सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – भटकूया आनंदे – किल्ले लळिंग

ऑगस्ट 14, 2021 | 4:34 pm
in इतर
0
P1210302

खान्देशचे प्रवेशद्वार – किल्ले लळिंग

गिर्यारोहण-गिरिभ्रमणासाठी बाहेर निघालं म्हणजे त्र्यंबकरांग, कळसूबाईचा पट्टा, भंडारदरा परिसर, सातमाळा पर्वतराजी आणि फारफार तर बागलाणमधील साल्हेरमुल्हेरची रांग एवढ्या भागात नाशिककर गिर्यारोहकांचा वावर दिसतो. नाशिककरांसाठी विरूध्द वाटेवरचा आहे पण तरीही टुमदार अशा लळिंग किल्ल्यावर एकदा तरी भटकून यावं…

कुलथे e1610123297171
सुदर्शन कुलथे
गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक

खान्देशात कसला आला डोंगर आणि किल्ला? तिथल्या सपाटीवर काहीही नाही असा अनेकांचा समज असतो. पण इकडे धुळ्याची पाठराखण करणारा लळिंग हा खानदानी आणि संपन्न किल्ला उभा आहे. एकदा खास नियोजन करुन लळिंगसाठी घर सोडायचं. नाशिकहून धुळ्याला यायचं. धुळ्यासाठी भरपूर एस.टी बसेस आहेत. स्वत:चं वाहन घेऊन जायचं असेल तर धुळे हायवेला लागायचं. धुळ्याच्या अलिकडे साधारण दहा बारा किलोमिटर अंतरावर लळिंगचा घाट लागतो. घाटरस्ता लळिंग किल्ल्याला चिटकूनच जातो. हा घाट संपत आला की लळिंग गांव येतं. गावात गाडी लावायची. गावातून वर बघितलं की लळिंग किल्ला आणि त्याच्या माथ्यावरची कमानीयूक्त तटबंदी आपल्याला आकर्षून घेते.

लळिंग गावातल्या पाण्याच्या टाकी शेजारी एक पुरातन हेमाडपंती शिवमंदिर दिसतं. ह्या मंदिराची बरीच पडझड झालेली असून गावकर्‍यांनी मंदिराला लाल-हिरवा तैलरंगही पाजला आहे. त्यामुळे त्याचं प्राचिनत्वही संपलय. मंदिराशेजारची पायवाट पकडायची आणि किल्ल्याकडे निघायचं. लळिंग लांबून जरी छोटा दिसत असला तरी थोडं पुढेपुढे जातांना त्याची उंची वाढतच चालल्या सारखी वाटते. लळिंग बर्‍यापैकी उंच आहे असं जाणवतंच कारण चांगला दमही लागतो. पण ट्रेकला गेलो आणि घाम निघाला नाही तर बरं वाटत नाही. चढणीच्या मार्गावर मोठी झाडं फारशी नाहीत.

काटेरी झुडूपं आणि निवडूंगाचे प्रमाण जास्त आहे. निवडूंग-साबराच्या विविध जाती आढळतात. चढणीवर बर्‍याच ठिकाणी सलग असलेल्या तटबंदीचे अवशेष दिसून येतात. या पडक्या तटबंदीला एकदोन ठिकाणी प्रवेशद्वार असल्याच्याही खूणा दिसून येतात. यावरून लळिंग किल्ला पूर्वी कसा असावा याचा अंदाज बांधता येतो. हा अंदाज बांधतच वर चढत राहायचं. काही ठिकाणी पायर्‍याही केलेल्या दिसतात. वाढलेल्या गवतामूळे पायर्‍या काही ठिकाणी झाकल्या गेल्या आहेत. जणू आपल्या स्वागतासाठी त्यावर मखमली पायघड्या टाकल्या असाव्यात. अगदी रुबाबात वर जायचं.

इथं कातळात कोरलेल्या काही गुहा नजरेत पडतात. माथ्यावरच्या तटबंदीच्या खालच्या भागातल्या कातळात कोरलेली ही गुहांची रांगच आहे. गुहांच्या डावीकडे वरच्या तटबंदीतून आलेली चिरेबंदी भिंत दिसते. इथून वरच्या भिंतीच्या कमानींच्या चर्याही मस्त दिसतात. पण ह्याबाजूने पुढे न जाता गुहा बघून उजवी कडून वर जायचं. थोडं चढलं की माथ्याजवळच्या तटबंदीतलं प्रवेशद्वार लागतं. खरंतर हा दरवाजा फक्त अवशेष रुपानेच उरला आहे पण याची भव्यता लक्षात येते. गोलाकार बुरूजांचे चिरे आणि चुन्याचं बांधकाम बघण्यासारखं आहे. त्यातच एका बाजूला शरभ शिल्पही बघायला मिळतं. काही दिवसांपूर्वी प्रवेशद्वारावर असलेलं हे शरभशिल्प आता खाली ढासळून पडलंय. प्रवेशद्वाराच्या समोरच एक प्रशस्त खोली असावी कारण प्रवेश करताच समोर एका भिंतीत मोठे सुंदर कोनाडे आहेत.

P1210299

खालून आपल्याला जे बांधकाम आकर्षून घेत होतं त्याच्याजवळ आता आपण पोहोचलेलो असतो. इथली तटबंदी फारच सुंदर आहे. कमानी, त्यांच्यामधले कोनाडे, देखरेखीसाठी असलेल्या खिडकी, मारा करण्याची तिरपी छिद्रे असं सगळं बघतांना त्याकाळच्या वास्तूशिल्पीच्या कल्पकतेचा हेवा वाटतो. ह्या तटबंदीला धरतच उजवी कडून चालायचं. इथून लांबवर धुळें शहर पसरलेलं दिसतं. आजूबाजूचे पाण्याने भरलेले नकाणे, गोंदूर, डेडरगांव असे तलाव चमकतांना दिसतात.

