सह्याद्रीतील सर्वात मोठा कातळखोदीव मार्ग असलेला कुलंग
‘अलंग-मदन-कुलंग’ ह्या दुर्गत्रिकुटाची कैफीयत काही वेगळीच आहे. कळसुबाई पर्वतरांगेतील हे त्रिकुट म्हणजे संपुर्ण महाराष्ट्रातील ‘गिर्यारोहकांची पंढरी’ असं म्हणणं वावागं ठरणार नाही. ह्या बेलाग किल्ल्यांचा परिसर अतिशय दुर्गम आणि निसर्गलेण्यांनी नटलेला आहे. महाराष्ट्राच्या सर्वोच्च कळसुबाई शिखराशी मिळती-जुळती उंची असलेले हे दुर्गत्रिशुळ आपले बुलंद आणि बेलागपण राखून उभे आहेत. कुलंग किल्ला म्हणजे प्राचीन ऐश्वर्यांची ग्वाही देणारा वैभवसंपन्न किल्ला आहे. कुलंग किल्ल्यावर असलेल्या गडावशेषांवरून आपल्याला त्याच्या प्राचीनत्वाची आणि तात्कालिन लोकसंस्कृतीची पुरेपुर प्रचिती येते.

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक