराचे घरभाडे भरतो त्याची नुकसान भरपाई मागू शकता.
2) जर त्या काळातच आपणास घर बदलावे लागले असेल जसे ११ महिन्याचा करारनामा संपला असेल तर आपणास ब्रोकरेज १-२ महिनाचे भाडे द्यावे लागले असेल तर तेही नुकसान भरपाई म्हणून मागू शकता.

3) आपण बिल्डरला जेवढे पैसे फ्लॅट पोटी दिले आहेत त्यावर बँकेत भरावे लागलेले व्याज आपण नुकसान भरपाई म्हणून मागू शकता.
4) आपण घराचा हप्ता ( EMI) शिवाय घरभाडे अशा दोन्ही गोष्टी भरता त्यामुळे आपणास फिनासिअल / आर्थिक भार पडतो त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो, जीवनातील इतर गोष्टीवर खर्च करू शकत नाही, कित्येक गोष्टी मन मारून मुकाट्याने सहन कराव्या लागतात, त्यामुळे कोटुंबिक कलह निर्माण होतो त्याची भरपाई पण आपण मागू शकता.

5) इन्कम टॅक्स कायद्या नुसार घराचे पझेशन मिळाले वर आपणास घरावरील कर्जाचे व्याजवर वजावट तसेच प्रिन्सिपॉल चा क्लेम आपण करू शकता पण पझेशन मिळाले नाही तर त्यास आपण मुकता त्यामुळे सदर नुकसान भरपाई पण आपण निश्चित मागू शकता.
6) समाजामध्ये आपली पत/ इभ्रत जाते कारण आपण घरमालकाला, मित्र आणि नातेवाईक यांना मला १ मार्च ला लझेशन मिळणार असे सांगतो पण ते मिळत नाही त्यामुळे समाजात आपली पत ढासळते, घरमालक घराबाहेर काढू शकतो.
यासाठी आपण नुकसान भरपाई मागू शकता.

7) आपणास घर मार्च मध्ये मिळाले नाही त्याऐवजी ते जुलै मध्ये मिळणार आहे आणि काही कारणास्तव आपणास आपले घर विकायचे आहे, आपल्याला घर विकून मुलीचे लग्न करायचे आहे, घर विकून मुलांना परदेशात पाठवायचे आहे पण घर तयार नाही त्यामुळे विकायला गेले तर कमी पैसे मिळतात. होणारी नुकसान भरपाई ही बिल्डर मुळेच होती कारण त्याने उशिरा ताबा देणे, प्रोजेक्ट वेळेवर तयार न होणे त्यामुळे सदर नुकसान भरपाई पण मिळू शकते.

8) काही बँकेत कर्जाचा हप्ता हा पूर्ण कर्ज रक्कम दिल्यानंतर सुरू होतो आणि तो पर्यंत फक्त प्री ई. एम. आय. व्याज बँक घेते अशा वेळी कर्ज फेडणेचा कालावधी हा लांबत जातो त्यामुळे त्यावेळी जर व्याज वाढलेले असेल तर त्यामुळे नुकसान होते. काही लोक हे रिटायर होणार असतात आणि त्यांना पेन्शन पण मिळत नाही अशा वेळी शेवटी कर्ज फेडणे थोडे अशक्य होते त्यामुळे भविष्यात होणारी नुकसान भरपाई ही बिल्डर कडून मागावी.

9) आपल्या मुलांना आपण नवीन घर मिळणार आहे त्यामुळे त्या घराशेजारी असणारी शाळा निवडतो पण जुने घर मात्र त्या शाळेपासून लांब आहे त्यामुळे त्यासाठी स्पेशल रिक्षा/बस लावावी लागते त्याचे चार्जेस आपण नुकसान भरपाई म्हणून मागू शकता.

