दुर्गम दुर्ग दुर्गभांडार
खरं तर डोंगर भटकण्याचं वेड कुणाला लागू नये. एकदा का माणसाला हे वेड जडलं तर त्याचं काही खरं उरत नाही. उन-पाऊस, दिवस-रात्र, असेल त्या परिस्थितीत तो मुक्तपणे भटकू लागतो. बहूतेक नाशिककर ह्या निसर्गवेडापासून सुटलेले नाहित. नाशिक जिल्ह्याला निसर्गाचा वरदहस्तच लाभला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यातही नाशिकच्या त्रिंबकेश्वर मध्ये तर निसर्गाशिवाय दुसरं काहीच नाही. बहुतेक नाशिककरांनी डोंगर भटकेपणाचा श्रीगणेशा त्र्यंबकच्या ब्रह्मगिरीपासून केलेला असेल. ज्यानी पाहिली ब्रह्मगिरी तया नाही यमपूरी असं म्हटलं जातं. याच ब्रह्मगिरीचा एक भाग असलेला दुर्गभांडार नावाचं एक थरारक अनुभव देणारं पाषाणशिल्प उभं आहे. आज आपण दुर्गम अशा दुर्गभांडारवर जाणार आहोत.

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक