इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून
बुद्धिबळ ऑलिंपियाड रंगतदार अवस्थेत
चेन्नई येथील महाबलिपुरम येथे २८ जुलैपासून सुरु झालेल्या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेतील ११ फेर्या पैकी सहा फेर्या म्हणजे अर्धी स्पर्धा संपली आहे. ४ ऑगस्टला रेस्ट डे होता. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या स्पर्धेचा थोडक्यात आढावा घेणे आवश्यक आहे!

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
भारताचे महिला आणि पुरुष अ आणि ब हे दोन्ही संघ विश्व विजेते होण्याच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. कोनेरु हंपी कर्णधार असलेल्या भारतीय महिला संघातील हंपी सह पद्मिनी , हरिका द्रोणावल्ली , भक्ति कुलकर्णी आणि विशेषत: तानिया सचदेव या इतक्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत की भारताने सर्व सहाही लढती जिंकून १२ /१२ गुणांसह १६२ देशात प्रथम स्थान पटकाविले आहे ( एका लढतीला २ गुण ). पहिले सीडिंग असलेल्या भारतीय महिलंची ही आगेकूच अशीच चालू राहणार आणि भारतच ऑलिंपियाड विजेता होणार असे बुद्धिबळ जाणकार म्हणत आहेत .
भारताचे इतर दोन महिला संघ मात्र ९/१२ गुण मिळवून १४ व्या आणि १५ व्या स्थानी आहेत त्यामूळे त्यांचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. भारतीय पुरुषांचे अ संघ ( पी हरिकृष्ण , विदित गुजराथी , अर्जुन एरिगियसी , पी शशीकिरण ) आणि ब संघ ( प्रद्न्यानंदनन , जी गुकेश , निहाल सरीन , रौनक सधवाणी ) हे विजेतेपदाचे दावेदार असले आणि अप्रतिम खेळ करीत असले तरीही दुसरे सिडिंग असलेला भारत अ संघ आणि ब आणि क हेही दोन संघ १०/१२ गुणांसह तिसर्या स्थानी आहेत .
प्रथम क्रमांकावर १२/१२ गुण म्हणजे सर्व सामने जिंकून अर्मेनिया ने आश्चर्य कारक रीत्या उडी मारली आहे तर प्रथम सीडेड अमेरिका ११/१२ गुण मिळवून दुसर्या स्थानी आहे. आता महत्वाची लढत भारत अ आणि ब यांच्या त होईल तसेच भारत आणि अमेरिका या लढतीं वर जगभरातील चेस प्रेमी नजर लावून बसले आहेत. कारण अर्मेनिया.भारत आणि अमेरिका हेच १८६ भाग घेणार्या देशांमध्ये ( रशियावर बहिष्कार आणि चीनची माघार यामूळे ) पुरुश विश्व विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहेत.
त्यातही जी गुकेश या १८ वर्षीय अति गुणवान खेळाडूने आपल्या गतिमान आंणि कौशल्यपूर्ण खेळाने जगाला वेड लावले आहे ते इतके की त्याच्या मुळे भारत अ नव्हे तर भारत ब विश्व विजेता होण्याची शक्यता फार आहे असे मानले जाते. त्याचे रेटिंगही सुपर Grand Masterम्हणजे २७०० च्या पुढे (२७१५ वर ) गेले आहे. (भारतात फक्त सहा जण २७०० च्या पुढे होते/ आहेत) अशा रितीने स्पर्धेचा उत्तरार्ध अधिक रोचक, रोमहर्षक आणि अधिक नाट्यपूर्ण होणार यात शंका नाही.
Column From Play Ground Chess Olympiad by Deepak Odhekar