रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – ज्ञानेश सोनार यांची कथामाला – दिवाळी अंकांतील खिडक्या -एक चित्रभ्रम!

जून 27, 2022 | 9:55 pm
in इतर
0
IMG 20220626 WA0003

इंडिया दर्पण विशेष – ज्ञानेश सोनार यांची कथामाला
दिवाळी अंकांतील खिडक्या -एक चित्रभ्रम!

जादुई खिडक्या ही दिवाळी अंकांना मिळालेली चावटपणाकडे झुकणाऱ्या व्यंगचित्रांची अद्भुत देणगी. ६० च्या दशकात ‘आवाज’ चे संपादक श्री. मधुकर पाटकर हे एकमेव या श्रेयाचे मानकरी. मुळात हा चित्रभ्रम अमेरिकेतल्या मॅड’ मासिकातून आलेला. ती चित्र चाचपणारी, रंगीत नसायची.मात्र आवाजने ‘तयाचा वेलू गेला गगनावरी’ इतकी छान मेन्टेन केली. या खिडक्यांच्या वैशिष्टय़ांमुळे आवाज कायम नंबर वन् राहिला. यासाठी दोन पाने लागतात. वरच्या पानावर एखादी खिडकी वा key hole चा तुकडा कापलेला असतो. त्या खिडकीतून पान दोनवरचा काही विशिष्ट (ब-याचदा स्त्री अवयवाचा) भाग दिसतो. मात्र पान उलटले की, तेथे वेगळेच चित्र असते. भ्रमनिरास होतोच पण हसूही येते. साठ ते ऐंशी सालापर्यंत टीव्ही प्रगत नव्हता. परिणामी दिवाळी अंकांना प्रचंड मागणी असे. अनेक ऑफिसेसमधून दिवाळी अंकांच्या लायब्ररीज चालत.

Dnyanesh sonar
ज्ञानेश सोनार
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि लेखक
मो. 9860050016

अंकात नामवंत लेखकांच्या कथा असायच्या. जयवंत दळवी, पु.ल. देशपांडे व. पु. काळे, मंगला गोडबोले, दुर्गा भागवत, विद्या बाळ, ‘आनंदी गोपाळ’ कार श्री. ज. जोशी, रणजित देसाई, सुभाष भेंडे, वसंत कानेटकर, अ. वा. वर्टी, ना.सी. फडके, पु.भा.भावे, व्यंकटेश व ग.दि .माडगुळकर यांच्या कादंबऱ्या, कुसुमाग्रज, बा भ बोरकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर,वसंत बापट सारख्यांच्या कविता. त्यात दिवाळी अंकासारखे तगडे माध्यम, लिहिणारे सारे तरूण प्रतिभाशाली लेखक ,कवी.साहित्याचा तो सुवर्णकाळ या अंकांनी दाखविला. त्यात आवाज दीपावली, मौज, वाङ्मयशोभा,ललित, सुगंध,किर्लोस्करांची स्त्री, किर्लोस्कर, मनोहर.तर अनंत अंतरकर यांची हंस, मोहिनी,नवल मासिक तसेच पुरुषोत्तम बेहेरेंच्या ‘मेनका प्रकाशनची’ जत्रा मेनका माहेर बेस्ट सेल असलेली मासिकं. यात महिलांचे, हेरकथांचे, आरोग्यविषयक मासिक हीच मंडळी दिवाळीत त्यांचा दिवाळी विशेषांक काढत. यात व्यंगचित्रांनाच वाहिलेला बाळासाहेबांचा मार्मिक दणक्यात निघे. व्यंगचित्रांचा आता दिसतो तो महावृक्ष मार्मिकनेच जोपासला आहे.

