आज आपण दोन तरुणांनी विकसित केलेल्या एका अनोख्या स्टार्टअपची यशोगाथा जाणून घेणार आहोत. केवळ भारतातच नाही तर अनेक खंडांमध्ये विस्तारलेल्या या स्टार्टअपने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
डॉक्टर्स, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाऊंट, इंजिनियर्स, बिल्डर्स आणि इतर सर्व प्रकारचे प्रोफेशनल्स की ज्यांना आपली दैनंदिन रिपीट करावी लागणारी काम करण्यासाठी एक असिस्टंट नेहमीच हवा असतो. पण हे सर्व काम करण्यासाठी एका पूर्णवेळ असिस्टंट चा पगार परवडेल असं नाही आणि म्हणून बरेच जण दैनंदिन रुटीन मधली काम देखील स्वतः करून घेतात. यामध्ये त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात. अनेक जणांचा तर असं मत आहे की तुमच्या कोर कामा पेक्षाही जास्त वेळ या इतर कंटाळवाण्या गोष्टी करण्या मध्येच जातो व त्यामुळे जास्त थकायला होतं.
कुठलाही व्यवसाय तुम्हाला जर उत्तम रित्या विकसित करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या वैशिष्ट्या वर फोकस करता आलं पाहिजे आणि त्याकरता इतर सर्व बारीकसारीक कामं करून घेण्यासाठी दुसरं कोणीतरी असिस्टंट असावा असं अनेकांचं मत असतं. अशाच प्रकारच्या असिस्टंट ची सोय करून दिली आहे विषअप या स्टार्ट अपने, आणि तेही अगदी परवडणाऱ्या पगारात.
भोपाळचा निलेश रंगवाणी आणि जयपूरचा विवेक गुप्ता हे दोघे आयआयटी मद्रास येथे आपल्या बीटेकच्या शिक्षणासाठी एकत्र आले आणि इथेच त्यांची मैत्री झाली. इथली त्यांची मैत्री पुढे आयुष्यातील करिअरमध्ये रूपांतरित झाली. विवेक आपली भेट एकच शिक्षण पूर्ण करून पुढे आयआयएम अहमदाबादमध्ये आपल्या एमबीए पूर्ण करण्यासाठी गेला. तिथून निघाल्यानंतर बीसीजी सारख्या मोठ्या बिझिनेस कन्सल्टन्सी कंपनी मध्ये त्याला उत्तम नोकरी प्राप्त झाली. या कंपनीमध्ये काम करत असताना अनेक व्यवसायिकांची प्रोफेशनल्सची आणि मोठ्या बिझनेसमन शी त्याचा संपर्क आला.
आणि तिथून काही धडे घेऊन त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की होती की प्रोफेशनलचा असा कुठला तरी मोठा प्रश्न जर मला सोडवता आला तर त्यातून मी माझा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात उभा करू शकेल. याच व्यवसायासाठी त्यांनी पुन्हा आपला मित्र निलेश यांच्याशी संपर्क साधला. आणि दोघांच्याही विचारमंथनातून बिझनेस सर्विस प्रोव्हायडर ची कल्पना सुचली. बिझनेस सर्विस प्रोव्हायडर मध्ये त्यांना अनेक वेगवेगळी मॉडेल्स सुचले. आजच विषअप चे स्वरूप म्हणजे त्यांच्या विचार मंथन आतलं तिसरा स्वरूप होय.
एखाद्या प्रोफेशनल साठी नोकरीवर एखादा असिस्टंट ठेवावा तर ती म्हणजे एक मोठी लायबिलिटी तयार होते दर महिन्याचा पगार द्यावा लागतो आपला सर्व डेटा देखील त्याला हाताळण्यासाठी द्यावा लागतो व त्यासोबतच त्याच्यावर बहुतांशी अवलंबून देखील राहावे लागतात. काही प्रोफेशनल्स ला असिस्टंट ची आवश्यकता असते पण तो पूर्णवेळ असावा अशी मात्र मागणी नसते. त्याला बसण्यासाठी जागा देणे टेबल कंप्यूटर पुरवणं हे देखील काहीजणांना शक्य नसतं. या सर्व प्रश्नावर ती विषअपने मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. आणि तो मार्ग म्हणजे कंपनीच्या नावातच लपलेला आहे. जेव्हा तुम्हाला असिस्टंट असावा अशी इच्छा होईल म्हणजेच अशी वेष निर्माण होईल त्या वेळेला तुम्हाला तसा वर्चुअल असिस्टंट प्राप्त होईल. जुलै 2015 साली या आगळ्यावेगळ्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना नवी दिल्ली येथे करण्यात आली.
