अनअकॅडमी
आधी एम्स मधून डॉक्टर मग आयएएस ऑफिसर आणि आता शेकडो कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक. जाणून घेऊयात रोमन सैनी आणि त्याच्या अनोख्या अन अकॅडमी या स्टार्टअप बद्दल…

(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
रोमन सैनी आणि गौरव मुंजाल हे दोघे घनिष्ठ मित्र. दोघांचेही घरी शिक्षणाला प्रोत्साहन देणारे वातावरण आणि त्यामुळेच गौरव मुंजाल ला बारावीनंतर एनएमआयएमएस मुंबई येथे बीटेक या पदवी संपादन करता पाठवण्यात आले. डिग्री पूर्ण करताना गौरव च्या मनात एक विचार आला की आपण आता डिग्री संपवली आहे. आता केवळ नोकरीच न करता काही तरी स्वतःचं देखील करावं पण ते नेमकं काय आहे याची कल्पना त्याला येत नव्हती. आणि म्हणून काहीतरी करण्याच्या धडपडीत किमान आपल्याकडे जे ज्ञान आहे ते तरी इतरांना वाटावा या उद्देशाने गौरवने स्वतःचा युट्युब चॅनेल सुरू केला.
आपले कंप्यूटर अभियांत्रिकी मधील एक धडे गौरवने आता युट्युब वर टाकायला सुरुवात केली. याच दरम्यान त्याला नोकरी देखील मिळाली. नोकरी करत असताना देखील त्याने आपले युट्युब वरचे सातत्य कायम ठेवले. संगणक क्षेत्रातील विद्यार्थी आता स्वतःहून गौरव चे व्हिडिओ शिवा वाहत होते काहीजण तर मेसेज करून गौरवला नवे टॉपिक सुचवत होते किंवा त्यांच्या अभ्यासातील असलेल्या शंका विचारत होते. नोकरी आणि ड्युटीवर दोन्हीही सुरळीत चालू असताना हिमेश नावाच्या एका मित्रासोबत गौरवने “फ्लॅट चॅट” नावाचे एक स्टार्टअप सुरू केले. त्याने सुरू केलं नाही स्टार्टअप अगदी कमी वेळामध्ये लोकप्रिय होऊ लागलं आणि चटकन या कंपनीला खरीददार देखील मिळाले. कॉमन्फ्लूर डॉट फ्लोअर डॉट कॉम या कंपनीने स्टार्टअप विकत घेतले.

दरम्यान रोमन सैनी हा एक अतिशय प्रतिभाशाली विद्यार्थी होता. राजस्थानमध्ये आपल्याकडे गावातच बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षीच मेडिकल एंट्रन्स एक्झाम क्लियर करुन एम्स मध्ये त्याने प्रवेश मिळवला. वयाच्या अठराव्या वर्षी ज्या वेळेला अनेक जण केवळ विद्यार्थी दर्शन मध्येच असतात आपल्या अवतीभोवती नेमकं काय चाललंय याची कल्पनाच करत असतात त्याच वेळेला रोमन सैनी ने चक्क कॅन्सर वर आधारित रिसर्च पेपर देखील पब्लिष केले. आणि अशा पद्धतीने उत्तम अभ्यास करत त्याने आपली मेडिकल ची डिग्री उत्तम गुणांसह संपादन केले.
डॉक्टर ची पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावी जाऊन लोकांची सेवा करण्यास सुरुवात केली. पण लोकांच्या सेवेकरिता तुम्हाला दोन गोष्टी हव्यात एक म्हणजे भरपूर पैसा किंवा सत्ता हे त्याच्या लक्षात आलं. आणि पैसा उपलब्ध करणं हे शक्य नसलं तरी सत्य मध्ये आपण नक्कीच घेऊ शकतो ह्या विचाराने त्याने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
आणि पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो जोमाने अभ्यासाला लागला. आणि वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नांमध्ये १८ व्या क्रमांकावर येऊन तो आयएएस देखील झाला. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे त्याला असिस्टंट कमिशनर म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. आणि ही सेवा उत्तम सुरू असताना त्याची गाठ भेट पुन्हा गौरव शी झाली. गौरवने रोमन ला देखील आपल्या यूट्यूब चैनल वर त्याच्या अनुभवाचे धडे टाकण्यास सांगितले. रोमन ने देखील ते मान्य केले आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन त्याने याच यूट्यूब चैनल वरून सुरू केले. विशेष म्हणजे यांच्या युट्युब चॅनेल च नाव होतं ‘अनअकॅडमी’.