पोट्रेट, लॅण्डस्केप्स, स्केचिंग, फिगरेटिव्ह पेंटिंग्ज पेक्षा हे विश्व वेगळे होते.विनोदी चेहरे व विषय, मोजक्याच शब्दांमध्ये मांडण्याचे हे तंत्र आमच्या पिढीलाच नवीन होते.या शिवाय बरेच पावसाळी छत्र्यांसारखे उगवणारे दिवाळी अंक निघायचे .सगळेच छान धंदा करीत विशेष म्हणजे त्या काळी कथाचित्रे ( Illustrations) करणाऱ्या चित्रकारांची मोठी फळी होती. श्री दीनानाथ दलाल (दीपावली) रघुवीर मुळगावकर (रत्नदीप ) जे त्यांचे स्वत: चे दिवाळी अंक होते. किर्लोस्करचे ग.न। जाधव, बसवंत ,पुण्याचे सहस्त्रबुद्धे, प्रभा काटे,ज्ञानेश सोनार, सत्येन टण्णू , चंद्रशेखर पत्की प्रभाशंकर कवडी ,दत्तात्रय पाडेकर,सुभाष अवचट या मंडळींची फिगेरेटिव्ह पासून अबस्ट्रॅक्ट पर्यंत वेगवेगळी कथाचित्रे म्हणजे मेजवानी असे . वाचनाची अभिरुची घरातल्या सर्व मंडळींना,तरूण तरूणींना खूपच होती. मनोरंजनाची इतर साधने जवळपास नव्हतीच.

आवाज व जत्रांमध्ये या जादु-ई खिडक्या पाहणारा मोठा वर्ग होता. आताचा बोकाळलेला निर्लज्जपणा नसल्याने चारचौघात या खिडक्या संकोचाने पाहिल्या जात नसत.माझ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते की,ज्ञानेश सोनारांना दिवाळी अंकातले खिडक्या वाले म्हणून मीच काय सगळेच ओळखतात .आम्ही मंत्री तंत्री झालो तरी त्यांच्या खिडक्याचे अंक रात्री गुपचूप पाहायचो.

सुरुवातीची काही वर्षे ‘आवाजा’ च्या खिडक्या श्री.दीनानाथ दलाल करीत . बाळासाहेबांनी एखाद दुसरी. केल्याचे स्मरते.श्री . दीनानाथ दलालांचं १९७० साली अचानक निधन झाल्याने चंद्रशेखर पत्की, प्रभाशंकर कवडी करू लागले . दलाल व पत्कींच्या चित्रातल्या तरुणी अत्यंत मादक असत.आवाज साठी मीसुद्धा सुरुवातीस बऱ्याच खिडक्या केल्या. अंकात ४ च खिडक्या व चितारणारे दोघे पाटकरांची कुचंबणा झाली . त्यात रंगीत छपाई खूप महाग असे. ऑफसेट प्रेस फारच कमी होते .आवाज तर नागपूरच्या शिवराज प्रेसमध्ये अनेक वर्ष छापला जाई.

सत्तरच्या दशकात माझ्या व्यंग चित्रमालांना खूप मागणी असायची.आवाज मधल्या चित्रमाला तर दरवर्षी खूपच गाजायच्या .पोलिस प्रदर्शन, राम तेरी त्तो गंगा मैली,देहाची तिजोरी , तुझे गीत गाण्यासाठी , सेक्सी अल्फाबेटस्,ढगाला लागली कळ , इमर्जन्सीच्या काळातले इंदिराजीवरचे इंदूजाल. थोडक्यात त्या हंगामात जो विषय गाजत असेल त्यावर ही मल्लिनाथी असे.राज कपूरचा ‘राम तेरी गंगा मैली ‘उत्तान तेने परिपूर्ण होता.तो प्रचंड धंदा करीत होता . मी त्यावर आठ पेजेस चा राम तेरी ‘त्तो’ गंगा मैली ची विडंबनात्मक चित्तरकथा पात्रा.सह रेखाटलि तीसुद्धा सुपरडुपर गाजत राहिली इतकी की मोठा मनोरंजक किस्सा आहे .त्या काळातच पुण्याला माझे जाणे झाले .अलका टाकतील जवळून मित्रांबरोबर चाललो होतो.रस्त्याच्या पलीकडे दिवाळी अंक चा स्टॉल होता .आवाज मी तोवर पाहिलेला नव्हता.मी विचारले , ‘आवाज आहे का?’

