इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून
भारताची बुद्धीबळातील कमाई
आजच चेन्नई येथे संपलेल्या ४४व्या चेस ऑलिंपियाडला प्रेक्षकांचा आणि मुख्य म्हणजे भाग घेणाऱ्या पुरुष (१८६)आणि महिला (१६२)संघाचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आणि ११ पैकी ९व्या फेरीपर्यंत पुरुषांचा भारत ब आणि १० व्या फेरीपर्यंत महिला अ संघ हे सुवर्णपदकाचे जबरदस्त दावेदार होते त्यामुळे भारत पुरुष आणि महिला असे दोन्ही विजेतेपदं खिशात घालणार असे वाटले होते .
सहाजिकच यजमान भारतात स्पर्धा आणि भारतच विजेता असे ज्याला icing on the cake म्हणतात असे घडेल असे वाटले होते पण घडले उलटच!
भारताचे दोन्ही संघ मह्त्वपूर्ण सामन्यात पराभूत झाले आणि सुवर्णपदक मिळणाऱ्या संघांना अखेर ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागावे लागले !अर्थात इतर तुल्यबळ संघाचा खेळ लक्षात घेता ब्रॉंझ पदक हे देखील फार मोठे यश आहे हे मान्य केले पाहिजे. झाले असे की १० व्या फेरीपर्यंत आघाडी घेतलेल्या आणि प्रथम मानांकित भारतीय महिला अ संघाला अंतिम फेरीत अमेरिकन महिला संघाने ३-१ असे चकीत केले . मुख्य म्हणजे ७- ते १० फेऱ्यांतून उत्तम खेळून भारताला विजय मिळवून देणाऱ्या तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी दोघी दोघी या मह्त्वाच्या सामन्यांमध्ये हरल्या तर कर्णधार कोनुरु हंपी आणि पद्मिनी यांच्या लढती अनिर्णित राहिल्या .
परिणामत: भारताच्या मागोमाग असलेले उक्रेन आणि जॉर्जिया हे अंतिम फेरीअखेर अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर म्हणजे सुवर्णपदक आणि रजतपदक विजेते झाले आणि भारताचे हातातोंडाशी आलेले विश्वविजेते पद गेले. प्रद्न्यानंदनन , गुकेश , सधवानी आणि सरीन हे तरुण आणि बी अधिबान हा वरिष्ठ खेळाडू संघात असलेला भारत ब संघ असाच दुर्दैवी ठरला . गुकेश च्या तुफानी खेळाने नवव्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेला भारतीय १० व्या फेरीत उझबेकिस्तान विरूध्दची लढत २-२ अशी बरोबरीने सुटली. ती खरं तर भारत जिंकतच होता पण एन अब्दुसत्तारोव विरूध्द खेळताना time trouble मुळे शेवटची ९० वी चुकून गुकेश कडून Illegal चाल खेळली गेली आणि त्याच्या लगेच लक्षात आल्यावर त्याने पराभव मान्य केला.
हा सामना अनिर्णित राहिला असता तर भारत २:५ -१:५ असे जिंकला असता आणि विश्वविजेता झाला असता. कारण अखेरच्या लढतीत भारताने जर्मनीला ३-१ असे पराभूत केले त्यामुळे भारताच्या क्रमवारीत भारताच्या पाठोपाठ असलेला आणि तरुण खेळाडूचा भरणा असलेला १२ वा सीडेड उझबेकिस्तान आणि १४ वा सीडेड आर्मेनिया हे संघ अनुक्रमे सुवर्णपदक आणि रौप्यपदक घेउन गेले तर दुर्दैवाने भारताला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. नाशिकचा विदित गुजराथी सह हरीकृष्ण, अर्जुन एरिगिअसी आणि शशीकरण ज्या भारत १ संघाकडून खेळले तो संघ चौथ्या क्रमंकावर आला.
अर्थात बुद्धिबळ खेळामधील सुपर पॉवर रशिया बहिष्कारा मुळे आणि द्वितीय मानांकित चीन कोरोनाच्या भीतीने तसेच बेलारूस हे तुल्यबळ संघ असते तर हे निकाल निश्चितच वेगळे लागले असते असे म्हणायला वाव आहे. भारताच्या दृष्टीने बघता पुढील काही वर्षे भारत ही बुद्धिबळ खेळामधील महासत्ता म्हणून उदयास आली आहे हे निश्चित.
Column From Play Ground Chess Olympiad by Deepak Odhekar