बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – भटकूया आनंदे – चौल्हेर किल्ला

by Gautam Sancheti
मे 1, 2021 | 10:45 am
in इतर
0
IMG 7257 2 scaled

चौल्हेर किल्ला

संपूर्ण जगावर कोरोना महामारीचं संकट आलं आहे. लॉकडाऊन चालू आहे. महामारीमुळे घराबाहेरचे वातावरण फार बिघडलेलं आहे. त्यामुळे आपण भटकंतीसाठी जाऊ शकत नाही. परंतु आपण सध्या सह्याद्रीतल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेऊन ठेवू या. जेव्हा केव्हा या संकटातून आपण बाहेर पडू तेव्हा नक्कीच स्व‍च्छंद भटकंती करू शकतो…
कुलथे e1610123297171
सुदर्शन कुलथे
गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
नाशिकच्या उत्तरेस बागलाण भागात पूर्व-पश्‍चिम दिशेने आडव्या पसरलेल्या सेलबारी आणि डोलबारी या दुहेरी पर्वतरांगा आहेत. महाराष्ट्रात पसरलेल्या सह्याद्रीची सुरुवात साधारण या डोंगररांगेपासून होते. नाशिकची सातमाळा पर्वतरांग आणि सेलबारी-डोलबारीच्या मध्यभागी वसलंय ते बागलाण म्हणजेच सटाणा शहर. ह्या सटाण्यापासून अगदी जवळ उभा आहे तो अनोखा दुर्ग चौल्हेर. चौल्हेर किल्ल्याला स्थानिक लोक तिळवण किल्ला म्हणून ओळखतात तर चाचेर, चौरगड किंवा चौरंगगड अशी याची अन्य नावं. दक्षिणेला पुनंद-गिरणा तर उत्तरेला आरम या नद्यांची खोरी विभागणार्‍या डोंगररांगेवर ठिय्या देऊन बसला आहे तो चौल्हेर दुर्ग…
नाशिक ते सटाणा हा रस्ता सर्वपरिचित आहे. सटाणा शहरापासून तीळवणच्या पुढील वाडीचौल्हेर या पायथ्याच्या गावाचा रस्ता फक्त आठ कि.मी. आहे. ‘वाडी’ म्हणजे छोटी वसाहत. पुर्वी तीळवण हे मुख्य गाव होतं तर चौल्हेर ही वाडी होती. टुमदार घरांच्या या वाडीच्या मागे उभा असलेला चौल्हेर किल्ला मोहित करतो. समुद्रसपाटीपासून ११२८ मीटर (३७०० फूट) असलेला किल्ला गावातून फार उंच नाही. चौल्हेर किल्ल्याची पूर्व डोंगरधार गावाच्या दिशेने उतरलेली आहे. या डोंगरधारेवरून चढाईचा मार्ग वर जातो. ठळक पायवाटेने वर गेल्यावर आपण एका छोट्या खिंडीत पोहोचतो.
खिंडीतून डा़व्या बाजूला वळण घेत जाणार्‍या पायवाटेने हळूहळू चढाई करत राहायची. खालून वर येताना वनविभागाने पर्यटकांसाठी जागोजागी पॅगोडा, पायर्‍या आणि ग्रील बांधलेले आहेत. चढाईच्या टप्प्यांवर सीताफळाची झाडं भरपूर आहेत. बाकी जंगलात साग, खैर, कन्सार, निंब, सुबाभूळ, बोर, सिताफळ, आंबा यांच्यासह अनेक प्रकारची वृक्षराजी समृद्ध आहे. हेंकळ, अमोणी, साबर, गंगोत्री इत्यादी प्रकारच्या छोट्या झुडूपांची गर्दी आहे. कुसळी आणि पवन्या जातीचे गवत विस्तृत डोंगरउतारावर झुलत असते. श्रावण महिन्यात विविध रानफुलं या गवतांतून हळूवारपणे बाहेर डोकावत आपल्याला आकर्षित करतात.
चढणीच्या मार्गाने कातळकड्याच्या दिशेने थोडं पुढे गेल्यावर साधारण १० -१५ मिनिटात पहिले प्रवेशद्वार आहे. पहिल्या प्रवेशद्वारातून आंत गेल्यावर पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते. तिथून पुढे अगदी अंधार असलेली नागमोडी पायर्‍यांची वाट पुढच्या प्रवेशद्वारापाशी जाते. उभ्या कातळकड्याच्या आंतमध्ये कोरलेला हा पायर्‍यांचा मार्ग आणि प्रवेशद्वारे अशी रचना चौल्हेर किल्ल्याला दुर्गम बनविते.