आवाजचा शॉर्टेज आहे चाऴायला मिळणार नाही. विकत हवा असेल तर सांगा!पुणेकर ताडकन कडाडला. अहो, ह्यांना ओळखलं का? मित्राने जरा चिडूनच विचारले. ” कसा ओळखणार .त्यांच्या गळ्यात नावाचा बोर्ड कुठेय”.त्याने त्रिफळा उडवला .मित्राने माझे नाव सांगितले .तो अवाक् होऊन चटकन उभा राहिला. हात जोडून म्हणाला ‘सोनार साहेब माफ करा.इथं विकत घेण्यापेक्षा अंक चाऴणारे जास्त . कडक बोलावेच लागते . त्याने अंक दिला आतले स्टूल बसायला पुढे केले .सर चहा मागवू ..नाही मागवतोच . पुणेकर असलो म्हणून काय झाले. मी व माझा मित्र त्याचे सौजन्य पाहून अचंबित झालो. का हो काही विशेष? मीच न रहावून विचारले. सोनार साहेब, तुम्हाला कल्पना दिसत नाही…आवाज मधल्या राम तेरी गंगा मैली ने कहर केलाय.सिनेमा पाहिलेले लोक ही चित्रमाला पाहण्यासाठी अंक विकत घ्यायला येतात .आणि चित्रमाला पाहिलेले सिनेमा पाहायला जातात .आता पावेते दीडशे अंक विकून झालेत. रिपीट ऑर्डर देऊनही अंक मिळत नाहीत.

चौऱ्याऐंशी च्या दशकात जत्रा मासिकाचे साप्ताहिक झाले .दर आठवडी माझे वा पत्कींचे मुखपृष्ठ असे .रामदास फुटाणे यांची वात्रटिका जत्रातच एस्टॅब्लिश झाली.हा हा म्हणता महाराष्ट्रभर जत्रा पन्नास हजारांवर खपू लागला.बहेरे म्हणाले, ‘सोनार आपल्याला दिवाळी अंकासाठी खिडक्या हव्यात.मी भाऊसाहेब पाटकर यांना सांगितले खिडकी त्यांची मोना पॉली होती . . पुढे मीच म्हणालो, वर्षभर ते मला भरपूर पैसे देतात .शिवाय तुमच्या अंकात संधी नाही . मोठ्या मनाने ते म्हणाले “अवश्य करा !”

नंतर माझा खिडक्यांचा वारू बेफाम सुटला .नंतर पुण्यातून आणखी एक राजा शिंदे यांचा “आवाज ” सुरू झाला . नंतर सोलापूर औरंगाबाद नागपूर येथूनही खिडक्यांचे अंक निघू लागले.आणि या खिडक्या मी एकटा करी .प्रत्येकाचे आशय, विषय वेगळे खिडक्यांसाठी उत्तम रेखाटन देखण्या ललना , कल्पकता, व बेमालूम मांडणी यामुळे आलेले खुदकन हसू आवश्यक असे . मात्र बेहेरेंनी मात्र कधी इश्शू केला नाही .ते म्हणत प्रत्येक अंकांचा वाचक वेगळा .अंकाची ताकद वेगळी.लेखक नाहीतरी दहा ठिकाणी लिहितातच ना? स्त्रियांच्या अंगोपांगांच्या जवळपास जाणाऱ्या खिडक्यांचे विषय कधीतरी संपणे क्रमप्राप्त होते.

दिवाळीच्या आसपासचा गाजणारा सामाजिक व राजकीय विषय घेऊन खिडक्या काढू लागलो त्यात कुठेतरी मादकिका असायचीच कारण खिडकी म्हटली की बाई हवीच .थोडक्यात शुगर कोटेड प्रबोधन . त्यात जळगावचे सेक्स स्कॅण्डल, मुंबईतली स्त्रियांची छेडछाड,छुपे कॅमेरे, बॉम्बस्फोट,एम. एफ. हुसेन यांनी हिंदू देवता वर काढलेली चित्रे त्यावरची बुद्धिवंतांची उलट सुलट चर्चा ,माॅड पोरींचा तोकडा पेहराव,नटनटया, त्यांची लफडी वगैरे. खिडकीचित्र रोमँटिक असावे, अश्लील नको .त्यात सूचकता असेल तर चित्र गुदगुल्या करते .श्री बाळासाहेब ठाकरे म्हणत .माणसं नागडी उघडी काढा चित्राची गरज असेल. तर मात्र स्त्रिया कधीही विवस्त्र काढू नका.विशेषत राजकीय कॅरिकेचर्स करताना.वृत्तीवर व्यंग करा शारीरिक व्यंगावर नाही. तेथे व्यंगचित्रकारांची संस्कृती प्रतीत होत असते.

