इंडिया दर्पण विशेष लेखमाला – गुरुवे नमः – क्रीडा प्रशिक्षक मकरंद ओक
रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करीत असलेल्या नाशिक क्रिकेट अकादमीची गेल्या २५ वर्षातील अभिमानास्पद कामगिरी अशी – नऊ रणजी खेळाडू ( अभिषेक राऊत, सुयश बुरकुल , सलील आघारकर, आशिष तिबरिवाल, साजिन सुरेशनाथ इ ) एक आय पी एल खेळाडू (अभिषेक राऊत)आणि एक आय सी एल (Indian Cricket League) खेळाडू ( सुयश बुरकुल ) आणि सध्या आंतर जिल्हा आणि इतर स्थानिक क्रिकेट स्पर्धेत धावांची रास ओतत असलेले साहिल पारख आणि शर्विन किसवे. यांना प्रशिक्षण देणारे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक मकरंद ओक यांनी स्थापन केलेल्या नाशिक क्रिकेट अकादमी या शास्त्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण संस्थे ची गेल्या २५ वर्षातील ही विलक्षण कामगिरी स्वतः मकरंद ओक यांचे वैयक्तिक यश आहे पण स्वतः मकरंद जात्याच प्रसिध्दीपासून दूर राहणारा असल्याने तो हे सांघिक यश मानतो.
त्याच्याबरोबर सुरुवातीला असलेले शंतनू मत्छे , मनोज पंड्या, अविनाश आघारकर आणि सध्या असलेल्या प्रशांत कुलकर्णी, अविनाश आवारे , अमित पाटील , वैभव केंदळे, दिनकर कांबळी, रिकी बारिया इ प्रशिक्षक वर्ग अथक मेहनतीने आणि कष्टाने सकाळ- संध्याकाळ सातत्याने उत्तमदर्जाचे आणि क्रिकेटयोग्य शारीरिक , तंत्रिक आणि मानसिक मार्गदर्शन करीत आहे त्याचे हे फळ.
मुख्य म्हणजे sports psychology ही अत्यंत दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाची असलेली शाखा आहें. शतकाच्या जवळ आल्यावर किंवा मह्त्वाची जबाबदारी पडल्यावर फलंदाज दडपण येउन बाद होतो तसेच धुलाई झाली की गोलंदाज दडपण घेतो . या समस्यांवर खेळाडूला मनाने कणखर करण्याचे ट्रेनींग देखील येथे दिले जाते . सुप्रसिद्ध क्रीडामानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांची शिष्या मधुली कुलकर्णी हीने अनेक वर्षे खेळाडू येथे मानसिकरित्या घडवले.
मकरंद ओक आणि त्यांचे सहकारी हे अनेक अडचणीना तोंड देत आपले काम चोख बजावित आहे. त्यांना २५ वर्षांत दोनदा आपले केंद्र हलवावे लागले तसेच दहा – बारा वर्षे सर्व स्थानिक आणि इतर सामन्याना मुकावे लागले पण सर्व प्रशिक्षक हाडाचे क्रिकेटपटू असल्याने त्यांचे ब्रीदवाक्य होते – Stay at the wicket, runs will come , do not throw your wicket when the things are going against you – ! हे ब्रीद ते जगले !
त्यांचे भोसला मिलिटरी स्कूल येथे असलेले प्रशिक्षण केंद्र सर्व आधुनिक सुविधांनी युक्त आहे . एकूण नऊ टर्फ विकेट आहेत, दीड टनी रोलर आहे , पाण्याची उत्तम सोय आहे , दोन संघाना बसता येइल तसेच स्कोअरर आणि इतरांना बसता येइल इतके प्रशस्त pavilion आहे आणि स्वच्छ प्रसाधनगृह देखील आहे . मैदानाच्या देखभाली साठी प्रशिक्षित असे groundsman आहेत. कोचिंग साठी येणारे खेळाडू या सुविधांमुळे फक्त खेळावर लक्ष केंद्रित करु शकतात त्यामुळे साहाजिकच त्यांची कामगिरी नियमित उत्कृष्ट होते यात नवल ते काय?
मकरंदच्या अकादमीचे सर्व वयोगटातील सर्व संघ हे विजेते किंवा उपविजेते होतातच आणि अलीकड त्यांचे जास्तीतजास्त खेळाडू जिल्हा आणि महाराष्ट्र संघाकडून खेळत आहेत कारण येथील प्रशिक्षक त्याना नियमितपणे सामने खेळण्याचा सराव करायला देतात. असे म्हणतात Match practice is the best practice हे खेळामधील तत्व येथे शब्दशः अमलात आणले जाते!
क्रिकेटप्रशिक्षण हे आपले ध्येय मानणारा मकरंद आता एक नवे स्वप्न पाहात आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे भारताकडून खेळणारा एक तरी खेळाडू निर्माण करण्याचे , ते स्वप्न सत्यात येते का हे येणारा काळच ठरवेल !