10) आपले तसेच आपल्या घरातील लोकांचे ऑफिस जवळ आहे म्हणून आपण नवीन घर ऑफिस जवळ घेतो. जुने भाड्याचे घर हे ऑफिस पासून लांब आहे. जेव्हा उशिरा ताबा मिळतो तेव्हा आपणास तसेच आपल्या घरातील इतराना ऑफिसला जाणे येणे साठी रिक्षा, मोटार सायकल, टॅक्सीचा जो अतिरिक्त खर्च येतो तो आपण बिल्डर कडून मागू शकता.

तेव्हा मित्रानो उशिरा ताबा याबाबत आपण वरील बाबीवर लक्ष दिले आहे का?. आणि जिथे जास्त फ्लॅट आहेत तिथे कॉलेक्टीवली सगळ्यांचे किती नुकसान होते. समजा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये 100 फ्लॅट आहेत तिथे उशिरा ताबा मिळाला आणि साधारण घरभाडे रुपये 15000 प्रती महिना असेल तर फक्त घरभड्या पोटी सगळ्यांचे मिळून एका महियाला रुपये 15 लाख नुकसान भरपाई होते आणि चार महिन्यांचे रुपये 60 लाख एवढी फक्त घरभाड्या पोटी नुकसान भरपाई होते.

इतर दहा बाबी ज्या वर नमूद केल्या आहेत त्याचा विचार केला तर किती नुकसान भरपाई ही एका उशिरा ताब्यामुळे होते याचा हिशोब करा. ग्राहक मित्रानो आपण घर विकत घेताना सर्व इमारतीतील लोक एकत्र नव्हतो पण आपण आता तरी एकत्र आहोत तेव्हा एकत्रित रित्या लढा द्या. आपण जिल्हा ग्राहक संरक्षण आयोग (50 लाख रुपये चे खाली फ्लॅटची किंमत असेल तर), राज्य ग्राहक संरक्षण आयोग (रुपये 50 लाख ते रुपये 2 कोटी पर्यंत घराची किंमत असेल तर) आणि राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोग (रुपये 2 कोटी पेक्षा जास्त घराची किंमत असेल तर) नुकसान भरपाई मागू शकता.

तेव्हा ग्राहक मित्रानो आता तरी संघटित व्हा आपले हक्क समजून घ्या. एकित बळ असते हे लक्षात घेऊन एकत्रित लढा द्या. शिवाय ग्राहक हा राजा आहे तेव्हा राजाने लढले पाहिजे रडून काही उपयोग नाही. बिल्डर हा पैसे वाला आहे किंवा त्याच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्याच्याकडे गुंड गिरी आहे असे काही ग्राहक नेहमी ग्राहक पंचायत कडे तक्रारी करत असतात आणि शिवाजी हवा आहे पण मी तो होणार नाही अशी मनोवृत्ती झालेली आहे.
मित्रांनो, आपण घाबरता न डगमगता आपण आपली झालेली नुकसान भरपाई मागा. मी स्वतः 1991 मध्ये बिल्डर कडून अशी नुकसान भरपाई घेतलेली आहे. शिवाय एनसीडीआरसी या वेबसाईट वर असे असंख्य निकाल आहेत.

ग्राहक मित्रानो आपण भीक मागत नाही तर आपला हक्क मागतो आहे हे लक्षात ठेवा आणि केंद्र शासनाने सदर ग्राहक संरक्षण कायदा, रेरा कायदा हा ग्राहक संरक्षणासाठी केला आहे त्याचा फायदा घ्या. आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे मोफत सल्ला घेऊ शकता. आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

अधिक माहितीसाठी संपर्क
विजय सागर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920

श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १० जून २०२२

Next Post

चांदवडचे माजी आ. शिरीषकुमार कोतवाल यांच्या अंगावर कांदा शेडचा पत्रा पडल्यामुळे किरकोळ जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
shirish kotwal

चांदवडचे माजी आ. शिरीषकुमार कोतवाल यांच्या अंगावर कांदा शेडचा पत्रा पडल्यामुळे किरकोळ जखमी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011