बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण – हटके डेस्टिनेशन – शिकारा (काश्मीर)

by Gautam Sancheti
मे 13, 2021 | 12:29 am
in इतर
0
IMG 20210505 WA0014

शिकारा (काश्मीर)

काश्मीरचे पर्यटन तीन वर्षांनी खुले झाले आणि एक मोठा, वेगळा आणि अविस्मरणीय असा अनुभव मिळाला. कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणात काश्मीरचा हा दौरा अनेक अर्थाने खुप काही देऊन जाणारा ठरला.
भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
खरंतर काश्मीर खोर्‍यातील श्रीनगर -गुलमर्ग-सोनमर्ग-पहेलगामपासून अरुणाचल प्रदेशातील तवांग-माधुरी लेकपर्यंतच्या हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगामधे एखाद्या वारकर्‍याप्रमाणे माझ्या फेर्‍या सुरु असतात. या संपुर्ण परीसरात नेहमी नेहमी गेल्याने येथे फिरतांना अगदी आपल्या गावात फिरण्यासारखाच माझा अनुभव असतो.
येथील नेहमीची माणसं, पर्यटन स्थळं, गाडीवाले, दुकानदार अगदी चहाची टपरी वाले इतके ओळखी झाले की त्यांच्याशी काही काम नसलं तरी गळाभेट ही ठरलेलीच असते. दरवेळी एक वेगळीच मजा येते. थोड्या गप्पा टप्पा  होतात, सुखदुखाची देवाण घेवाण होते. जेव्हा उत्तराखंडमधील माना व्हिलेज सारख्या दूर्गम भागातील हिंदूस्तान का आखरी चहावाला आपले एक कप चहाचे पेसे घेत नाही. वरुन अद्रक-बिद्रक घालून चहा पाजतो. तेव्हा पर्यटनातून मिळालेली ही श्रीमंती जरा जास्तच भावते. प्रश्न त्या १०/२० रुपयांचा नसतो तर आपल्या गावापासून हजारो किलोमीटर दूरवर असे जे प्रेम मिळते ते अति सुखावह असते. अशा या हिमालयाच्या सानिध्यात फिरतांना सगळ्यात जास्त मजा कुणाची असेल तर ती टूर संचालकाची असते. हे मी १००% सांगू शकतो.
        काश्मीर तर अगदी दुसरं घरच. मात्र मध्यंतरीच्या पुलवामा हल्ला, मग काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयामुळे पडलेला खंड व त्यानंतर मागील वर्षाचा अचानक उद्भवलेला कोरोना या सलग घटनांमुळे तीन वर्ष काश्मीरात जाता आले नव्हते. परंतु यंदा मात्र १ ते २० एप्रिल असा सलग २० दिवस काश्मीर खोर्‍यातील मुक्कामाने सगळी कसर भरुन निघाली असे म्हणता येईल.सलग तीन सहली असल्याने धावपळ होणारच. पण काश्मीरच्या आल्हाददायक हवामानात हे कष्ट समजून पण येत नाहीत. मुळात आपण दमतच नाही. शिवाय सोबत काश्मिरी आदरातिथ्य असल्यावर काय विचारावे.
       खरं सांगतो सहलींच्या निमित्ताने अनेकदा काश्मीरमधे जाणे होते व सगळे व्यवस्थित होईल ना? ही  एक भीती कायम कुठेतरी मनात असते. अगदी शेवटच्या दिवशी श्रीनगर विमानतळावरुन विमान आकाशात झेप घेईपर्यंत हे टेन्शन कायम मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी असतेच असते. तसा या क्षेत्रातील अनुभव व स्थानिकांशी असलेले संबध यामुळे खरंतर  कधीही म्हणाव्या अशा मोठ्या अडचणी आल्या नाहीत. परंतु टेन्शन हे असतेच असते.

