एका मराठमोळ्या तरुणाचा आयटी कंपनीतील नोकरी सोडून कोट्यवधींच्या पाणीपुरीच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू केली. पण हा प्रवास आणि आजचे हे लख्ख यश हे फार सोपं नव्हतं. डोळे दिपावून टाकणाऱ्या या स्टार्टअपची ही यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
एका मराठमोळ्या कुटुंबात जन्माला आलेल्या प्रशांत कुलकर्णी आपले एमबीए चे शिक्षण पूर्ण करून या प्रतिष्ठित आयटी कंपनीमध्ये नोकरीला लागला. घरचा जरी लहानसा व्यवसाय असला तरी साधारणपणे सर्वच मराठी कुटुंबात असलेल्या अपेक्षा म्हणजे प्रशांतने नोकरीच करावी हा विचार त्याच्या ही कुटुंबातून रुजला होता. आणि म्हणून अगदी सुखवस्तू अशा इन्फोसिस कंपनी मध्ये सुरळीत अशी समाधानाची नोकरी प्रशांत करत होता.
भारतात प्रत्येकालाच चटपटीत खाण्याची आवड असते. आणि त्यात अशा चटपटीत पदार्थ मिळण्याचे ठिकाण म्हणजे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या. चाट मधील सुप्रसिद्ध आणि बहुअंशी लोकांना आवडणारा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. या पाणीपुरीची चटकदार चव नाव काढताच क्षणी सगळ्यांच्या जिभेवर रेंगाळते. त्यात काही जणांना पाणीपुरी म्हणजे जणू जीव की प्राण. आणि त्यातीलच एक म्हणजे हा प्रशांत. कुठेही प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला जर पाणीपुरीची गाडी दिसली तर आवर्जून थांबून त्या पाणीपुरीचा आस्वाद घेऊन मगच पुढे जाणे हा प्रशांत चा नियम.
एकदा असेच ऑफिस होऊन परत येत असताना रस्त्याच्या कडेला त्याला पाणीपुरीचा ठेला दिसला आणि तिथे उभे राहून त्याने मनमुरादपणे त्या पाणीपुरीचा आस्वाद घेतला. परंतु ही पाणीपुरी मनाला जरी भावली असली तरी शरीराला ती काही फारशी रुचली नाही. आणि ह्या पाणीपुरी मुळे त्याला लगेचच त्रास होऊ लागला. डॉक्टरांकडे गेले असता अस्वच्छ पाण्यातील पुरी खाल्ल्याने फूड पॉइझनिंग झाले असल्याचे समजले. यामुळे तब्बल पुढचे चार महिने प्रशांतला पाणीपुरीच काय पण कुठलाही चटकदार पदार्थ खाता आला नाही.
तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर तो पुन्हा ऑफिसला जाऊ लागला मात्र पाणीपुरी खाता येत नाही ही खंत त्याच्या मनाला सतत बोचत होती. आणि यावर नेमकं सोल्युशन काय असा तो विचार करू लागला. या विचारात असताना त्याने हाइजीन एक पद्धतीने बनवलेली पाणीपुरी कुठे मिळते का याचा तपास केला. पण त्याचे सुदैव की दुर्दैव म्हणा परंतु त्याला एकही ब्रांडेड पाणीपुरीवाला सापडला नाही. आणि यातूनच त्याला आपल्या आतील उद्योजकतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग गवसला.
हायजेनिक पण चविष्ट पाणीपुरी व तत्सम रस्त्याच्याकडेला मिळणाऱ्या पदार्थांची गरज लोकांना असून देखील ती पूर्ण होत नाही व नेमकं हेच करून आपण आपला व्यवसाय थाटू शकतो असा त्याचा विचार सुरू झाला. आणि यातूनच त्याने सुरुवात केली ती स्वतःच्या हाइजीनिक पाणीपुरीची. पाणीपुरीचे उत्तर भारतातील प्रसिद्ध नाव म्हणजे गोल-गप्पे आणि ह्या नावावरूनच त्याने आपल्या पाणीपुरीचे ब्रँडिंग गपागप असे केले. मिनरल वॉटर मध्ये तयार करून अतिशय अस्वच्छ वातावरणात स्वच्छ डिश मध्ये व उत्तम प्रतीचे पदार्थ वापरून तयार केलेली ही पाणीपुरी त्याने सुरुवातीला स्वतःच्याच एका उभा केलेल्या स्टॉल मधून विक्रीस सुरूवात केली.
त्याच्या या प्रयोगाला अपेक्षेपेक्षा जास्त चांगले यश येऊ लागता आता त्याला नोकरी हुन हा व्यवसाय अधिक प्रिय वाटू लागला. यात त्याने आपला व्यवसाय वाढवता वाढवता पाणीपुरीचे तब्बल एकशे बारा प्रकार आपल्या स्टॉलवर ठेवले. त्यात ब्लॅक करंट पाणीपुरी व्हॅनिला पाणीपुरी चॉकलेट पाणीपुरी इटालियन पाणीपुरी आईस्क्रीम पाणीपूरी असेदेखील फ्लेवर त्याने आपल्या मेनू कार्ड वर घेतले.
