इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून
टेनिसपटू कार्लोस अल्काराझ
गेल्या दोन महिन्यापासून स्पेन चा १९ वर्षीय टेनिसपटू जागतिक टेनिसमध्ये निव्वळ धुमाकूळ घालत आहे . खर तर त्याने अजून महत्त्वाची अशी एकही स्पर्धा जिंकली नाही . पण त्याचे हरणे हे प्रतिस्पर्ध्याच्या जिंकण्यापेक्षा अधिक चर्चेचा विषय होत आहे , किंबहुना त्याचे हरणे चटका लावून जाते आणि टेनिसशौकीन (मैदानावर उपस्थित असलेले आणि टीव्हीवरील) आता या खेळाडूचा खेळ पाहायला मिळणार नाही म्हणून हळहळतात! १९८५ साली विंबल्डन मध्ये अशाच एका सनसनाटी खेळाडूने प्रेक्षकांना वेड लावले होते त्याचे नाव होते बोरिस बेकर त्यानंतर तब्बल ४० वर्षांनंतर स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याने प्रेक्षकांना अलीकडे वेडावून सोडले आहे …
गेल्या दोन महिन्यात झालेल्या रोम, माद्रिद आणि फ्रेंच ओपन स्पर्धेत अल्काराझ ज्या कोर्टवर तेथे प्रचंड गर्दी जमत असे त्यामुळे त्याचा प्रत्येक सामना सर्वसाधारण कोर्टवर न खेळविता Elite कोर्टवर खेळवला गेला आणि अल्काराझनेही प्रेक्षणीय खेळ करून प्रेक्षकांना अक्षरशः पागल करून टाकले ते इतके की त्याच्या कडून हरलेले प्रतिस्पर्धीही अल्काराझचे तोंड भरून करून गेले!
आणि त्याच्याविरूध्द जिंकलेले खेळाडू तर “हा तर उध्याचा सुपरस्टार” असे म्हणून गेले! माद्रिद ओपनला त्याने नादाल आणि जोकोविच या दोघांनाही हरविले तेंव्हाच जोकोविच म्हणाला की ” He is going to win many championships in coming days “. फ्रेंच ओपन स्पर्धेत या धडाके बाज खेळाडूने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आणि झ्वेरेव्ह कडून पराभूत होण्याचपूर्वी झ्वेरेव्हच्या तोंडाला फेस आणला… पण मोठ्या मनाच्या आणि खिलाडूवृत्तीच्या झ्वेरेव्हने अल्काराझवर स्तुतिसुमने उधळताना म्हंटले की ” मला फ्रेंच ओपन जिंकण्याची घाई झाली आहे कारण इथून पुढे सर्व स्पर्धाचा विजेता हाच स्पर्धक आहे , मला पुढील अनेक स्पर्धा हा जिंकू देणर नाही “.!
अल्काराझ च्या नेत्रदीपक आणि अचूक drop shots आणि तुफानी two-handed forehands ने भल्याभल्याना चकीत करून टाकले आहे इतके ते बघण्यासारखे असतात! २००५ पासून फेडरर, नादाल आणि जोकोविच याचे इतके वर्चस्व आहे की Roddick, Wavrinka, Tsonga, Monfills, Bagdatis आणि काही अंशी मरे हे हतबल झाले आणि काहिनी निवृत्ती पत्करली. तसेच अलीकडील जनरेशनच्या झ्वेरेव्ह, थीम, मेद्वेदेव, त्सित्सिपास , रुब्लेव यानाही फेडरर- नादाल – जोकोविच या त्रिकुटाला कसे हरवावे ह्याची गुरूकिल्ली अध्याप सापडलेली नाही …
पण कार्लोस अल्काराझच्या रुपाने मात्र एक नवा , सनसनाटी अशा ताऱ्याचा उदय टेनिसच्या क्षितिजावर झाला आहे हे निश्चित…
पाहू या हा धूमकेतू ठरतो की धृवतारा!