त्यांचे बिझनेस मोडेल आपण थोडक्यात समजून घेऊ. अनेक स्कील्ड पण बेरोजगार असलेले तरुण आज भारतात आपल्याला पाहायला मिळतात. किंवा जे कोणी एका ठिकाणी नोकरी करत आहेत त्यांना अधिक पैसा कमवण्यासाठी नोकरी सोबत जोडधंदा देखील करावा लागतोय. अशा सर्व तरुणांना एकत्र करण्याचा निर्णय या कंपनीने घेतला. त्यांच्यातील प्रत्येकाचं एक प्रोफाईल निर्माण करण्यात आलं त्यांच्याकडची स्किल्स याची संपूर्ण चाचणी करून नोंद घेण्यात आली.
आता हे स्किल प्रोफाइल प्रोफेशनल्सना व्यवसायिकांना व उद्योजकांना दाखविण्यात आले. हे सर्व तरुण तुमचे असिस्टंट म्हणून काम करण्यास तयार आहेत व यासाठी त्यांनी तुमच्या ऑफिसला घेण्याची आवश्यकता नाही तुम्ही त्यांना कम्प्युटर किंवा इंटरनेट कनेक्शन व बसण्याची जागा देखील पुरविण्याची गरज नाही. त्यांनी तुमच्यासाठी दिवसातून किती तास काम करावं हे देखील तुम्हीच ठरवायचं. आणि ते जितके तास काम करतील तेवढ्या तासांचा चा पगार त्यांना द्यायचा.
उद्योजकांच्या बाजूने विचार केला तर हवं तेव्हा हवं तितकं आणि हवं तसं काम करून देणारा असिस्टंट हव्या त्या पगारामध्ये कुठलीही जबाबदारी स्वीकारावी न लागता उपलब्ध होत आहे. आणि या सोबतच जर वर्च्युअल असिस्टंट च्या बाजूने विचार केला तर घर बसल्या आपल्या सोयीने आपले स्किल्स वापरून त्याच्यासाठी योग्य मोबदला या तरुणांना मिळत आहे. घरूनच काम करायचे असल्याकारणाने एका वेळेला अनेक व्यवसायिकांची असिस्टंट पद देखील हे लोक स्वीकारू शकतात आणि एकाच वेळेला दुपटी तिपटीने पगार देखील हे कमवत आहेत.
वर्च्युअल असिस्टन्स जसे तावून-सुलाखून घेतले जातात त्यासोबतच आपले क्लायंट्स निवडताना देखील या कंपनीकडून अगदी डोळ्यात तेल घालून तपास केला जातो. किमान एक लाख 50 हजार रुपये मासिक उत्पन्न असल्याशिवाय कुठल्याही क्लायंट ही सेवा घेण्यास पात्र ठरत नाही कारण वेळेवर आणि पूर्ण पगार उपलब्ध करून देणे ही कंपनीची जबाबदारी आहे. या सर्विस साठी क्लायंट कडून एक विशिष्ट सबस्क्रीप्शन फी आकारली जाते. त्यात देखील प्रतिमहा किंवा सहा महिन्याचे किंवा प्रति वर्षाचे असे वेगवेगळे पॅकेजेस तयार करण्यात आले आहे.
अकाउंटिंग, आय टी, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, लीड मॅनेजमेंट, ई-मेल मॅनेजमेंट, डेटाबेस मॅनेजमेंट व इतर तत्सम स्किल्स असलेल्या अनेक तरुणांना आज या कंपनीमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे आणि तो देखील घर बसल्या. आज तब्बल पाच हजारहून अधिक क्लाइंट या कंपनीसोबत जोडले गेले आहेत.
केवळ दहा लाख रुपये गुंतवणूक करून या दोघांनी सुरू केलेली ही कंपनी आज दोन वेगवेगळ्या फंडिंग राऊंड मधून सुमारे तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक पटकावून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये नफ्यात आलेली ही कंपनी 2019 साला खेरीज तब्बल दोनशे कोटी रुपयांहून अधिक चा नफा नोंदवून आपली छाप व आपले वेगळेपण सिद्ध करत आहे. अशा प्रकारच्या सुविधा पुरविणारी विष अप ही एकमेव भारतीय कंपनी आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!