लळिंगच्या उत्तरेच्या खालच्या टप्प्याच्या सपाटीवर एक बांधीव तलाव आणि त्याच्याजवळची षटकोनी घुमटीही दिसते. इकडून थोडावा उंचवटा चढलं की गडमाथ्यावरचं मंदिर दिसतं. हे देवीचं छोटेखानी मंदिर आहे. मंदिरासमोरच शहाबादी फरशी लावून छान ओटा बांधलेला आहे. मंदिरातल्या देविला मनःपुर्वक नमन करायचा. आणि हा किल्ला निदान आहे त्या अवस्थेत तरी शाबूत राहू दे असं मागणं मागायचं. पुढे एक कोठारासारखी वास्तू दिसते. त्या वास्तूच्या मागे व बाजूला काही पाण्याची टाकी आहेत.

काही कोरडी तर काही पाण्यानं भरलेली. वास्तूच्या समोरनं खाली उतरलं की याच्या खालच्या भागातल्या कातळात काही गुहा दिसतात. ह्या गुहा म्हणजे कोरलेल्या चोरखोल्यांसारख्या असून त्याच्या आंत जाण्यासाठीचा मार्ग अगदी छोटा खिडकीसारखा आहे. पण ह्या गुहा अगदी प्राचिन असाव्या असं जाणवतं. गुहांच्या समोरच्या बाजूला सपाट गवताळ मैदान आहे. त्याच्या पलिकडच्या तटबंदीतल्या कमानी (चर्या) फारच विहंगम दिसतात. या कमानींच्या उजव्याभागात तटबंदीतून एक भूयारी द्वार दिसतं.

त्यातल्या पायर्‍या उतरुन गेलं की आपल्या लक्षात येतं की हा चोर दरवाजा आहे. चोरदरवाजाच्या वाटेनेही आपण खाली उतरू शकतो किंवा खालच्या टप्प्यातल्या तलावघुमटी बघायला जाऊ शकतो. इथून गडमाथ्यावरचे आणि इतरही परिसराचे सुंदर फोटोग्राफ्स मिळतात. गोलकार फिरत तटबंदीवरून पुन्हा आपण सुरुवातीच्या प्रवेशद्वाराशी येतो. संपूर्ण गडफेरी करायला तसा फारसा वेळ लागत नाही.

P1210313

लळिंग बघतांना त्याचं इतिहासात चांगलंच महत्त्व असल्याचं जाणवतं. लळिंगची आपल्यावर चांगलीच छाप पडते. बर्‍यापैकी प्रशस्त असलेला हा किल्ला पश्‍चिमेकडे बागलाण व उत्तरेला सुरत-गुजरातकडून खानदेशचे संरक्षण करत असावा. फारूकी राजवटीने पश्‍चिमटोकावर लळिंग, मधल्या भागात थाळनेर व पूर्वेकडे बर्‍हाणपूरच्या आसिरगड यांच्या दरम्यान दोनशे वर्षे राज्य केले होते. मुघलकालीन कागदपत्रांतून लळिंगचे वारंवार उल्लेख आढळतात आणि संदर्भ जुळतच जातात त्यामूळे इतिहास तज्ञानांही लळिंग नेहमीच बोलवतांना दिसतो. आपल्यालाही गोडी निर्माण झाल्यास लळिंगच्या इतिहासात उडी मारायला हरकत नाही.

एखाद्या लहान मुलाला किल्ला बनवायला सांगितला तर तो मातीचा एक त्रिकोणी उंचवटा बनविणार आणि वरच्या बाजूला हाताने थापून सपाटीवर तटबंदी बनविणार, अगदी तसंच मोठं मॉडेल म्हणजे लळिंगचा किल्ला आहे. गडमाथ्यावरचं हिरवं, पोपटी, पिवळं गवत, त्यात मध्येच वार्‍यावर झूलणारे पांढर्‍या तांबड्या कोंबड गवताचे तुरे आणि विविध ॠतुतील लहानलहान रंगीबेरंगी रानफुलं असं गवताळ जंगलही आपल्याला लळिंगवर हिंडायला मिळतं. पावसाळ्यात लळिंग अधिकच बघण्यासारखा असतो.

एकतर खानदेशात हिरवा रंग पटकन सापडत नाही. त्यात किल्ला आणि हिरवागार म्हणून पावसाळ्यात ह्याचं सौंदर्य काही औरच! लळिंगच्या खालचा धबधबा, लांडोर बंगला आणि आसपासचा हिरवा परिसर हे धुळेकरांचं पावसाळ्यातलं हक्काचं ठिकाण. लांडोरबंगला परिसरात हरीण, कोल्हा, बिबट्या आणि अनेक जातींचे पक्षी असं वन्यजीवनही आढळतं. लळिंगच्या विस्तृत अशा जंगलाचा ताबा आता वनविभागाकडे आहे. खाली असलेला लांडोरबंगला आणि वनपरिसर फिरण्यासाठी आता वनविभागाची परवानगी घ्यावी लागते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाची दुसरी लाट भारतातून गेली की नाही? बघा, तज्ज्ञ काय म्हणताय

Next Post

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
ADMISSION 750x375 2

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011