इंडिया दर्पण विशेष लेखमाला – गुरुवे नमः
जिम्नॅस्ट प्रशिक्षक प्रबोधन डोणगावकर
२०२८ च्या olympic साठी एक तरी जिम्नॅस्ट तयार करण्याचे स्वप्न बाळगून असलेले जिम्नॅस्ट प्रशिक्षक प्रबोधन डोणगावकर यांच्याविषयी आणि त्यांनी घडविलेल्या शिष्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Olympics आणि आशियन खेळामधील सर्वात आकर्षक आणि प्रेक्षणीय खेळ जे मानले जातात त्यात जिम्नॅस्टिक्स चा अव्वल क्रमांक आहे आणि रंगीत प्रक्षेपण सुरु झाल्यानंतर तर जिम्नॅस्टिक्स आणि ते करणारे देखण्या तरुण- तरुणी आपल्या रबरासारख्या शरीराची ज्या लवचिक पध्दतीने हालचाली करतात ते पाहाणे म्हणजे एक अदभुत असा अनुभव आहे.
१९७२ च्या म्युनिक Olympic मधील रशियाची ओल्गा कोर्बुट ( ४ सुवर्णपदक आणि ३ रौप्यपदके )आणि १९७६ च्या Montreal येथील Olympic मधील रुमानियाची नादिया कोमानिस( सात सुवर्णपदके ) यांनी जिम्नॅस्टिक्सला फार मोठी प्रसिद्धी आणि प्रेक्षकसंख्या मिळवून दिली यात वाद नाही .
जिम्नॅस्टिक्स नाशिकमध्ये जिवंत ठेवला तो विविध व्यायामशाळा व तेथील हौशी पण dedicated व्यायाम शिक्षक यांनी आणि काही वर्षांपासून कै अरुण ओढेकर, मोहन उपासनी, कवीश्वर, संदीप शिंदे इ जिम्नॅस्टिक्स प्रेमीनी.
जिम्नॅस्टिक्समध्ये एकुण सहा प्रकारची कौशल्ये आहेत पण त्यातील बरेच प्रकार ( सिंगलबार , डबलबार , pommel Horse, रोमन रिंग्स, uneven bar , balance beam, vault तसेच Floor Exercise इ )लहानपणी आपण व्यायामशाळेत हाताळलेले आहेत आणि शिकलोही आहोत पण ते हौस म्हणूनच !
तथापि आताच्या व्यावसायिक जगात आणि प्रत्येक खेळात करीअर करु इच्छिणाऱ्याना आणि म्हणून व्यावसायिक पध्दतीने शिकण्याची इत्छा असलेल्या तरुण पिढीला शिकविण्यासाठी तितकेच तरबेज आणि trained प्रशिक्षक तयार होत आहेत किंवा झाले आहेत आणि त्यांनी अतिशय आधुनिक सुविधांनी युक्त असे जिम्नॅस्टिक्स केंद्र लाखो रुपये खर्च करु सुरु केले आहे आणि विशेष म्हणजे स्वतःही शास्त्रशुद्ध ट्रेनींग घेतले आहे ..
अशा केंद्रातील एक म्हणजे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रबोधन डोणगावकर याने चांदशी येथे सुरु केलेले Olympic दर्जाचे केंद्र. गेल्या काही वर्षांत येथे सुमारे ३०० खेळाडू तयार झालेले त्यापैकी अनेकानी राज्य आणि राष्ट्रीय शालेय, विद्यापीठ तसेच फेडरेशनच्या स्पर्धा आपल्या विविध कौशल्याने गाजविल्या आहेत वा गाजवीत आहेत. त्यातील ही काही नावे : कबीर मुरुगकर (२ वेळा खेलो इंडियात निवड, पाच वेळा राष्ट्रीय शालेय आणि फेडेरेशन स्पर्धेत भाग आणि सुवर्ण आणि रौप्य पदक विजेता), प्रियांका भावसार( खेलो इंडिया,राष्ट्रीय शालेय आणि विध्यापीठ तसेच राज्य स्पर्धेत एकूण १५ पदके ), कल्याणी सातपुते ( ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स मध्ये भारतीय विद्यापीठ स्पर्धेत कांस्य), सात्विक साखला ( राष्ट्रीय शालेय आणि फेडरेशन स्पर्धेत आठ पदके ),श्रेयस भावसार ( राष्ट्रीय शालेय तीन पदके), अमित कांबळे ( चार वेळी राज्य स्पर्धेत सहभागी आणि तीन पदके ) आणि कौस्तुभ अहिरे ( तीन वेळा राज्य स्पर्धेत २ पदके).
या शिवाय एकूण १०० च्या वर खेळाडूना प्रशिक्षण चालू आहे तसेच अनेक राज्य आणि राष्ट्रीय कोचिंग Camp हे केंद्र सर्व सुविधायुक्त असल्याने नियमित होतात. स्वतः प्रबोधन हा तीन वेळचा माजी राष्ट्रीय खेळाडू असल्याने तसेच तो नियमितपणे राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू तयार करीत आहे आणि प्रशिक्षित कोच असल्याने त्याची तीन वेळा महाराष्ट्र संघाचा कोच म्हणून नेमणूक झाली आहे.
जिम्नॅस्टिक्समधील सर्व आधुनिक प्रकार शिकविण्यात तो कुशल आहे म्हणूनच आता २०२८ च्या Olympics साठी एक तरी खेळाडू जिम्नॅस्टिक्स मध्ये नाशिकमधून निवडला जावा या साठी प्रबोधन आणि त्याचे सहाय्यक जोरदार मेहनत घेत आहेत. त्यांना कितपत यश मिळते पाहू या ..