IMG 7367 2

प्रवेशद्वारांवर कमलपुष्पासम कोरीव नक्षी आहे. प्रवेशद्वारांची ही वास्तूरचना अत्यंत अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुढे वर गेल्यावर गडाच्या माथ्याच्या थोड्या खालच्या टप्प्यावर आपण प्रवेश करतो. माथ्यावर तटबंदी, बुरूज दिसतात. उजवीकडे तटबंदीच्या खालच्या कड्यात पाण्याचं खोदीव टाकं असून जवळच शंकराची पिंड आणि नंदी आहेत.
डावीकडे पसलेली माची आणि सर्वोच्च माथा आहे. माचीवर अनेक ठिकाणी बांधकामाचे अवशेष दिसून येतात. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा करत पलिकडच्या बाजूने माथ्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. बालेकिल्ल्याच्या पोटात अनेक खोदीव गुहा टाकी आहेत. त्यात काही टाक्यांमधील पाणी मोत्यासारखं स्वच्छ असल्याने त्यांना मोती टाकं म्हणतात.
ओळीने कोरलेल्या या पाण्याच्या टाक्यांमध्ये कड्यावरून पाणी येऊन साठवण्यासाठी केलेले पाण्याचे कोरीव चर आणि नाली अभ्यासण्याजोगे आहेत. काही कोरीव पायर्‍या चढून आपल्याला चौल्हेरच्या सर्वोच्च माथ्यावर प्रवेश मिळतो. इथले प्रवेशद्वार ढासळलेलं असून त्याचे रेखीव चिरे गतवैभवाची साक्ष देत विखूरलेले आहेत. वर आल्यावर समोरच पडीक अवस्थेतील मोठ्या वाड्याच्या भिंती दिसतात. एक अंबारखाना सदृश्य इमारतीचे अवशेषही नजरेत येतात. वाड्यात शिरून पुढे जाणार्‍या वाटेत पाण्याची चांगल्या धाटणीची चार टाकी लागतात. ही पाण्याची टाकी चांगली खोल आहेत. बालेकिल्ल्यावरही अनेक जोती दिसून येतात. मारूती आणि गणपतीच्या मूर्ती बघायला मिळतात.
चौल्हेर किल्ल्यावरून दूरवर दिसणारी सातमाळा रांग, साल्हेर आदी कळवणभागातले डोंगर दिसतात. माथ्यावरून दिसणारा नजारा अतिशय विलोभनिय आहे. जवळच आसणार्‍या ‘कोथमिर्‍या’ आणि ‘दीर भावजय’ डोंगर माथ्यावरून फार सुंदर दिसतात. दूरवरचा प्रदेश न्याहाळत असतांना असं लक्षात येतं की, आपण कळवण, सटाणा आणि देवळा हे तीनही शहरं बघू शकतो आहे आणि चौल्हेर त्यांच्या बरोबर मध्यावर उभा आहे. यावरून चौल्हेरचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे आपणास लक्षात आलं असेलंच.
किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर किल्ल्यावर चौरंगीनाथ महाराजांचं प्रसन्न मंदिर आहे. दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. दर वर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी स्थानिक लोक आणि आदिवासी बांधवांची मोठी यात्रा भरते. खालच्या वाडीतून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग पुर्वी पश्‍चिमेकडील डोंगरधारेवरून होता. या धारेच्या उंचवट्याला गावकरी ‘खरकांडी’ म्हणतात. त्या धारेवर घोडपागा म्हणून ओळखली जाणारी एक जुनी इमारत आहे तसंच इमारतीच्या पाठीमागे भलामोठा प्राचीन बांधणीचा तलाव आहे.

IMG 7294 2

तलावाचे पाणी दगडी चिर्‍यांच्या भिंतीने आडविलेले आहे तर त्यातल्या काही चिर्‍यांवर कमलपुष्पांचे शिल्प दिसतात. चौल्हेर किल्ला बघून उतरताना या डोंगरधारेवरून उतरल्यास संपूर्ण गडफेरी परिपूर्ण होते. चौल्हेर किल्ला आणि परिसरातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडी असून यात परिसरात बिबट्या, सायाळ, तरस, लांडगे, माकड अशा वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. परिसरात पक्षीजीवन समृद्ध असून मोर, निळकंठ, सुतार, भारद्वाज, चिमणी, कावळा, सुग्रीन बगळे इत्यादी पक्षी गुंजारव करत आपल्याला त्यांचा परिचय करून देत असतात.
ऐतिहासिक संदर्भ 
आग्य्राच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांचा बागलाण मुलुखाशी प्रत्यक्ष संबंध आला. जेव्हा राजांनी बागलाण प्रांततील काही किल्ले ताब्यात घेतले त्यात चौल्हेर किल्ला असण्याची शक्यता दाट आहे. बाकी बागलाण भाग हा अहिर म्हणजेच ‘गवळी’ राजांच्या अधिपत्यात होते. तेव्हा वाडी चौल्हेरच्या संरक्षणासाठी गावाभोवती वेस असल्यासारखा कोटही बांधलेला दिसून येतो. आता हा कोट शिल्लक नाही. वाडीमध्ये ‘घोडीचा दगड’ म्हणून एक समाधीसारखे ठिकाण प्रचलित आहे.
ग्रामस्थ त्यामागची कथा सांगतात. फार पूर्वी गावात टेक्सन हजारी नावाचा एक माणूस राहत असे. हा हजारी म्हणजे सरदार राजेबहाद्दूरांच्या ताफातील अधिकारी होता. तो या गावावर सत्ता गाजवत असे. त्याच्याजवळ अनेक घोडे होते. त्यातली त्याची एक लाडकी घोडी मेली आणि त्या दुःखात त्याने तिच्या स्मृती प्रित्यर्थ दगडी चौथरा बांधला.
आजही गावातील लोक आजारी प्राण्यांना घेवून त्या चौथर्‍याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यामुळे त्यांचे जनावर बरे होते अशी त्यांची समजूत आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यकाळातील ‘पूर्णानंद स्वामी’ यांची समाधी चौल्हेर गावात आहे. समाधी मंदिर आता नव्याने बांधलं गेलं आहे पण त्यावर जुना शिलालेख आढळून येतो.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपळगाव बसवंत: पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या  ३२ नागरिकांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट 

Next Post

पिंपळगाव बसवंत: भीमाशंकर कोविड सेंटरचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
Next Post
IMG 20210501 WA0260

पिंपळगाव बसवंत: भीमाशंकर कोविड सेंटरचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011