रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो – फ्लॅट दिला तरी बिल्डरने अन्य सुविधा दिल्या नाहीत? काय करायचे?

जुलै 1, 2022 | 10:19 am
in इतर
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो 
फ्लॅट दिला तरी बिल्डरने अन्य सुविधा दिल्या नाहीत? काय करायचे?

ग्राहक मित्रांनो, आपण फ्लॅट बुक करायला गेला तेव्हा बऱ्याच सुविधा पाहून सदर बिल्डरकडे आपण फ्लॅट बुक केला असेल. त्यानंतर तुम्ही घरात रहायला आलात. पण, बिल्डरने सांगितलेल्या अन्य सुविधा अद्यापही दिलेल्या नाहीत, अशा अनेक तक्रारी आहेत. या सुविधा नाही दिल्या तर ग्राहक म्हणून तुम्ही काय करु शकतात, तुमचे काय अधिकार आहेत, आदींविषयी आपण जाणून घेऊया…

IMG 20220513 WA0011
विजय सागर,
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
9422502315

बिल्डरने फ्लॅटबुक करतेवेळी तुम्हाला अनेक सुविधा देण्याचे सांगितले असेल जसे  पोहण्याचा तलाव, बाग, खेळायला मैदान, जिम, रिक्रेशन हॉल, रूफ टॉप अंफी थिएटर, गेस्ट रूम्स, नोकरांना राहण्यासाठी खोल्या, सोलर वॉटर हिटर, डोअर व्हिडिओ फोन, ऑटोमॅटिक वॉटर कंट्रोलर, डबल लिफ्टस, कॉमन अंटेना, वायफाय सिस्टीम इत्यादी अनेक सोई सुविधा, अमिनिटीज.  बिल्डरने तशा जाहिरातीत दिल्या असतील. एखादे पॅम्पलेट दिले असेल. पण या सर्व सेवा सुविधांचा उल्लेख जाणून बुजून आपल्या करारनाम्यात केला नसेल आणि फ्लॅट बुक करताना आपण त्यांना विचारले तर आमचा हा प्रेस्टिज प्रोजेक्ट आहे, आपण चिंता करू नका, असे सांगितले असेल. पण आपणास आता फ्लॅट चा ताबा दिला असेल तेव्हा मात्र आपणास या सेवा सुविधा दिल्या नसतील आणि प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आपणास त्या देऊ असे बिल्डर सांगत असेल तर काय करायचे म्हणून गप्प बसू नका.

ग्राहक मित्रानो फ्लॅट चा ताबा दिला त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या सर्व सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत. नाहीतर प्रोजेक्ट ज्यात चार पाच बिल्डिंग आहेत त्या पूर्ण होण्यास जर पुढे चार पाच वर्षे जात असतील तर आपल्याला बिल्डर ने सर्व्हिस दिलेली नाही, त्याने कबूल केलेल्या सुविधा दिल्या नाहीत म्हणून आपणास नुकसान भरपाई मागता येते.
काही फ्लॅट धारक हे वयस्कर असतात आणि पुढे चार पाच वर्षे आनंदाने जगावे म्हणून फ्लॅट घेतला असेल तर त्यांना आनंदाने जगात येत नाही कारण बिल्डर ने त्या सेवा सुविधा दिलेल्या नाहीत.

अशा वेळेस शक्यतो सर्व लोकांनी एकत्र येवून बिल्डर ला नोटीस द्यावी आणि सेवा सुविधा 15 ते 30 दिवसात द्याव्यात असे त्यात नमूद करावे शिवाय त्या सेवा सुविधा तुम्हाला बनवायच्या झाल्या तर त्यास इतके रुपये लागतील आणि सदर खर्च आपणाकडून वसूल केला जाईल असेही त्यात नमूद करावे आणि सही करून तारीख, पत्ता टाकून असे पत्र शक्यतो रजिस्टर पत्राने, स्पीड पोस्ट ने त्या बिल्डर ला पाठवावे. बिल्डर ने आपल्या मुदतीत या सुविधा नाही दिल्या तर सरळ ग्राहक आयोगात संयुक्त रित्या तक्रार दाखल करावी. या सेवा सुविधा साठी लागणारी जमीन, त्याला लागणारे बांधकाम साहित्य इत्यादीचा हिशोब करुन तशी नुकसान भरपाई मागावी. एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ला बोलवून त्याच्या कडून या कामासाठी लागणारे कोटेशन घ्या म्हणजे आपणास त्याची मदत होईल.

ग्राहक मित्रांनो आपण गप्प बसू नका, अन्याय सहन करू नका. जागे व्हा आणि आपले हक्क, आपले अधिकार जाणून घ्या, त्याची मागणी करा आणि तरीही दिल्या नाहीत तर बेलाशक अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे मोफत मागदर्शन घेऊन ग्राहक आयोगात तक्रार दाखल करा. आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. विजय सागर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005. तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

अधिक माहितीसाठी
विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785

श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675

*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103

*पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे 9421526777

Column Jago Grahak Jago Flat other Aminities availability by vijay sagar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देवेंद्र फडणवीस यांचा गेम कुणी आणि का केला? (व्हिडिओ)

Next Post

महाराष्ट्रातील खेळीमागे भाजपचा मोठा डाव; मुंबई मनपा, लोकसभा आणि पवार हे आहेत लक्ष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील खेळीमागे भाजपचा मोठा डाव; मुंबई मनपा, लोकसभा आणि पवार हे आहेत लक्ष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011