यावर एक छान खिडकी चित्रं मला सुचले. हुसेन यांचे वरचा टीकेचा तो काळ. सरस्वती अनावृत्त रेखाटल्यामुळे उद्रेक उसळला होता .मी चित्र रेखाटलं .तत्पूर्वी एम. एफ.हुसेन यांची काही पेंटिंग्ज गुगलवर पाहिली.त्यात मॅरिलिन मनरोचे एक न्यूड त्यांनी काढलेले होते..यावर खिडकी रेखाटताना पहिल्या पानावर हुसेन मन्रोचे चित्र काढत आहेत .कमरेपर्यंत विवस्त्र असे..पुढे काय असेल म्हणून वाचक पुढचे पान उघडतो .पुढच्या चित्रात ती पूर्ण विवस्त्र दाखवली ( त्यांच्या पेटिंगप्रमाणे ).इतक्यात चित्र पहाणारं तीन चार वर्षांचं मूल त्याची स्वत:ची निकर काढून हुसेन यांच्या हातात देत आहे.

चित्रातल्या बाईला घालण्यासाठी.यातला संस्काराचा भाग , लहान मुलांनी अशी अशी स्त्री पहिलेलीच नसते. कलाकारांनी अवश्य स्वातंत्र्य घ्यावं .पण भाष्य, मांडणी कल्पकतेने करावी ही अपेक्षा असते.जळगाव स्कॅंडल झालं .(श्रीमंतांची, मंत्र्यांची, ऑफिसरची तरुण मुले मुलींना ब्लॅकमेल करून उच्चपदस्थांना तोहफा म्हणून भेट देऊ लागले .) तिथल्या मुलींवर इतकी वेळ आली की, त्यांची लग्नच होईनात. तमाम मुलींकडे लोक संशयाने पाहू लागले. खिडकी अशी होती मन सुन्न करणारी .एका मंत्र्याला चार दोन पोरांनी सुंदर मुलगी भेट आणली आहे .तिच्या चेहऱ्यावर ओढणी आहे.

मंत्री हातात गजरे माळून जिभल्या चाटतोय.’ तू चीज बडी है मस्त मस्त’.. गाणे गुणगुणतोय.काही गंमत दिसेल म्हणून वाचक पुढचं पान उघडतो . मुलीने चेहऱ्यावरचा घुंगट दूर केला आहे .डोळ्यात पाणी आहे .ती मंत्र्याला म्हणतेय ,” पप्पा मला वाचवा !”मंत्री हतबुद्ध. मुलींच्या या बाजारात कधी तुमची मुलगी असेल, वहिनी असेल, बहीण असेल तीच भेट म्हणून गुंडांनी आणली असेल तर.

*** चोली के पिछे क्या है या गाण्याचे दिवस. कुठेही घरीदारी गाणं लागलं की बायकांच्या माना संकोचाने खाली जातं. मुंबईसारख्या शहरात कधी मुलगी दिसली की छेडछाड होई आताही अशा घटना ऐकू येतातच .त्यावर् एक खिडकी. दोन तीन गुंड तरूण निर्जन रस्त्यावर मुलीस सुरा दाखवून म्हणतायत ” चोली के पिछे क्या है दिखाव … ” चित्रातील पाठमोरी तरूणी वरचं वस्त्र उघढून त्यांना दाखवतेय.कुतूहलाने आपण पुढचं पान उघडतो .मुलगी समोरुन दिसते. तिने वरचे विंडचिटर सताड उघडले आहे. तिच्या एका खिशात पिस्तोल तर एका खिशावर *एसीपीक्राईम* ची पट्टी लिहिलेली . ते पाहून गुंड पोरांची उडालेली भंबेरी.पुछो नही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जोरदार पावसामुळे कातरवाडीच्या कात्रा किल्ल्यावरून धबधबा सुरू ( बघा व्हिडीओ )

Next Post

या व्यक्तींना आज मिळेल व्यावसायिक शुभवार्ता; जाणून घ्या मंगळवार (२८ जून)चे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज मिळेल व्यावसायिक शुभवार्ता; जाणून घ्या मंगळवार (२८ जून)चे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011