लोकांच्या वाढत्या प्रतिसादाला लक्षात घेता पाणीपुरी सोबतच चार्ट मधील इतर प्रकार देखील त्याने सुरु केले. दही भल्ला भेळ टोकरी चाट समोसा चाट व यासोबतच भारतातील विविध भागात प्रसिद्ध असलेले चाटचे प्रकार त्याने अशाच पद्धतीने विक्रीस सुरू केले.
चटर पटर चा एक अतिशय लोकप्रिय प्रकार म्हणजे पाणीपुरी कॅप्सूल. अनेक लोकांना स्वतः घरी पाणी पुरी तयार करून आपल्या आप्तेष्टांना खाऊ घालायला आवडते. आणि म्हणून या लोकांसाठी विशेष प्रशांतने घरी तयार करता येण्यासारखे पाणीपुरीचे पॅकेज बनवले. या पॅकेजमध्ये उकडलेला बटाटा केमिकल विना प्रक्रिया करून अनेक आठवडे ती केली अशा पद्धतीचा केला जातो व त्यासोबतच विशिष्ट पद्धतीने तयार करवून घेतलेल्या पुऱ्या दिल्या जातात. आणि पाण्यासाठी आपण आपल्या घरचे साधे पाणी वापरून त्यात केवळ दोन कॅप्सूल दिल्या जातात. खाण्यापूर्वी ह्या कॅप्सूल केबल पाण्यामध्ये सोडाव्यात जेणेकरून पाणीपुरीचा मसाला तयार होतो. आणि यामुळे लोक आपल्या घरीच हायजेनिक पण चविष्ट अशा पाणीपुरीचा आस्वाद मनमुराद घेऊ शकतात.
आणि केवळ पाणीपुरी पासून सुरू झालेल्या या व्यवसायाचे रुपांतर त्याने आता एका कंपनीमध्ये करण्याचे ठरवले. चटपटीत पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या इंदोर शहरांमधील खाऊ गल्ली येथे त्याने आपल्या चटर-पटर फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली नोव्हेंबर २०११ साली.
सुरुवातीची गुंतवणूक केवळ तीस हजार रुपयांची होती. व्यवसाय वाढवण्यासाठी केवळ एकाच ठिकाणी आपला स्टॉल उभा करून चालणार नाही तर अनेक शहरांमध्ये आपल्याला पोहोचता आलं पाहिजे पण त्याकरता लागणारी मोठी गुंतवणूक. आणि ही गुंतवणूक देखील उपलब्ध नसल्याने त्याने सोपा व चटकन विस्ताराचा मार्ग म्हणजे फ्रॅंचायजी मॉडेल स्वीकारले.
प्रशांत आता चटर-पटर ची फ्रॅंचाईजी देण्यास सुरुवात केली. ह्या फ्रॅंचाईजी मध्ये स्टॉल उभा करण्यास लागणारा सर्व सेटप तिथे लागणारे फर्निचर उपकरणे रंग संगती व विक्रेत्यांचे कपडे या सर्व गोष्टी कंपनीकडूनच पुरविण्यात येतात. यासोबतच कुठलाही खाद्यपदार्थ बनवतांना त्यात असलेले घटक सर्व पदार्थ व त्याचे योग्य प्रमाण हे देखील लिखित स्वरूपामध्ये कंपनीकडूनच दिले जाते व त्याचे विशिष्ट प्रकारचे ट्रेनिंग देखील फ्रॅंचायजी घेणाऱ्यास मिळते.
या सर्व सेटप च्या बदल्यात फ्रॅंचाईजी घेणाऱ्या कडून दोन ते सहा लाख रुपये फ्रॅंचाईजी फी म्हणून घेतले जातात तर दर महिन्याचे विशिष्ट भाडे देखील घेतले जाते. या सोबतच सर्व खाद्यपदार्थांमध्ये लागणारे इनपुट्स म्हणजे अगदी पुरी इतर मसाले या सर्व गोष्टी देखील फ्रेंच घेणाऱ्यास कंपनीकडून विकत घ्याव्या लागतात. चटर-पटर ची पहिली फ्रॅंचाईजी गुजरात मधील अहमदाबाद या शहरात घेण्यात आली.
२०१६ मध्ये एका सीट कॅपिटल राउंड मध्ये चटर-पटर ला तीन भारतीय गुंतवणूकदारांकडून एक कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली होती. आणि त्यावेळेला कंपनीचे मूल्यांकन हे दहा कोटी रुपये इतका करण्यात आलं होतं. आज चटर-पटर च्या भारतभरातील १६ राज्यांमध्ये ८० हून अधिक शहरांमध्ये फ्रेंचायसी उभ्या आहेत. केवळ आपल्या पहिल्या वर्षांमध्येच चटर पटर ने एक कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली होती. व आज १० वर्षांमध्ये चटर पटर च्या फ्रॅंचाईजी चा विस्तार केवळ भारतापुरता मर्यादित नसून अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये देखील पसरला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!