IMG 20210505 WA0021

 यंदा मात्र सुरवातीपासूनच असं काही वाटलंच नाही. याची दोन प्रमुख कारणं. एक म्हणजे तीन वर्षाच्या पर्यटकांचा दुष्काळामुळे काश्मीरातील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना तीन वर्षात बर्‍यापैकी अक्कल आलेली दिसली. दुसरे म्हणजे मोदी सरकारने कलम ३७० रद्द केल्यापासून अशांतता माजवणार्‍या व्यक्ती, संघटनांचे प्रमुख यांची घरात अथवा जेलमध्ये केलेली नजरकैद.
केंद्र शासनाने काश्मीर कायम धगधगत ठेवणार्‍या सर्वांच्याच व्यवस्थित मुसक्या अवळल्यामुळे माथेफिरुंना कुणी चिथवत नाही, जो तो पर्यटकांची ऊठबस करण्यात व दोन पैसे कमवण्यात मग्न आहे. या बाबींचा सर्वत्र एक दुरगामी फरक झाला असून या सिझनमधे प्रचंड शांतता आहे. रात्री-बेरात्री काश्मीरात फिरतांना कुठेही असुरक्षित वाटलंच नाही.
सर्व पर्यटन स्थळे, रस्ते, हाॅटेल्स, मार्केट येथे रात्री ९/१० पर्यंत अगदी पर्यटक महिला एकट्या फिरतांना दिसल्या. याचे श्रेय खरंतर दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून चौकाचौकात उभ्या असलेल्या भारतीय आर्मीला द्यावेच लागेल. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण १२ /१२ तास किमान २५/३० किलो वजन घेऊन ऐका जागी उभे राहणे भयानक कष्टाचे काम आहे. त्यात प्रचंड थंडीही असते. पण सैनिकांची क्षमता खरंच वाखाणण्याजोगी आहे.

IMG 20210505 WA0017

 घरुन बनवून आणलेला खाऊ आम्ही ब्रिजबेहरा येथे काही सैनिकांना दिला. तेव्हा त्यांनी सांगितले की, “तुम्ही आमच्यासाठी हा विचार केला” हेच खुप आहे. मंडळी विचार करा, ९० च्या दशकात काश्मीर खोरे जवळपास भारताकडून निसटलेच होते. पण आज काश्मीरवर सैन्याने पुर्णतः नियंत्रण मिळवले असून यासाठी अनेक सैनिकांना हकनाक प्राण द्यावे लागले. ही वस्तुस्थिती आहे. काश्मीर सहली करु नये यातूनच आलेल्या पैशाने अतिरेकी कारवाया वाढायला मदत होते. असाही एक विचार प्रवाह आहे. पण मला नाही असं वाटत. याउलट जास्तीत जास्त भारतीयांनी काश्मीरात नेहमी नेहमी जावे. यामुळे तेथील सामान्य काश्मीरी जनतेला उत्पन्न सुरु होईल. ते राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील, हेच खरे आहे. आणि राहिला दहशतवाद तर निदान आजतरी खोरे पुर्णतः आर्मीच्या नियंत्रणात आहे. आणि आपण काही न करता आपल्या सीमा व्यवस्थित ठेवल्या तर पाकीस्तान सारखा मुर्ख शेजारी आहेच आपले महत्व वाढवायला. असो.
        खरं पाहता काश्मीर येथे गेलेला कुठलाही पर्यटक श्रीनगर, गुलमर्ग, सोनामर्ग, पहेलगाम येथील नेहमीच्या पर्यटनस्थळांपेक्षा वेगळं काही बघत नाही. कारण सुरक्षिततेच्या कारणांमुळे इतर अनेक पर्यटनस्थळं विकसितच झाली नाही. पण मी यावर्षी जाणीवपुर्वक काही बदल केले होते. ते म्हणजे पहेलगाम परीसरातील आरु व्हॅलीसाठी खास वेगळा दिला.

IMG 20210505 WA0019

मत्तान येथील सुर्यमंदिर बघितले. खूप वेगळ्या व निसर्गरम्य गावातून असेच फिरलो. लोकांच्या घरात जाऊन जेवलो ,रोज सायंकाळी किमान ५ स्थानिकांशी पर्यटकांना सवांद साधून दिला. क्रिकेट बॅट बनविणारे, गालीचे बनविणारे कारागीरांशी गप्पाटप्पा हा एक वेगळाच अनुभव होता.
केशराच्या मळ्यातील कामगारांचे प्रॉब्लेम समजल्यावर केशरातील दुःख कळले.  काश्मिरी माणूस खरंतर कुठेही आदरातिथ्यांचं ट्रेनिंग घेत नाही, पण तुंम्ही त्याच्याशी बोलण्याचे कसब साधले तर तो प्रचंड मोकळा होतो. मग तो जे काही अनुभवाची शिदोरी खोलतो ती तुमच्यासाठी बोनस असते. हाऊसबोट वरील कामगारांशी बोलतांना तुंम्हाला खास गोर्‍यांचे (फाॅरेनर) अनुभव तर अनेक नवनवीन माहिती देणारे असतात.
        एक मात्र सर्वत्र फिरतांना दिसून येते ते म्हणजे, काही ठराविक लोक प्रचंड श्रीमंत आहेत तर साधा काश्मीरी प्रचंड गरीब आहे. याचं प्रमुख कारण काश्मीरातील भ्रष्टाचार. देशभरात इतका भ्रष्टाचार कुठेच नसेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काश्मीरमधील निसर्गरम्य पर्यटन स्थळे विकसित करणे. ७० वर्षात पाहिजे तसे पायाभूत सुविधा उभ्या न केल्याने अनेक जण रोजगारापासून वंचित राहिले.
नवनवीन पर्यटन स्थळांचा जेवढा विकास झाला असता तेवढे नवनवीन रोजगार निर्माण झाले असते. तेवढा स्थानिक माणूस विधायक कामात अडकून राहिला असता. परंतु दुर्देवाने तसे झाले नाही. मी काश्मीर व युरोप दोन्ही ठिकाणं बघितली आहेत. जर काश्मीर खोर्‍यात रस्ते, पर्यटन स्थळं, नवनवीन पार्क, रेल्वेने बर्फाच्छादित शिखंर फिरणं अशा सोयी झाल्या तर भारतातून युरोपात फार काही कुणी जाणार नाही. पण याला वेळ लागेल. मात्र सुरुवात झाली आहे.

IMG 20210505 WA0018

प्रामुख्याने बर्फाच्छादित प्रदेशात बारमाही रस्ते बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. जोझिला पास येथे १४/१५ किमीचा बोगदा तयार होत असून सन २०२५ पर्यंत श्रीनगर ते लेह आपण बाराही महिने प्रवास करु शकू. सध्या हा मार्ग केवळ सहा महिनेच उपलब्ध असतो. अशी अनेक विकासाची कामे सुरु आहेत. लेह-लडाख आता केंद्रशासित प्रदेश झाल्याने नजिकच्या काळात देशभरात सर्वाधिक पर्यटक लेह-लडाख येथे पोहचतील हे नक्की. तसेच लडाखी लोक मुळातच कष्टाळू असल्याने लडाख भूतानसारखे आपले वेगळे स्थान निर्माण करेल असे दिसते आहे.
         अर्थात तीन वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर गेल्यामुळे काही गोष्टी स्पष्टपणे जाणवल्या. जाणवल्या म्हणण्यापेक्षा खटकल्या त्या म्हणजे सुप्रसिद्ध दाल लेक व नगीन लेक मधील हाउसबोटची भरमसाठ वाढ, हाॅटेल्सची अतिक्रमणं, सोनामर्गच्या थाजिवासाच्या ग्लेशियरर्समध्ये हाॅटेल्सची घुसखोरी, झेलम-लिड्डर-सिंध या निर्मळ नद्यांमधील प्रदूषणं, श्रीनगर शहराचा सांडपाण्याच्या प्रश्न इ. हे सर्व वेळेवर आवरले नाही तर मग पृथ्वीवरील या स्वर्गाचे नरकात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही. याबाबत केंद्र शासनातील पर्यावरण मंत्रालयाने त्वरीत हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. कारण स्थानिक प्रशासनाबाबत वर लिहीलेच आहे. अशी ही काश्मीर सफर अगदी विना अडथळा पार पडली. सगळे इतके खुष झाले की अजूनही जगप्रसिद्ध ट्युलिप गार्डनमध्येच मनाने गुंतलेले आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुबगुबीत गाल हवेत; मग हे कराच

Next Post

अंतराळाची सैर करायचीय? ही आहे संधी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
2 1 1 1024x681 1
संमिश्र वार्ता

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मिळणार…

ऑगस्ट 27, 2025
539613361 1218995730272784 914712606899021038 n
स्थानिक बातम्या

मुंबई येथे नाशिकच्या उद्योजकांच्या संघटनेसोबत वीज दराबाबत महत्त्वपूर्ण बैठक….ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 27, 2025
accident 11
क्राईम डायरी

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणा-या महिलेस दुचाकीची धडक…उपचारादरम्यान मृत्यू

ऑगस्ट 27, 2025
facebook insta
क्राईम डायरी

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट स्विकारणे महिलेस पडले महागात…सव्वा सोळा लाखाला गंडा

ऑगस्ट 27, 2025
GzWXER0a4AICfsU scaled e1756290053297
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणेशाचे आगमन…बाप्पाला घातले हे साकडे (बघा, व्हिडिओ)

ऑगस्ट 27, 2025
Next Post
E0yti7wXsAQMuJK

अंतराळाची सैर करायचीय? ही आहे संधी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011